तुम्ही कधी असे म्हणताना ऐकले आहे काय, "जग हे जागतिक गाव आहे?" इतके विस्तृत व असंख्य लोकांनी भरलेले हे जग, त्याची एका गावा बरोबर तुलना कशी करू शकतात? एक गाव हे एक लहान रचना आहे जेथे व्यवहारिकपणे प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखत असतो आणि दुसऱ्या व्यक्तीकडून काहीही लपून राहत नाही. आता मी विश्वास ठेवतो की जगाचे हे वर्णन हे कधी नाही इतके उत्तम असे आहे.
असे म्हटले आहे की कोणीही मनुष्य एका बेटा सारखे जगू शकत नाही. याचा सरळपणे अर्थ हा आहे की कोणताही एक व्यक्ति त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींच्या साहाय्याशिवाय व त्याच्या किंवा तिच्या जीवनात त्यांच्या एक किंवा इतर मार्गा द्वारे काही सूचनांवाचून त्याच्या स्वतःहून जिवंत राहू शकत नाही. वास्तवात, मानवतेसाठी देवाची ती रचना पद्धत होती. देवाने आपल्याला निर्माण केले नाही की आपण कधीही एकटेच राहावे. बायबल प्रारंभापासून म्हणत आहे, "त्याने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले, पुरुष किंवा स्त्री असे म्हणत नाही" (उत्पत्ति ५:२ वाचा). हे दाखविण्याकडे हे नेते की वातावरणीय पद्धत तेव्हाच संतुलित होते जेव्हा आपण सर्व जण आपले मन एक करतो की लोकांचा एक संघटीत समाज असे जगावे.
तुम्ही तुमच्या मनात विचार करीत आहात काय, "ठीक, पण मला वाटते ते मला पटत नाही, मी अत्यंत दु:खी झालो आहे, आणि मला केवळ एकटेच राहावे असे वाटते." आणखी इतर कदाचित असे म्हणतील, "ओह, मला खातरी नाही की मी संबंध ठेवणारा व्यक्ति आहे, मी फार सहज दु:खी होतो, आणि अशामुळे लोक माझ्यापासून दूर होतात. ठीक, त्यामुळेच परमेश्वर आज तुझ्याबरोबर बोलत आहे.
एके दिवशी, अभिषेक मध्ये वाढण्यासाठी मी संपूर्ण दिवस उपास व प्रार्थनेत घालविण्याचा निर्णय केला. संपूर्ण दिवस निघून गेला, आणि मी वचन, दृष्टांत साठी-देवापासून काहीतरी साठी वाट पाहत होतो. फार उशिरा संध्याकाळी, परमेश्वर माझ्याबरोबर अत्यंत घनिष्ठतेमध्ये रोम १२:१८ द्वारे बोलू लागला, "जितके तुला शक्य होईल तितके, सर्व मनुष्यांबरोबर शांतीमध्ये राहा." रोम १२:१८ टीपीटी भाषांतर म्हणते, "तुझ्याकडून सर्वात चांगले ते कर की सर्वांचे मित्र व्हावे." मत्तय ५:९ मध्ये त्याच्या संदेशा मध्ये, प्रभु येशूने म्हटले, "शांति करणारे धन्य आहेत, कारण त्यास देवाची मुले म्हणतील." तो एक मार्ग आहे की देवाचे मुल म्हणून तुमची ओळख सिद्ध करावी की नेहमीच शांतीचा शोध घ्यावा.
शांतीचा शोध घेणे याचा अर्थ हा नाही की सर्व जण तुमच्यासारखे होतील आणि अचानकपणे चांगले वागू लागतील. नाही. याचा सरळपणे अर्थ हा आहे की त्यांची कृत्ये व प्रत्युत्तराची पर्वा न करता, तुम्ही शांति करणारे एक पुरुष आणि एक स्त्री होण्याची निवड करता. त्यांच्या चुका व अशक्तपणाला सोडून दया व शांतीचा शोध करा.
मार्क ९:५० मध्ये प्रभु येशूने हे सुद्धा म्हटले, "मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपण गेला तर त्याला रुचि कशाने आणाल? तुम्ही आपणांमध्ये मीठ असू दया व एकमेकांबरोबर शांतीने राहा." तुम्ही हे समजले काय?
तुम्ही एक महत्वाचे व्यक्ति आहात, ज्याप्रमाणे मीठ हे अन्ना साठी महत्वाचे आहे. म्हणून तुमचे सहकारी, तुमच्या मंडळीचे सभासद, तुमचे शेजारी इत्यादि बरोबर शांतीने राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. एक विषारी व्यक्ति बनू नका कारण देवाचे एक मुल म्हणून ते तुमची स्थिती दाखवीत नाही.
अनेक वेळेला, आपल्याला लोकांना आपल्या मनाची शांति दयावी असे वाटते. परंतु कोणत्या क्षणापर्यंत. "ओह, ते विचार करतील की मी मूर्ख व अशक्त आहे," परंतु तुम्ही तसे नाहीत, ती एक वास्तविकता आहे. असे होवो की तुमच्या मुखातून सांत्वनकारक शब्द बाहेर पडो. तुमच्या सामाजिक माध्यमावर प्रोत्साहनपर व आशीर्वादाचे शब्द लिहा, कुत्सितपणे कोणाला तरी उद्देशून किंवा तुमच्या द्वेषपूर्ण भावना कोणावर तरी व्यक्त करून नाही.
आणि शांति करणारे व्हावे असा जेव्हा तुम्ही निर्णय करता, तुम्ही एक जग निर्माण करीत आहात जे वास्तवात एक जागतिक गाव असे आहे. शांति जी तुम्ही पाठविता, ते इतरांकडे लहरी प्रमाणे जाते आणि जास्त उशीर होणार नाही, की प्रत्येकाला तुमच्या सभोवती राहण्यास आवडेल. हे कदाचित रातोरात होणार नाही परंतु तसा प्रयत्न करा, हे निश्चितच कार्य करते.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी कबूल करतो की मी शांति करणारा आहे. प्रत्येक परिस्थिती मध्ये व प्रत्येक ठिकाणी शांतीचा सुगंध माझ्या द्वारे दरवळत जातो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रीति साठी शोध● दिवस १२ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● देवाच्या कृपेवरून सामर्थ्य मिळविणे
● देवाचे प्रत्यक्ष गुणवैशिष्ट्ये
● दिवस ३८ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● एका उद्देशाने जन्म घेणे
● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
टिप्पण्या