बायबलमध्ये, नहेम्या एक विलक्षण पुढारी म्हणून स्पष्टपणे दिसून येतो ज्याने यरुशलेमेच्या भिंतींच्या पुनर्बांधणीचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतले होते. अर्तहशश्त राजाकडून परवानगी मिळाल्यावर, नहेम्याने या सेवाकार्यासाठी दैवी उद्देश आणि दृढतेने सुरुवात केली. तथापि, जेव्हा त्याने ह्या मोडलेल्या भिंतीची पुनर्बांधणी करण्याचे काम परिश्रमपूर्वक सुरु केले, तेव्हा त्याला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही, नहेम्याचा देवावरील अटळ विश्वास आणि वचनबद्धतेने हे उद्धिष्ट आश्चर्यकारकरित्या केवळ ५२ दिवसांत पूर्ण करण्यास सक्षम केले (नहेम्या ४ पाहा).
जेव्हा आपण देवाने ज्यासाठी आपल्याला बोलावलेले आहे त्याचा विश्वासुपणे पाठपुरावा करतो, तेव्हा आपण विरोधाची अपेक्षा केली पाहिजे. हा प्रतिकार हे सुचवत नाही की आपण देवाच्या इच्छेच्या बाहेर आहोत; त्याऐवजी, ते नेहमी पुष्टी करते की आपण नेमकेपणे जेथे असले पाहिजे तेथे आहोत. विविध स्तरांतून विरोध होऊ शकतो, परंतु आपण या वास्तविकतेमध्ये शांती प्राप्त करू शकतो की आपला देव कोणत्याही शत्रूपेक्षा मोठा आहे. जसे स्तोत्र. १४७:५ आपल्याला सांगते, “आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे.”
प्रेषित पौलाने देखील त्याच्या सेवाकार्यामध्ये सर्वात प्रथम ह्याचा अनुभव केला आहे. इफिस येथील त्याच्या कार्यावर विचार करत पौल लिहितो, “कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत” (१ करिंथ १६:९). पौलाला हे कळले होते की नेहमी विरोध आणि संधी हे एकत्र येत असतात. जेव्हा आपण प्रगतीच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा आपण प्रतिकाराची अपेक्षा केली पाहिजे.
असामान्य आव्हानांनी पौलाच्या सेवाकार्याला चिन्हित केले होते. त्याने प्रचंड त्रास सहन केला, त्यामध्ये काठीने मारहाण, पायावर फटके मारल्यावर उलटे लटकावले गेले, पुष्कळ वेळा तारू फुटले होते, जंगली प्राण्यांकडून हल्ले, तुरुंगवास, आणि दगडमार केला आणि मरण्यास सोडून गेले होते (२ करिंथ ११:२३-२७). असे प्रचंड अडथळे असूनही, पौलाच्या दृढ भावनेने आणि अटळ विश्वासाने त्याला पुढे जाण्यास प्रेरणा दिली. त्याने प्रतिकूल परिस्थितीत खचून जाण्यास नकार दिला, ज्याने संवेदनक्षम वृत्तीला मूर्त रूप दिला ज्याची आपण नेहमी अनुकरण करण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे.
जेव्हा आपण विरोधाला सामोरे जातो, तेव्हा आपण महत्वाचे निर्णय घेण्याला सामोरे जातो : आपण मागे परतणार का किंवा धैर्य सोडून देणार का किंवा आपण पौलासारखी वृत्ती धारण करणार आणि आव्हानांना सामोरे जात पुढे जात राहणार? ते जे विजयी होतात त्यांच्याविषयी बायबल पुरस्काराबद्दल बोलते. प्रकटीकरण ३:२१ अभिवचन देते, “मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.” यश, देवाच्या दृष्टीत, विरोधाच्या अनुपस्थितीने मोजले जात नाही परंतु विजय मिळवण्यासाठी चिकाटी आणि विश्वास जो आपण प्रदर्शित करतो त्याद्वारे मोजले जाते.
विरोधावर उपाय करताना नहेम्याची कथा मौल्यवान शिकवण देते. यरुशलेमेच्या भिंतींच्या दुर्दशेबद्दल ऐकल्यानंतर, नहेम्याचा पहिला प्रतिसाद हा प्रार्थना आणि उपास करणे होता, देवाचे मार्गदर्शन आणि कृपेचा धावा करणे होता (नहेम्या १:४-११).
पुनर्बांधणीच्या संपूर्ण प्रक्रीयेदरम्यान त्याचे देवावर अवलंबून राहणे हे उघड होते. जेव्हा त्याच्या शत्रूंकडून धमक्या आणि उपहासाला सामोरे गेला, तेव्हा नहेम्याने प्रार्थना केली, “हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे; ते निर्भत्सना करीत आहेत ती त्यांच्या शिरी उलट आण; बंदिवसाच्या देशात त्यांची लूट होऊ दे” (नहेम्या ४:४). त्याने सुरक्षाधिकारी ठेवण्याने कामकऱ्यांना संरक्षण दिले आणि त्यांना या आश्वासनाने प्रोत्साहन दिले की “आपला देव आपल्यातर्फे लढेल” (नहेम्या ४:२०).
नहेम्याचा धोरणात्मक आणि प्रार्थनापूर्ण दृष्टीकोन, विश्वासाला कृतीसह एकरूप करण्याच्या महत्वाबद्दल आपल्याला शिकवतो. त्याने विरोधकांना काम थांबवू दिले नाही परंतु काम चालू ठेवण्यासाठी त्याच्या योजनांना अंमलात आणले. त्याचप्रमाणे, आपण आपल्या पाचारणात सतत स्थिर राहिले पाहिजे, यावर विश्वास ठेवत की कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी देव शक्ती आणि ज्ञान देईल.
आपल्या जीवनात, आपण नि:संशयपणे विरोधाला सामोरे जाणार आहोत जेव्हा आपण देवाचे उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहू. मग ते टीका, अडथळे किंवा व्यक्तिगत संकटे अशा कोणत्याही प्रकारात येवोत, आपण नहेम्या आणि पौलाच्या उदाहरणांवरून शक्ती मिळवू शकतो. स्थिर विश्वास सांभाळत, देवाच्या मार्गदर्शनाचा धावा करत, आणि दृढनिश्चयाने पुढे वाटचाल करत, आपण कोणत्याही शत्रूवर विजय मिळवू शकतो.
आपल्या विश्वासाचा प्रवास हा नेहमीच सुरळीत नसेल, परंतु प्रतिकूल परिस्थतीतच आपले खरे चरित्र उघड होते. जसे कोणीतरी एकदा म्हटले होते, “यश हे जे काही तुम्ही प्राप्त केले आहे त्याद्वारे मोजले नाही तर विरोध ज्यावर तुम्ही विजय मिळवला आहे. चला आपण, त्यामुळे, आव्हानांना सामोरे जाऊ, हे जाणून की देव आपल्या पक्षाचा आहे, आपण विजयी होऊ शकतो.
प्रार्थना
पित्या, मला तुझे सामर्थ्य दे की प्रत्येक बलाढय, प्रत्येक महाकाय प्रसंग जे माझ्या विरोधात आहेत त्यावर वर्चस्व मिळवावे. मी तुला धन्यवाद देतो की तूं मला प्रभावाच्या उच्च स्तरावर नेत आहे. मला समर्थ कर की तुझ्या वचनावर स्थिर राहावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सार्वकालिकता मनात ठेवून जगणे● दिवस १७ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● चांगले युद्ध लढ
● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे
● दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● तुमची प्रमाणता उंचवा
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
टिप्पण्या