“तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” (गलती. 6:4)
आजच्या समाजात, तुलना करण्याच्या सापळ्यातून निसटणे हे जवळजवळ अशक्य असे आहे. सामाजिक माध्यमे, जीवनाच्या कारकिर्दीमधील प्राप्ती, आणि वैयक्तिक नातेसंबंध देखील आपल्याला अपुरेपणाच्या भावनेने भरून टाकू शकतात. आपण सतत दुसऱ्यांच्या विरोधात आपल्या जीवनाच्या यशाचे मूल्य ठरवत राहतो -मग ते मित्राचे यश असो, इतर कोणाचे स्वरूप असो, किंवा आपण ऑनलाईन पाहत असलेल्या लोकांचे यश असो. अशी तुलना करणे ही नेहमी आपल्याला जसे काही आपण काहीच नाही अशी भावना देते, जसे काही आपण जीवनात अयशस्वी होऊन गेलो आहोत. परंतु देवाने दिलेली आपल्या स्वतःची ओळख आणि उद्देश स्वीकारण्यापासून आपल्याला रोखण्यासाठी शत्रू तुलना करणे हे धोकादायक साधन वापरतो.
तुलना करणे हे इतर कोणाच्या जीवनाकडे केवळ निरुपद्रवी नजर टाकण्यापेक्षा अधिक आहे. ते आपल्या सत्यतेला विकृत करू शकते, आपला आनंद हिरावून घेते, आणि आपल्याला निराशा आणि कटुत्वाच्या मार्गावर नेते. देव आपल्या जीवनात काय करत आहे त्यामध्ये संतुष्ट राहण्याऐवजी, तो दुसऱ्यांच्या जीवनात काय करत आहे त्याने ग्रासून जातो. परंतु बायबल स्पष्ट आहे : आपल्याला दुसऱ्यांची शर्यत नाही, तर आपल्या स्वतःची शर्यत धावण्यास बोलावले गेलेले आहे.
देवाचे महान लोक देखील तुलना करण्याच्या सापळ्यात अडकलेले आहेत. एलीयाचा विचार करा, बायबलमधील तो एक सर्वात सामर्थ्यशाली संदेष्टा होता, ज्याने त्याच्याद्वारे देवाला चमत्कार करताना पाहिलेले होते. तरीही, 1 राजे 19:4मध्ये, अशक्तपणा आणि थकव्याच्या क्षणी, एलीयाने आक्रोश केला, “मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही.” देवाने त्याच्या द्वारे सर्व अविश्वसनीय कार्ये केलेली असतानाही, एलीयाचे ध्यान तुलना करण्याकडे गेले आहे. त्याच्या निराशेमध्ये, त्याने दुसऱ्यांकडे पाहिले-कदाचित त्यांच्याकडे जे त्याच्यापूर्वी होऊन गेले होते-आणि निष्कर्ष काढला की त्याचे स्वतःचे प्रयत्न हे अपुरे असे आहे. त्याला अयोग्य असे वाटले.
देव त्याच्या जीवनात काय करत होता त्या सत्यतेला एलीयाच्या तुलना करण्याने विकृत केले. देवाने जे चमत्कार आणि विजय त्याला दिले होते त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तो अपुरेपणाच्या भावनेने भारावून गेला होता. देवाचा त्याच्यासाठी उद्देश हा एकमेव आहे हे तो विसरला होता, ज्याप्रमाणे त्याचा उद्देश हा आपल्या सर्वांसाठी एकमेव असा आहे. देवाने एलीयाला त्याच्या वाडवडिलांबरोबर तुलना करण्यास सांगितलेले नव्हते -त्याने त्याला त्याचे विशेष सेवाकार्य करण्यास बोलावलेले होते. आणि एलीयासारखे, आपल्यासाठी देवाच्या एकमेव योजनेकडे आपण दुर्लक्ष करतो जेव्हा आपण आपल्या स्वतःची दुसऱ्यांबरोबर तुलना करू लागतो.
