शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला तें मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो; ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करितात, आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठी असे करितो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजेअनिश्चितपणे धावत नाही. तसेंच मुष्टियुद्धही करितो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करीत नाही. तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन. (१ करिंथ ९: २४-२७)
कारण उन्नति ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे, व अरण्याकडूनही नव्हे. (स्तोत्रसंहिता ७५: ६)
एक जीवनचर्या जी तुम्ही निवड करिता'; एक बोलाविणे जे तुम्ही परमेश्वराकडून प्राप्त करता.
एक जीवनचर्या जी तुम्ही स्वतःसाठी करिता; एक बोलाविणे जे तुम्ही परमेश्वरासाठी करिता.
जेव्हा परमेश्वर आपल्याला बोलावितो, आपल्याला पूर्णपणेतयार व्हायला पाहिजे. परमेश्वराने गुणी लोकांना बोलाविलेले नाही परंतु जे'बोलाविलेले' आहेत त्यांना पात्र ठरवितो.
माझे असे म्हणण्याचा काय अर्थ आहे?
तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, हे प्रभु, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तूं आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासुनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यांस मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करितो? मी परमेश्वरच की नाही?तर आता जा, मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तूं काय बोलावयाचे तें तुला शिकवीन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभु, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांस संदेश पाठिव. (निर्गम ४: १०-१३)
परमेश्वराने मोशे ला बोलाविले की त्याच्या लोकांना मिसर मधील गुलामगिरीतून सोडवावे. परंतु मोशे ला वाटले की त्याच्या बोलण्याच्या कुशलतेच्या अभावामुळे तो देवाची योजना पूर्ण करण्यास अपात्र असा आहे. ह्याने देवाला त्यास वापरण्यापासून थांबविले नाही.
परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला एका उद्देशाने बोलाविले आहे. तथापि, आपल्या जीवनावरील त्या बोलाविण्यास आणि उद्देशाला पूर्ण करण्या अगोदर ज्या"दिसण्यासलहान गोष्टी" सध्या आपण करीत आहोत त्यामध्ये आपल्याला विश्वासू असे असले पाहिजे.
मुख्य प्रवाहात येण्याअगोदर कोणाला"लहान गोष्टींमध्ये" विश्वासू राहिले पाहिजे. दावीद सियोन मध्ये राजा असे राज्य करण्यास पात्र होण्याअगोदर, त्यास तीन ठिकाणी विश्वासू असे राहिले पाहिजे होते. त्यांची काळजीपूर्वक तपासणी करा कीतुम्हांला सुद्धा ह्या तीन परीक्षे मधून जायचे आहे:
१. बेथलेहमयेथे स्वतःच्या घरी
ह्या ठिकाणीच दावीद जबाबदार होण्यास शिकला; जीवनासाठी कमाविण्यास आणि त्याच्या कुटुंबियांनासाहाय्य करण्यास, परमेश्वराबरोबर त्याचे संबंध विकसित करण्यास, आणि इतरांच्या तिरस्कारावर वर्चस्व मिळविण्यास. परमेश्वर त्या पुत्रांना आणि पुत्रींना शोधत आहे जे पित्याचे कार्य हाती घेतील आणि केवळ आध्यात्मिक भटकी जमात राहणार नाही जे केवळ इतरत्र भटकत राहत आहेत.
२. अदुल्लामच्या गुहेत
अयोग्य आणि समाजातून बहिष्कृत लोकांमध्ये राहण्याअगोदर, दाविदाने कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता इतरांची सेवा करण्यास स्वतःला सोपवून देण्यास शिकले होते. त्याचे जीवन हे आक्रमण होण्याच्या स्थितीत असताना सुद्धा प्रीति आणि सेवा करण्यास शिकला होता. हे ते ठिकाण होते जेथे दाविदाचे बलाढ्य लोक तयार झाले होते. 'अदुल्लाम' येथे आपले राज्य मरते आणि परमेश्वराचे राज्य आपल्या द्वारे प्रदर्शित होते. हे येथेच परमेश्वर आपल्या हृदयाच्या प्रत्येक स्वार्थी आणि मतलबी हेतूंना व्यवस्थित करतो. दु:खद आहे की, आपल्यापैकी अनेक हे ह्या गुहे पर्यंत कधी पोहचतच नाही.
३. हर्मोन पर्वत
शब्द'हर्मोन' म्हणजे करार. हर्मोन पर्वत हे इस्राएल मध्ये सर्वात उंच ठिकाण होते. आणि तेथे वर जाण्यासाठी काही सोपा मार्ग नव्हता; तो सर्व मार्गाने फारच बिकट मार्ग होता. आणि हा तो मार्ग आहे जो कराराच्या सर्व संबंधात आहे. कराराच्या संबंधातपरिस्थितीच्या पर्वा विना नेहमीचप्रामाणीकपणाची, किंमतीच्या पर्वा विना सत्यता, दु:खाच्या पर्वा विना क्षमेची गरज लागते.
जेव्हा आपण अशा प्रकारे जगण्यास सुरुवात करतो, जग हे पुन्हा सियोना कडे (चर्च कडे)उत्तरासाठी लक्ष लावतील कारणपरमेश्वर आपल्यामध्ये कार्य करीत आहे हे ते पाहतील.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावात, मी तुझ्या कृपे साठी प्रार्थना करीत आहे की तूं बोलाविण्यानुसार पात्र असे चालावे ज्यासाठी मला सर्व नम्रता आणि सौम्यते मध्ये बोलाविले गेले आहे, शांतिसह, एकमेकांचेप्रीति द्वारे सहन करावे आणि शांतीच्या बंधनात आत्म्याची एकता जपण्यास उत्सुक असावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मोठया संकटात● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-३
● छाटण्याचा समय
● येशूचे प्रभुत्व कबूल करणे
● पवित्र आत्म्या विरुद्ध निंदा म्हणजे काय आहे?
● दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या