डेली मन्ना
24
16
187
आध्यात्मिकदृष्टया तुम्ही योग्य आहात काय?
Sunday, 29th of June 2025
Categories :
आध्यात्मिक तंदुरुस्ती
आपल्यापैंकी अनेक जण हे शारीरिक आरोग्याबद्दल विचार करतात आणि ते चांगले आहे. आपण व्हीटयामीन घेतो, हिरव्यापालेभाज्या खातो, पाणी पितो, पायऱ्या चालतो वगैरे. जरी आपण त्याबाबतीत इतके चांगले नसलो तरी, आपण त्याबाबतीत चांगले होण्यासाठी वेगवेगळे मार्ग व अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपले आध्यात्मिक आरोग्य, आपले आध्यात्मिक सशक्त राहण्याबद्दल आपण किती काळजी घेत आहोत?
स्वयं चा आध्यात्मिक हिशोब घेणे हे महत्वाचे आहे म्हणजे आपण असे करणार नाही...
१. परमेश्वरा मध्ये सामर्थ्य गमाविणार नाही
२. वाया घालविणार नाही, की केवळ आपल्याला जगाबरोबर एक झालेले असे पाहावे.
३. ज्याचा हेतू नाही तेवढे वजन किंवा ओझे प्राप्त करावे जे आपण घेऊन चालावे असा अर्थ नव्हता
४. आपली अंत:करणे (आत्मे) निरोगी पाहावी
आपल्या स्वतःला ईश्वरीयगुणानुसार (भक्तिभावाने) प्रशिक्षित करा, [आपल्या स्वतःला आध्यात्मिकदृष्टया सशक्त असे ठेवावे] (१ तीमथ्यी ४:७ ऐम्पलीफाईड)
आध्यात्मिकदृष्टया सशक्त असण्यासाठी आध्यात्मिक प्रशिक्षणाची गरज आहे. बायबल आपल्याला प्रोत्साहन देते की आपल्या स्वतःला आध्यात्मिकदृष्टया बाबतीत प्रशिक्षित करावे.
आता प्रशिक्षण हे कार्यक्रम होण्याच्या खूप अगोदर केले जाते आणि कार्यक्रम होणाऱ्या दिवशी नाही. दाविदाने प्रशिक्षणास सुरुवात केली नाही की गल्ल्याथ ला त्या सकाळी मारावे. अनेक ख्रिस्ती लोक हे तेव्हा प्रशिक्षण घेऊ लागतात जेव्हा ते समस्यांना तोंड देतात. अगोदरच प्रशिक्षित व्हा म्हणजे जेव्हा प्रसंग तुमच्यासमोर उभा राहतो, तेव्हा तुम्ही अगोदरच सज्ज आहात की त्या गोष्टीला हाताळावें. हे अत्यंत महत्वाचे आहे व तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करण्यास पाहू नका जे मी तुम्हाला आत्म्याने शिकवीत आहे.
कारण शारीरिक कसरत ही काही कामाची आहे (थोडक्या बाबतीत उपयोगी आहे), परंतु ईश्वरीयपणा (आध्यात्मिक प्रशिक्षण) हा उपयोगी आहे व सर्व बाबतीत व सर्व मार्गांनी महत्वाचा आहे, कारण त्यात वर्तमान जीवनासाठी आश्वासन आहे व तसेच येणाऱ्या जीवनासाठी सुद्धा आहे. (१ तीमथ्यी ४:८ ऐम्पलीफाईड)
तुम्ही तुमच्या स्वतःला कसे प्रशिक्षित करावे या पायऱ्यांवर मला तुम्हांला घेऊन जाऊ दया.
१. आध्यात्मिक आरोग्य योग्य आध्यात्मिक अन्नाने सुरु होते
जसे नवे अर्भक, वचनाच्या शुद्ध दुधाची इच्छा करते, जेणेकरून तुमची कदाचित वाढ व्हावी (१ पेत्र २:२)
योग्यरीत्या पोषण केले जाण्यासाठी, तुम्हाला देवाचे वचन नियमितपणे वाचण्याची गरज आहे. मी काल शिकविले, कोणी बायबल कसे वाचले पाहिजे. तसेच तुम्हाला शुभवर्तमान केंद्रित चर्च ला जाण्याची गरज आहे, की तुमच्या स्वतःला योग्य आध्यात्मिक अन्नाने पोषण करावे.
आजच्या दिवसांत मी पाहत आहे अनेक जण शुभवर्तमान केंद्रित चर्च ला जाणे गंभीरपणे घेत नाही. ते असे करतात जेव्हा तसे करण्यास त्यांना वाटते किंवा वेळ मिळतो. असे लोक देवाच्या गोष्टीत पुढे अधिक प्रगती करीत नाहीत आणि नेहमी आध्यात्मिकदृष्टया थंडगार होतात. अशा लोकांसारखे होऊ नका जर तुम्हाला आध्यात्मिकदृष्टया सशक्त व्हायचे आहे.
२. आध्यात्मिक आरोग्यासाठी निरंतर शिस्तीची आवश्यकता असते
कोणीतरी म्हटले आहे, "शिष्य होणे हे शिस्तबद्ध होणे आहे", जेव्हा तुमचा मित्र तोंडाला पाणी आणणारे बर्गर खात आहे तेव्हा कोणालाही सलाड खाणे आवडणार नाही –तुम्हाला तसे करणे हे केवळ आवडणार नाही.
जे काही तुम्ही शिकला, प्राप्त केले, ऐकले व जे माझ्यामध्ये पाहिले आहे ते आचरणात आणा, आणि तुमचे जगणे त्या मार्गाचा आदर्श ठेवीत जगा, आणि शांतीचा परमेश्वर [संकट व व्यत्यय विना कल्याण] तुमच्याबरोबर राहील (फिलिप्पै ४:९ ऐम्पलीफाईड)
आचरणात आणा
१. जे तुम्ही शिकला आहात
२. जे प्राप्त केले आहे (तुम्हाला मिळाले आहे)
३. ऐकले आहे
४. व माझ्यामध्ये पाहिले आहे
५. तुमचे जगणे त्यावर आधारित करा आणि शांतीचा परमेश्वर [संकट व व्यत्यय विना कल्याण] तुमच्याबरोबर राहील.
तुम्हाला ह्या पाच गोष्टी आचरणात आणण्याची गरज आहे म्हणजे आध्यात्मिकदृष्टया तुम्ही प्रखर व्हावे.
३. आध्यात्मिक गिरणी
प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. (यहूदा २०)
जितक्या वेळा तुम्ही करू शकता व जेथेकोठे तुम्ही करू शकत अन्य भाषे मध्ये बोला. तुमचा आध्यात्मिक मनुष्य प्रज्वलित व प्रखर होईल.
Bible Reading: Psalms 40-47
प्रार्थना
मी करणारा आहे व विसरणारा ऐकणारा नाही. मी सकारात्मक परिणाम पाहीन ज्याची मी कधी कल्पना देखील केली नसेन. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel

Most Read
● दिवस १६ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● स्तुति ही जेथे परमेश्वर वास करतो
● २१ दिवस उपवासः दिवस ०७
● या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंद कसा अनुभवायचा
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
● प्रार्थनेची निकड
● दानधर्म करण्याची कृपा-२
टिप्पण्या