आपल्या वेगवान जगात प्रार्थनेकडे सहज जाणे सोपे आहे, हे जसे काही आपल्या दैनंदिन जीवनाच्या तपासणी सुचीपैकी एक वस्तू आहे. तथापि, बायबल आपल्याला शिकवते की, निकडीच्या भावनेने प्रार्थना करण्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. जसे १ पेत्र. ४:७ म्हणते, “सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.”
निकडीची प्रार्थना ही भयचकित होऊन वारंवार तेच शब्द बोलणे किंवा देवाच्या हाताला वळवण्याचा प्रयत्न करण्याबद्दल नाही. त्याऐवजी, प्रभूसमोर लक्ष केंद्रित करून, तीव्रतेने आणि हृदय जे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे त्यासह आपल्या गहन गरजा आणि इच्छांना आणण्याबद्दल आहे. याकोब ५:१६ आपल्याला आठवण देते की, “धर्मी व्यक्तीची प्रार्थना ही सामर्थ्यशाली आणि प्रभावी आहे.”
संपूर्ण बायबलमध्ये, व्यक्तींची विलक्षण उदाहरणे आपण पाहतो ज्यांनी चमत्कारिक प्रगतीचा अनुभव केला कारण ते प्रार्थनेकडे निकडीच्या भावनेने गेले. अशी एक व्यक्ती ही हन्ना आहे, जिची कथा १ शमुवेल १:१-२० मध्ये आढळते. हन्ना अशी एक स्त्री होती जी वांझपणाशी संघर्ष करीत होती आणि निराशेने तिला प्रभूसमोर तिचे हृदय मोकळे करण्याकडे नेले. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, “तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली.” (१ शमुवेल १:१०)
हन्नाची निकडीची प्रार्थना ही काही प्रासंगिक विनंती नव्हती; मनापासून आलेला तो आक्रोश शाश्वत परमेश्वराकडे होता जो तिची अवस्था बदलू शकत होता. तिची समस्या कोणतेही मानवी उपाय सोडवू शकत नाही हे तिने ओळखले होते, म्हणून संपूर्ण हृदयापासून ती परमेश्वराकडे वळली होती. परिणामस्वरूप, देवाने विनंती ऐकली आणि तिला पुत्र देऊन आशीर्वादित केले ज्याचे नाव तिने शमुवेल ठेवले. बाळ मोठे होऊन इस्राएलातील सर्वात महान संदेष्टयांपैकी एक होणार होते.
हन्नाची कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण आपल्या स्वतःची शक्ती आणि संसाधनाच्या अंताला येतो, हे तेव्हाच आपण निकडीच्या प्रार्थनेच्या सामर्थ्याचा खरेच अनुभव करू शकतो. जसे मत्तय. ५:३ मध्ये प्रभू येशूने म्हटले, “जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” जेव्हा आपण आपली आध्यात्मिक गरिबी आणि देवासाठी आपली नितांत आवश्यकता स्वीकारतो, तेव्हाच आपण आपल्या जीवनात अद्भुत कार्य करण्यासाठी त्याच्यासाठी दार उघडतो.
निकडीच्या प्रार्थनेचे आणखी एक उदाहरण राजा हिज्कीयाच्या कथेमध्ये आपल्याला आढळते (२ राजे १९:१४-१९). जबरदस्त शत्रूला सामोरे गेलेले असताना, हिज्कीयाने धमकीने भरलेले पत्र घेतले जे त्याला मिळाले होते आणि त्यास देवासमोर उघडे करून ठेवले. त्याने निकडीने आक्रोश केला, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करुबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केलीस. हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा आणि सन्हेरीबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक” (२ राजे १९:१५-१६). हिज्कीयाच्या निकडीच्या प्रार्थनेच्या प्रतिसादात, देवाने यरुशलेमेस शक्तिशाली अरामी सेनेच्या हातून सोडवले.
निकडीच्या प्रार्थना ह्या केवळ बायबलमधील नायकांपर्यंतच मर्यादित नाहीत. ते एक शक्तिशाली साधन आहे जे प्रत्येक विश्वासणारा आज वापरू शकतो. जेव्हा आपण आव्हाने, संघर्ष किंवा अशक्य अशा दिसणाऱ्या परिस्थितींना सामोरे जातो, तेव्हा आपल्या गरजा प्रभूसमोर निकडीच्या प्रार्थनेत आणण्याद्वारे आपण हन्ना आणि हिज्कीयाच्या पावलांचे अनुसरण करू शकतो. जसे फिलिप्पै. ४:६-७ आपल्याला प्रोत्साहन देते, “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत:करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”
आपल्या स्वतःच्या जीवनात, निकडीच्या प्रार्थनेची सवय विकसित करणे हे परमेश्वर आणि आपल्या सभोवतालच्या जगाबरोबरच्या आपल्या नातेसंबंधाला परिवर्तीत करू शकते. चिंता, भीती किंवा स्वतःवरच चुकीने अवलंबून राहण्याऐवजी, आपण पहिल्या प्रथम परमेश्वराकडे वळण्यास शिकू शकतो. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण हे पाहणार आहोत की आपल्या प्रार्थना ऐकण्यास तो विश्वासू आहे आणि त्याच्या परिपूर्ण वेळेत आणि मार्गाने आपल्याला उत्तर देईल.
म्हणून मग आपण धैर्याने आणि निकडीने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या, हे जाणून की डोंगरांना हलवण्याचे आणि जीवने बदलण्याचे आपल्या प्रार्थनांमध्ये सामर्थ्य आहे. योहान. १६:२४ मध्ये जसे प्रभूने घोषित केले, “तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.” आपण निकडीच्या प्रार्थनेचे सामर्थ्य आत्मसात करावे आणि अविश्वसनीय आशीर्वादांचा अनुभव करावा जे देवावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या अंत:करणातून प्रवाहित होते.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझ्यावर पूर्णपणे निर्भर राहून, निकडीसह प्रार्थना करण्यास आम्हांला शिकव. आमच्या अंत:करणाच्या आक्रोशाने तुझ्या सामर्थ्याला मोकळे करावे आणि चमत्कारिक प्रगती आणावी असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे● नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ (दिवस २१)
● पित्याची मुलगी-अखसा
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -३
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
● विश्वास काय आहे?
● आपल्या निवडींचा प्रभाव
टिप्पण्या