"कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे." (इफिस २:८)
कल्पना करा की सतत गळणाऱ्या पाण्यावर उपाय करण्यासाठी तुमच्या स्वयंपाक खोलीतील नळाला व्यवस्थित करण्याची इच्छा केली आहे. ते करण्यासाठी, तुम्हाला काय केले पाहिजे? ठीक, ते अगदी सरळ आहे, बरोबर? प्लंबर ला बोलवा की ते पाईप व्यवस्थित करावे जे पाण्यास उगमापासून तुमच्या स्वयंपाक खोलीत आणते. एकदा की पाईप-वाहक हे व्यवस्थित केले, काय घडते? तुम्ही तुमच्या इच्छेच्या प्रत्यक्षतेमध्ये जगता!
ज्याप्रमाणे तुम्हाला पाईप ची गरज आहे की पाण्याला तुमच्या स्वयंपाक खोलीत आणावे, कृपा ही त्याच्या पूर्णतेमध्ये उपलब्ध असणार नाही जर तुमच्या मध्ये विश्वासाचा अभाव आहे, जे त्या प्रवाहास निरंतर वाहू देते! ख्रिस्ती जीवनात कृपेचा मार्ग हा विश्वासाचा पाईप आहे. जेव्हा विश्वास हे तुमच्या जीवनात कार्यरत आहे, कृपा ही तुमच्यासाठी उपलब्ध असते. लक्षात ठेवा, परमेश्वरा मध्ये काहीही विश्वासाद्वारे प्राप्त करू शकत नाही. इब्री ११:६ आपल्याला हे स्पष्टपणे सांगते की, विश्वासावाचून हे अशक्य साहस आहे, की परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा.
जेव्हा व्यक्ति देवाच्या समर्थतेमध्ये विश्वास ठेवतो, त्याच्या स्वतःमध्ये नाही, परमेश्वर त्याजसाठी त्याची अपार कृपा मोकळी करतो. थोडया क्षणाकरिता कल्पना करा किती लोक इतका प्रयास करतात की ते करावे जे कृपेने त्यांच्यासाठी उपलब्ध केलेले आहे. कृपा -अलौकिक समर्थता प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला ख्रिस्ताच्या पूर्ण केलेल्या कार्यावर केवळ विश्वास ठेवण्याची गरज आहे! हालेलुया, यात आश्चर्य नाही की आपले वचन काय म्हणत आहे, "तुमच्या स्वतःहून नाही; हे देवाचे दान आहे." कृपे मध्ये चालण्यासाठी काय करावे लागते? विश्वासाद्वारे जगावे!
आपल्याला ठाऊक आहे की देवाबरोबर चालण्यासाठी विश्वास ही अत्यंत आवश्यक किल्ली आहे, परंतु कृपे शिवाय, देवाबरोबर आपले चालणे हे व्यर्थ व अत्यंत कठीण होऊन जाते. प्रामाणिकपणे, आपल्याला कृपेची गरज आहे जे विश्वासाद्वारे कार्य करते की आपल्या जीवनाच्या मार्गातील अनेक गल्ल्यांमधून निघावे. बायबल चा काय अर्थ आहे जेव्हा ते म्हणते, "विश्वासावाचून परमेश्वराला प्रसन्न करणे हे अशक्य आहे?" तुम्हीं पाहता, बायबल नुसार विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवंसा व न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे. परमेश्वर त्या लोकांमध्ये रुची ठेवत नाही जे त्याच्या समर्थतेमध्ये भरंवसा ठेवत नाहीत की शून्यामधून काहीतरी घडवावे! तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत आहात काय तुम्हाला त्या भयानक परिस्थितीमधून विश्वास दयावा.
परमेश्वर एका जाळ्यास एक उंच उडणाऱ्या यशाच्या भरारी मध्ये परिवर्तन करू शकतो. तो तुमच्या संकटांना अद्भुत आशीर्वाद मध्ये परिवर्तन करू शकतो. आज जेव्हा तुम्ही तुमच्या कामासाठी जाता, असे होवो की तुमचा विश्वास हा परमेश्वरावर बिजागरी प्रमाणे बिलगून राहावा, त्याच्यावर भरवंसा करा, असे होवो की तुमचा विश्वास हा त्याच्यामध्ये खोलवर मुळावलेला राहो. तो कधीही अपयशी होऊ शकत नाही, ना ही तो कधी चुकतो; जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये त्याजवर भिस्त ठेवून राहता; त्याची कृपा जी नेहमीच पुरेशी आहे ती तुम्हाला प्रगट केली जाईल.
प्रार्थना
पित्या, मला साहाय्य कर की माझा विश्वास हा इतका मजबूत असावा की मी कदाचित तुझ्यावर आणि केवळ तुझ्यावरच अवलंबून राहावे. जेव्हा मी विश्वासाद्वारे तुझ्यावर भिस्त ठेवून आहे, मला साहाय्य कर की कृपा प्राप्त करावी.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले● शांति- देवाचे गुप्त शस्त्र
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे
● स्वर्गाचे आश्वासन
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
टिप्पण्या