डेली मन्ना
दिवस ३३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Tuesday, 24th of December 2024
30
22
268
Categories :
उपास व प्रार्थना
मला तुझ्या दयेची आवश्यकता आहे
“तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.” (उत्पत्ती ३९:२१)
त्रासांपैकी एक जिचा लोक अनुभव करतात जेव्हा ते एका अनोळखी देशात आहेत ते हे आहे की त्यांना कदाचित साहाय्य आणि संसाधनांचा अभाव होईल. परंतु येथे योसेफ हा तुरुंगात आहे, एका अनोळखी देशात, आणि जेथे कोठे तो गेला देवाने त्याच्यावर दया दाखवली आणि लोकांच्या दृष्टीसमोर त्याच्यावर कृपा केली. जर योसेफ तुरुंगात देवाची दया आणि कृपेचा आनंद घेऊ शकतो, तर याचा अर्थ तो तुरुंगात जाण्यापूर्वी पासून त्याचा आनंद घेत होता.
आपल्यासाठी जीवनात लोकांकडून चांगल्या गोष्टींचा आनंद घ्यावा आणि आपल्या नशिबाला पूर्ण करण्यासाठी देवाच्या दयेची आवश्यकता लागते. देवाच्या दयेशिवाय, शत्रूकडून अनेक न्याय आणि दोष आपल्या जीवनावर नकारात्मकदृष्ट्या परिणाम करू शकतात.
आपण परिपूर्ण नाही, आणि त्याचा अर्थ आपली पापी कृत्ये जी चुकीने केलेली आहेत ती न्यायाकडे नेऊ शकते. परंतु देवाची दया जी आपल्याला राखते आणि आपला सांभाळ करते, आणि त्याच्या कृपेचा आनंद आपल्याला घेऊ देते. आजच्यासाठी आपले अटळ वचन दाखवते की माणसाला कृपेचा आनंद घेण्यासाठी, त्याने देवाच्या दयेचा धावा केला पाहिजे.
निर्गम अध्याय ३३, वचन १९ मध्ये, देव म्हणतो, “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर ‘परमेश्वर’ ह्या नावाची मी घोषणा करीन; ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन.”
जेव्हा देव माणसाला दया दाखवतो, तेव्हा इतर ज्या गोष्टींचा आनंद घेण्यात संघर्ष करत आहेत त्यांचा तो आनंद घेईल.
देवाच्या दयेची आपल्याला का आवश्यकता आहे?
जरी, मी पुष्कळ वेळा याचा उल्लेख केलेला आहे, तरी आपल्याला देवाच्या दयेची का आवश्यकता आहे याची मी यादी देईन. (ही व्यापक यादी नाही)
- न्यायावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला देवाच्या दयेची आवश्यकता आहे. (याकोब २:१३)
- आपल्या जीवनाच्या विरोधातील दुष्टाचे लिखाण पुसून टाकण्यासाठी देवाच्या दयेची आपल्याला आवश्यकता आहे. (कलस्सै. २:१४)
- देवाची कृपा आणि आशिर्वादांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला देवाच्या दयेची आवश्यकता आहे.
- जेव्हा आपण निष्काळजीपणे त्याच्या वचनाचे उल्लंघन करतो तेव्हा आपल्याला देवाच्या दयेची आवश्यकता आहे.
- देवापासून चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपल्याला देवाच्या दयेची आवश्यकता आहे.
- त्याच्या उपस्थितीत जाण्यासाठी आपल्याला देवाच्या दयेची आवश्यकता आहे. त्याच्या दयेशिवाय आपण त्याच्या उपस्थितीत जाऊ शकत नाही. (निर्गम २५:२१-२२)
- आपल्या जीवनाला दोष देणाऱ्याला गप्प करण्यासाठी आपल्याला देवाच्या दयेची आवश्यकता आहे. (योहान. ८:७-११)
- आपल्या विरोधात उद्धेशून केलेले वाईट, संकटे, यातना, आणि दुष्ट कृत्यांचे सर्व प्रकार थांबवण्यासाठी आपल्याला देवाच्या दयेची आवश्यकता आहे. ही देवाची दया आहे जी आपल्याला देवाची शक्ती आणि आशीर्वादांचा अनुभव आणि आनंद करू देईल.
मार्क. १०:४६-५२ मध्ये, आंधळा बार्तीमयाने आक्रोश केला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.’ तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले; पण तो अधिकच ओरडू लागला, ‘अहो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.’ तेव्हा येशू थांबून म्हणाला, ‘त्याला बोलवा,’ मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, ‘धीर धर; ऊठ, तो तुला बोलावत आहे.’ तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, ‘मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?’ आंधळा त्याला म्हणाला, ‘गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी.’ येशू त्याला म्हणाला, ‘जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.’ तेव्हा लगेचच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला.”