तुलना करणे हे धोकादायक आहे कारण ती चुकीची प्रतिमा निर्माण करते. देवाचा आपल्यासाठी आशीर्वाद हा दुसऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा कसेतरी उत्तम किंवा अधिक मौल्यवान आहे हे आपल्याला पटवून देतो. हे मग ज्या लोकांची आपण काळजी करतो त्यांच्याप्रती मत्सर, द्वेष आणि संताप करण्याची भावना आणते. परंतु गलती. 6:4 आपल्याला स्मरण करून देते की आपण आपल्या स्वतःच्या कृत्यांची परीक्षा करावी आणि देवाने आपल्यापुढे जी धाव ठेवली आहे त्याकडे लक्ष लावावे. जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या प्रवासाची दुसऱ्यांशी तुलना न करता तपासणी करतो तेव्हा देव आपल्या जीवनात काय करत आहे त्यामध्ये आपण अभिमान बाळगू शकतो. आपण प्रत्येक जण हा एका वेगळ्या मार्गावर आहे, आणि आपल्या जीवनासाठी देवाची वेळ आणि योजना सिद्ध आहे.
सत्य हे आहे की देव कधीही चूक करीत नाही. त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी उद्देश आणि योजना आहे जी इतर कोणाहीपेक्षा वेगळी आहे. त्याने तुम्हाला विशेष दान, अनुभव आणि संधी यांनी सज्ज केले आहे जे तुमच्या प्रवासासाठी तयार केलेले आहे. दुसऱ्यांशी तुलना करण्यात वेळ घालवण्याऐवजी, देवाने तुमच्यापुढे ठेवलेले आशीर्वाद आणि संधी जोपासण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याने आधीच जे विजय तुम्हाला दिलेले आहेत ते साजरे करा आणि तुमच्यासाठी त्याची योजना प्रत्यक्षात जशी घडली पाहिजे तशीच घडत आहे यावर भरवसा ठेवा.
तुलना करण्याच्या सापळ्यात तुम्ही जेथे पडला होता त्यावर विचार करण्यासाठी काही क्षण घ्या. तुम्ही सतत इतर कोणाच्या जीवनाबरोबर तुमच्या जीवनाच्या यशाची तुलना करत आहात काय? तुमचे आयुष्य दुसऱ्यांपासून वेगळे दिसत आहे यामुळे तुम्हाला निराशा वाटत आहे काय? लक्षात ठेवा देवाची तुमच्यासाठी योजना ही परिपूर्णपणे योजिलेली आहे. त्याला तुमच्या गरजा, तुमच्या इच्छा, आणि तुमचे स्वप्न ठाऊक आहेत, आणि कल्याण करण्यासाठी तो सर्व गोष्टी मिळून कार्य करत आहे. (रोम. 8:28)
तुमच्या स्वतःची दुसऱ्यांशी तुलना न करावी यासाठी कटिबद्ध व्हा. त्याऐवजी, तुमच्या स्वतःच्या कृत्यांची परीक्षा करण्यावर लक्ष द्या, जसे गलती. 6:4 आपल्याला प्रोत्साहन देते. तुमच्या एकमेव मार्गाची तुम्ही प्रशंसा करावी यासाठी देवाजवळ विनंती करा, आणि त्याने जे चांगले काम तुमच्यात सुरु केले आहे ते पूर्ण करण्यास तो विश्वासू आहे हे ओळखा. (फिलिप्पै. 1:6)
या आठवड्यात प्रत्येक दिवशी, तुमच्या जीवनाच्या प्रवासातील एका गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ आहात ते लिहून काढा. देवाने तुमच्या जीवनात कसे कार्य केले यावर मनन करा, मग आशीर्वाद किती मोठा किंवा लहान आहे याची पर्वा करू नका. तुमच्या स्वतःच्या मार्गासाठी जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू लागता तेव्हा देव तुमच्यासाठी विशेषकरून जे करत आहे त्याची सुंदरता तुम्ही पाहू लागाल.
प्रार्थना
पित्या, मला तुलना करण्याच्या सापळ्यापासून मुक्त कर. माझ्या जीवनासाठी तुझ्या एकमेव योजनेवर भरवसा ठेवण्यास आणि तू मला दिलेले आशीर्वाद साजरे करण्यासाठी मला मदत कर. माझ्या प्रवासासाठी तू मला सज्ज केलेले आहे आणि तुझी वेळ परिपूर्ण आहे याची मला दररोज आठवण करून दे. येशूच्या नावाने, आमेन
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत● देवाच्या मंदिरातील स्तंभ
● ख्रिस्तासाठी राजदूत
● मानवी हृदय
● दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
● रहस्य स्वीकारणे
टिप्पण्या