डेली मन्ना
दिवस ३६:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Friday, 27th of December 2024
24
21
289
Categories :
उपास व प्रार्थना
रात्रीच्या युद्धांवर प्रभुत्व करणे
“लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला... तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’ तो त्यांना म्हणाला, ‘हे काम कोणा वैऱ्याचे आहे.’ ....” (मत्तय. १३: २५, २७-२८)
शत्रू रात्रीच्या वेळी जास्त गोष्टी करत आहे जेव्हा लोक झोपलेले आहेत. आपण जागरूक राहावे आणि रात्रीची युद्धे लढावी अशी देवाची इच्छा आहे.
मध्यरात्रीच्या वेळी तुमचे संरक्षण हे तुम्ही तुमच्या आत्म्यात काय भरले आहे यावर आधारित आहे. जर तुमचा आत्मा कमकुवत आणि क्षुल्लक आहे, तर शत्रूला हल्ला करण्यास सोपे जाईल.
स्वप्ने ही शक्तिशाली आहेत, जे घडत आहे, जे घडलेले आहे किंवा जे आता घडणार आहे ते प्रकट करतात. शत्रू रात्रीचा फिरत असतो, कोणाला गिळावे म्हणून पाहत असतो. आज जे वचन आपण वाचले आहे ते प्रकट करते की लोक चांगल्या बियांची पेरणी करू शकतात परंतु रात्रीच्या कृत्यांमुळे काहीतरी वेगळेच उत्पन्न होऊ शकते.
आज आपण रात्रीच्या प्रत्येक शक्तीला नष्ट करण्यासाठी आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रार्थना करणार आहोत. रात्रीच्या वेळी येथे युद्धे आहेत; तर विश्वासणारे म्हणून, तुम्ही झोपण्यापूर्वी कळकळीने प्रार्थना केली पाहिजे किंवा मध्यरात्रीच्या वेळी उठून कळकळीने प्रार्थना केली पाहिजे. जर तुम्हांला या भागात कृपेचा अभाव आहे, तर तुम्ही आवश्यक शक्तीसाठी देवाजवळ प्रार्थना करू शकता.
निर्गम ११:४ म्हणते, “परमेश्वर असे म्हणतो की, आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिसर देशातून फिरेन.”
देव सुद्धा मध्यरात्रीच्या सुमारास कार्य करतो. त्याने मिसर देशाचा न्याय मध्यरात्रीच्या वेळी केला.
मध्यरात्रीच्या सुमारास, शत्रू स्वप्नांद्वारे मारू शकतो किंवा लोकांच्या शरीरात आजार टाकू शकतो.
मध्यरात्रीचे हल्ले लैंगिक सुख किंवा खाण्याच्या स्वप्नांद्वारे प्रकट होऊ शकतात, जे आध्यात्मिक हल्ल्याची चिन्हे आहेत. युद्ध आणि सुटकेकडे तुम्ही लक्ष द्यावे म्हणून मी तुम्हांला सांगत आहे म्हणजे तुम्ही प्रार्थना करू शकता आणि तुमचे जीवन, कुटुंब आणि मुलांच्या विरोधातील दुष्टाच्या कृत्यांना नष्ट करू शकता.
स्तोत्र. ११९:६२, म्हणते, “तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकारस्मरण करण्यास मी मध्यरात्री उठतो.”
स्तोत्रकर्त्याने मध्यरात्रीच्या शक्तीला ओळखले होते. धन्यवाद देणे, उपासना आणि देवाची स्तुती करण्यासाठी तुम्ही मध्यरात्री उठू शकता. प्रेषित. १६:२५-२६ आपल्याला सांगते की मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सीला यांनी प्रार्थना केली आणि देवाला स्तुतीस्पद गीते गाईली, त्याचा परिणाम तुरुंगातून सुटका झाली.
जर तुम्ही मध्यरात्रीच्या वेळी प्रार्थना करत नसाल, तर सुरुवात करण्यासाठी मी तुम्हांला प्रोत्साहन देत आहे. ती ३० मिनिटे किंवा १५ मिनिटे असू शकते; ते तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे.
Bible Reading Plan: 1 Peter 1 - 1 John 1
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशूच्या नावाने, मध्यरात्रीच्या सुमारास माझ्या विरोधात सोडलेल्या प्रत्येक बाणाला मी खोलतो आणि उध्वस्त करतो. (स्तोत्र. ९१:५)
२. माझ्या गौरवावर हल्ला करणारी मध्यरात्रीची प्रत्येक शक्ती येशूच्या नावाने नष्ट केली जावी. (निर्गम १२:२९)
३. मला मारण्यासाठी दुष्टाच्या अजेंडाला मी उध्वस्त करतो; येशूच्या नावाने मी मरणार नाही. (स्तोत्र. ११८:१७)
४. माझ्या शरीरात आजाराची प्रत्येक पेरणी, येशूच्या नावाने अग्नीद्वारे नष्ट केली जावी. (१ करिंथ. ३:१६-१७)
५. स्वप्नांद्वारे माझ्या शरीरात आयोजित केलेला प्रत्येक रोग, येशूच्या नावाने अग्नीद्वारे नष्ट केला जावा. (यिर्मया १७:१४)
६. देवाची शक्ती, माझे जीवन, माझे जोडीदार आणि मुलांना उद्धेशून सोडलेल्या रात्रीच्या प्रत्येक शक्तीपासून येशूच्या नावाने मला सोडव. (२ तीमथ्य. ४:१८)
७. माझ्या स्वर्गीय पित्याद्वारे पेरणी न केलेले कोणतेही रोपटे, येशूच्या नावाने उपटून टाकले आणि नष्ट केले जावे. (मत्तय. १५:१३)
८. हे परमेश्वरा, मध्यरात्रीच्या सुमारास उठण्यासाठी आणि तुझी स्तुती आणि उपासना करण्यासाठी येशूच्या नावाने मला कृपा प्रदान कर. (प्रेषित. १६:२५)
९. जेव्हा मी झोपी गेलेला आहे तेव्हा माझ्या आत्मिक मनुष्याला उद्धेशून केलेल्या प्रत्येक सैतानी शक्तीवर येशूच्या नावाने मी प्रभुत्व मिळवतो. (लूक. १०:१९)
१०. देवाचा अग्नी; माझा आत्मा, प्राण आणि शरीरातून जा; रात्रीच्या सुमारास प्रार्थना करण्यासाठी मला समर्थ कर; जेव्हा मी झोपी गेलो आहे तेव्हा माझे संरक्षण कर आणि येशूच्या नावाने माझे कुटुंब आणि प्रियजनांचा सांभाळ कर. (१ थेस्सलनीका. ५:२३)
Join our WhatsApp Channel
Most Read
● मुळा बद्दल विचार करणे● योग्य नातेसंबंध कसे बनवावे
● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दैवी व्यवस्था-१
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● इतरांवर कृपा करा
● इतरांची सेवा करण्याद्वारे आशीर्वाद जो आम्ही अनुभवितो
टिप्पण्या