दावीद हा आणखी एक माणूस आहे ज्याने देवाच्या दयेचा आनंद घेतला. त्याने देवाच्या दयेला समजले होते आणि त्याच्याविषयी स्त्रोत्रसंहितेच्या पुस्तकात त्याच्याबद्दल बोलले होते.
देवाच्या दयेवर दाविदाचे काही स्तोत्रे मला तुम्हांला दाखवू दया:
- स्तोत्र. ४:१ “हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक; मला तू पेचांतून मोकळे केले आहेस; माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.”
- स्तोत्र. ६:२ “हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर.
- स्तोत्र. ९:१३ “हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणाऱ्या, माझा द्वेष करणाऱ्यांपासून मला झालेली पीडा पाहा.”
- स्तोत्र. १३:५ “मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल.”
- स्तोत्र. २३:६ “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.”
- स्तोत्र. २५:७ “हे परमेश्वरा, माझी तारुण्यातील पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.”
- स्तोत्र. ३०:१० “हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य कर.”
दयेसाठी ओरड देवाचे लक्ष वेधून घेते. ते सोडवू शकते. ते बरे करू शकते. ते साहाय्य करू शकते.
- स्तोत्र. ३२:१० “दुर्जनाला पुष्कळ दु:खे भोगावी लागतात; परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते.”
- स्तोत्र. ३३:१८ “पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात.”
आज, माझी इच्छा आहे की तुम्ही देवाच्या दयेसाठी ओरड करावी. मी ही काही स्तोत्रे तुम्हांला सांगितली आहेत म्हणजे तुम्हांला दयेबद्दल गहन समज प्राप्त व्हावी. देवाने मध्यस्थी करावी म्हणून तुम्हांला कोठे आवश्यकता आहे हे मला माहित नाही परंतु आज तुम्ही जर दयेसाठी ओरड केली, तर तुम्हांला कोठे दयेची आवश्यकता आहे ते स्पष्ट करा, तेव्हा तुम्ही देवाच्या दयेचा आनंद घ्याल.
Bible Reading Plan : 1 Timothy 6 - Hebrews 1
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, आणि मला साहाय्य कर. (स्तोत्र. ५१:१)
२. हे परमेश्वरा, मला तुझी दया दाखव आणि मनुष्यांकडून मला कृपा प्राप्त व्हावी असे येशूच्या नावाने होऊ दे. (स्तोत्र. ९०:१७)
३. परमेश्वरा, तुझी दया मजवर असू दे आणि जेथे कोठे मी जाईन तेथे माझ्याबरोबर असावी असे होऊ दे. (स्तोत्र. २३:६)
४. परमेश्वरा, तुझ्या दयेने, येशूच्या नावाने मला सोडव आणि मला साहाय्य कर. (स्तोत्र. ७९:९)
५. हे परमेश्वरा, येशूच्या नावाने तुझ्या दयेने मला बरे कर. (स्तोत्र. ६:२)
६. पित्या, माझा आशीर्वाद, माझे गौरव आणि माझ्या जीवनाच्या विरोधातील शत्रूच्या सर्व हल्ल्यांपासून आणि मृत्युपासून मला तुझ्या दयेने येशूच्या नावाने मुक्त कर. (स्तोत्र. ११६:८)
७. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, आणि मला दया दाखव. पुष्कळ वर्षे ज्या प्रत्येक प्रार्थना मी करत आहे. पित्या, या हंगामात मला दया दाखव. येशूच्या नावाने या प्रार्थनांची उत्तरे मला प्रदान कर. (१ योहान. ५:१४-१५)
८. पित्या, तुझ्या दयेने, माझ्या विरोधातील प्रत्येक वाणीला शांत कर. माझ्या जीवनाच्या विरोधात उद्देशून केलेल्या प्रत्येक न्यायावर तुझ्या दयेने येशूच्या नावाने विजय मिळवून दे. (याकोब २:१३)
९. पित्या, तुझ्या दयेने, येशूच्या नावाने माझ्या पापांसाठी मला क्षमा कर आणि प्रत्येक प्रकारच्या अधार्मिकतेपासून मला शुद्ध कर. (१ योहान. १:९)
१०. हे देवा, येशूच्या नावाने आशीर्वादाच्या पुनर्स्थापनेसाठी आणि माझ्या मालमत्तेवर ताबा घेण्यासाठी मला तुझ्या दयेची आवश्यकता आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशू कडे पाहत● पैसा चरित्राला वाढवितो
● वेदी व देवडी
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● वरील आणि समानांतर क्षमा
● येशूचे प्रभुत्व कबूल करणे
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
टिप्पण्या