आपण सर्व जण वेळोवेळी चुका करीत असतो. हे म्हटल्यावर, हे आपल्याला एक आदर्श स्थित करण्यापासून बचावू शकत नाही. प्रेषित पौलाने म्हटले, "माझे अनुकरण करा, जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करीत आहे" (१ करिंथ ११:१).
वरवर पाहिले तर, हे एक मुलभूत विचार दिसतात परंतु मग त्याच्या अर्था मध्ये त्यास गहन अर्थ आहे. इतरांना सांगत की, 'माझे अनुकरण करा", प्रेषित पौल स्वतःकडे लक्ष वेधून घेत नाही परंतु त्याकडे ज्याचे तो स्वतः अनुकरण करीत आहे. शिष्य असणे म्हणजे येशू बरोबर चालणे, त्याच्या शिकवणीनुसार जगणे. मग तुमचे जीवन जे तुमच्या भोवती आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्ताचा संदेश बहुगुणीत करते, आणि मग तुम्हाला संधी मिळते हे सांगण्यास की "माझ्या मार्गदर्शनानुसार चाला".
हे एक शीर्षक आहे ज्याचा प्रेषित पौलाने त्याच्या पत्रांमध्ये अनेक वेळा विचार केला आहे:
कारण तुम्हांस ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरु असाले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांस ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हांस विनंती करितो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठविले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवितो त्याप्रमाणे ख्रिस्तांतील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांस देईल. (१ करिंथ ४:१५-१७)
"बंधुनो, माझे अनुकरण करण्यात एक व्हा..." (फिलिप्पै ३:१७)
अनुकरण करण्याचा सिद्धांत हा की लहान लेकरे त्यांच्या वयस्कर लोकांकडून कसे शिकतात. अनेक कलेचे प्रकार सुद्धा अनुकरण करण्याद्वारे शिकले जातात. संपूर्ण नवीन करारात, पवित्र शास्त्र आपल्याला प्रोत्साहन देते की ख्रिस्त, परिपक्व ख्रिस्ती व विश्वासू मंडळीचे अनुकरण करावे.
आपल्याला याची खबरदारी घेण्यास सुद्धा सांगितले आहे की वाईटाचे अनुकरण करू नये, दुष्टासारखे दिसण्यास सुद्धा टाळावे (१ थेस्सलनी ५:२२). अनुकरण ही वाईट गोष्ट आहे जेव्हा आपण जे काही देवाच्या वचनाच्या मर्यादेबाहेर आहे त्याचे अनुकरण करण्याची वृत्ति ठेवतो.
आज, हे जवळजवळ अशक्य आहे की आपली जीवने गुपित ठेवावी. आपल्याकडे नेहमीच लक्ष दिले जाते आणि कशाप्रकारे तरी, आपली जीवने कोणावर तरी प्रभाव करीत असतात. ख्रिस्ताचे अनुकरण करण्याच्या जीवनशैलीच्या प्रभावाविषयी केवळ विचार करा जे तुमच्या भोवतालच्या जगावर करेल.
तुमच्या जीवनाचा काही भाग असा आहे काय ज्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे बदल हवा आहे?
तुमचे आई-वडील म्हणून कौशल्य सुधारावे, तुमचे आध्यात्मिक जीवन कसे सामर्थ्यशाली करावे हे शिकावे, कसे कार्य करावे हे शिकावे हे ते सर्व असू शकते? देवाची सेवा करण्यात उत्तम असे व्हावे किंवा एखादे संगीत वाद्य वाजविण्यात निपुण व्हावे याची तुम्हाला गरज आहे काय? प्रकरण काहीही असो, इतरत्र लोकांसाठी पाहा जे देवाच्या मागे चालत आहेत व काही विशेष भागात तुमच्यापेक्षा उत्तम असे आहेत ज्यामध्ये तुम्हाला बदल हवा आहे.
म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. (इब्री ६:१२)
प्रार्थना
जिवंत परमेश्वराच्या पवित्र आत्म्या, तुझा पुत्र, येशूचे अनुकरण करण्यास मला समर्थ कर, म्हणजे मी, व त्याद्वारे जे माझ्याभोवती आहेत त्यांच्यासाठी एक सामर्थ्यशाली आदर्श होऊ शकावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले● एका उद्देशाने जन्म घेणे
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका
● निराशेवर मात कशी करावी
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
टिप्पण्या