डेली मन्ना
एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे
Friday, 11th of October 2024
21
19
281
Categories :
नरक
कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. (लूक १६:१९)
आपल्याला ह्या मनुष्याचे नाव ठाऊक नाही. आपल्याला हे ठाऊक नाही की तो श्रीमंत मनुष्य होता का, आणिजो महागडी वस्त्रे घालीत असे आणि दररोज त्याच्या भोजनगृहात विशेष पक्वान्नांचा स्वाद घेत असे. आपल्याला हे ठाऊक आहे की ह्या मनुष्याला आणखी पाच भाऊ होते. (लूक १९: २८)
त्याच्या दरवाज्याजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. (लूक १६: २०-२१)
मग तेथे हा एक भिकारी होता ज्याचे नाव लाजर जो ह्या श्रीमंतमनुष्याच्या दरवाज्याजवळ बसत असे. हा तोच लाजर नाही ज्यास प्रभु येशूने मृत्युमधून पुन्हा उठविले होते.
ह्या मनुष्याचे संपूर्ण शरीर फोडांनी भरलेले होते आणि एकच समाधान त्यास होते की कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
ना ही ह्या श्रीमंत मनुष्याने किंवा त्याच्या पाच भावांनी ह्या मनुष्याविषयी विचार केला होता.
पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली; तो अधोलोकात यातना भोगीत असतांना त्याने आपली दृष्टि वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. (लूक १६: २२-२३)
असे दिसते की श्रीमंत मनुष्य आणि लाजर एकाच वेळी मरण पावलेले आहेत. श्रीमंत मनुष्याने मृत्यू समयी त्याचे डोळे बंद केले आणि तो उष्णता, ज्वाला आणि यातना यामध्ये झोपेतून उठला. उलट बाजूने, भिकारीला देवदूतांनी नेले आणि जेथे त्यास समाधान मिळाले. तेथे तो व्यक्तिगतरीत्या अब्राहाम जो विश्वासाचा जनक यास भेटला.
श्रीमंत मनुष्याने स्वतःला एका अनोख्या स्तरात पाहिले, पवित्रशास्त्रात ज्यास"शेओल" किंवा"हेड्स" असे म्हटलेले आहे.
तेव्हा त्याने हांक मारून म्हटले, हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठिव, ह्यासाठीकी त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी. मग तो म्हणाला, हे बापा, मी विनंती करितो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठिव. कारण मला पांच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांस इकडची साक्ष दयावी. (लूक १६: २४, २७-२८)
त्याच्या जीवन काळात, ह्याश्रीमंत मनुष्याला देवाचा काही विचार नव्हता आणि गरिबांसाठी कधी दया नव्हती. परंतु ह्या निघून गेलेल्या आत्म्याच्या ठिकाणी, तो प्रार्थना करू लागला.
मनोरंजक आहे, की त्याने ह्या पाताळाच्या तुरुंगातील उष्णता आणि ज्वाला मधून तो कधी निघू शकेल काय ह्याविषयी कधी विचारले नाही. कदाचित त्यास हे ठाऊक होते की ह्या ठिकाणाहून काही सुटका नाही.
ह्या मनुष्याने त्याच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली. त्याच्या आयुष्याच्या दरम्यान,स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करण्यास त्यास वेळ नव्हता. आज सुद्धा ह्या जगात असे लोक आहेत. कृपा करून त्यांच्यासारखे होऊ नका.
आणखी मनोरंजक गोष्ट ही की जरी श्रीमंत मनुष्याच्या शरीराला पुरले होते, त्याचा जीव आणि आत्मा हे सर्व पाच
इंद्रियांद्वारे कार्यरत होते. त्याने पुढील गोष्टींचा अनुभव केला:
१. अत्यंत अंधार (काळोख)
२. अग्नी ज्वाला (यातनामय दु:ख)
३. रडणे(खेद)
४. दात-पिसणे(क्रोध)
५. धूर(अत्यंत तहान)
६. ज्वालामयी ठिकाण (पीडा देणारी उष्णता)
७. किंचाळणे(यातनेत सतत दु:ख भोगणे)
८. दरी जी जोडू शकत नाही (कायमचे विभाजन)
९. मनुष्याचा संपर्क गमाविणे (कुटुंब, मित्र-अतिशय एकाकीपण)
१०. मानसिक संताप (मित्र, कुटुंब आणि सहयोगी द्वारे शुभवर्तमान चा नकार करण्याची आठवण)
ह्या कथेला अधिक महत्त्व येते कारण ती इतर शुभवर्तमानात उल्लेखलेली नाही-ही केवळ लूकच्या शुभवर्तमानात नोंदली आहे. याव्यतिरिक्त, दाखल्यांमध्ये, येशूने कधीही नावे सांगितलेली नाही, तरीसुद्धा ह्या विशेष वृत्तांत मध्ये, त्याने लाजर, अब्राहामआणि मोशे ची नावे दिली आहेत.
पवित्र शास्त्र जोर देऊन आपल्याला सांगते की, "ज्याअर्थी माणसांना एकदांच मरणे व त्यानंतर [निश्चित वेळे नंतर]न्याय होणे नेमून ठेवले आहे." (इब्री ९: २७)
आपण जे सध्या जगत आहोत ते ह्या जीवनातून नाहीसे होऊ. जेव्हा आपण ह्या मातीच्या कवचातूननिघून जाऊ, येथे केवळ दोनच स्थान आहेत जेथे आपला अमर आत्मा आणि जीव हे पुनरुत्थान व न्यायाच्या दिवसा पर्यंत राहतील.
एका ठिकाणी, मृत हे कदाचित प्रार्थना करीत (श्रीमंत मनुष्या प्रमाणे)आहेत की तुम्ही तेथे कधी येऊ नये. दुसऱ्या ठिकाणी, तेथे महायाजक आपल्यासाठी देवाच्या सिंहासनासमोर सतत मध्यस्ती करीत आहे.
स्वर्ग हा इतका खरा आहे तसेच नरक सुद्धा. कृपा करून जीवन निवडा-येशू ख्रिस्ता मध्ये सार्वकालिक जीवन (योहान ३: १६-१७). तुमच्या कुटुंबांच्या तारणासाठी कळकळीने प्रार्थना करा.
प्रार्थना
प्रिय प्रभु येशू, मी विश्वास ठेवतो की तूं देवाचा पुत्र आहेस.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #2
● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे
● विचलित होण्याच्या वाऱ्यामध्ये स्थिर
● महाकाय लोकांचे वंशज
● हेतुपुरस्सर शोध
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम
टिप्पण्या