तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशींच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञव समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. (अनुवाद ४: ६)
वरील वचनावरून आपण पाहतो की:
वचन पाळल्याने आपल्याला सुज्ञता आणि समंजसपणामध्ये वाढवेल.
वचन पाळल्याने आपल्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव टाकता येईल. जेव्हा लोक ऐकतील आणि पाहतील की काय घडत आहे, ते म्हणतील, "किती महान राष्ट्र!" किती सुज्ञ आणि समंजस! (अनुवाद४:६)
स्तोत्र ११९: ९८ मध्ये स्तोत्रकर्त्याने लिहिले
तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा अधिक सुज्ञ करितात; कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत.
सर्वात मोठा शत्रू हा आपल्या आत्म्याचा शत्रू आहे-सैतान. देवाच्या वचनाकडून ज्ञान हे तुम्हांला सैतानापेक्षा अनेक मजल पुढे ठेवेल. शत्रूला कदाचित वचन ठाऊक आहे आणि तो त्याचा संदर्भ देतो परंतु त्यास वचनाच्या ज्ञानाकडे प्रवेश नाही- ते त्याच्यापासून लपलेले आहे. उदाहरणार्थ: सैतानालाजर हे ठाऊक असते, त्याने येशूला वधस्तंभावर खिळिले नसते. (१ करिंथ २:८)
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करितो. (स्तोत्रसंहिता ११९: ९८)
देवाच्या वचनाचे ज्ञान हे आपल्याला ह्या जगाच्या शिक्षकांपेक्षा समंजस करिते ज्यांना ह्या जगाचे सर्व शिक्षण मिळाले आहे. वचनापासून जे ज्ञान मिळते त्याच्या तुलनेत वयोमान सुद्धा स्पर्धा करू शकत नाही.
खरे ज्ञान हे केवळ ज्ञान जमा करण्याच्याही पलीकडे जाते. ज्ञानाला किंमत आहे परंतु ज्ञान आपल्या जीवनाला जीवन-बदलणारे व्हावे असे कसे लागू करावे-ते खरे ज्ञान आहे.
तुमच्या अवतीभवती पाहा, ज्ञानी आणि शिक्षित लोक हे आवश्यक नाही की ते समंजस असतील आणि कोणाला केवळ त्यांच्या जीवनाच्या राहणीमानकडे पाहण्याची गरज आहे हे जाणण्यासाठी की ज्ञान हे आवश्यकपणे जीवनासाठी समंजस निर्णयाची शास्वती देत नाही.
प्रेषित पौलाने लिहिले, येशूख्रिस्त आपल्यासाठी ज्ञान असे केले. (१ करिंथ १:३०)
पौल प्रामुख्याने काय म्हणत होता की वचन हेआपले ज्ञान आहे.
ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ति वेचून सुज्ञता संपादन कर. त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नति करील; त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करील; ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल; तुला सुंदर मुकुट देईल. (नीतिसूत्रे ४: ७-९)
जर तुम्हांला हे ज्ञान पाहिजे तर तुम्हांला त्याचा शोध घ्यायचा आहे. जर परमेश्वर ज्ञानाचेकाही स्तर दान म्हणून देतो परंतु जर तुम्हांला अधिक ज्ञान हवे आहे, मग तुम्हाला निश्चय करावयाचा आहे की काहीही झाले तरी ते तुम्हांला प्राप्त करावयाचे आहे.
ही काही एक वेळची प्रक्रिया नाही; ही प्रतीदिवसाची प्रक्रिया आहे की देवाच्या वचनामध्ये ज्ञान शोधावे.
प्रार्थना
1.पित्या, येशूच्या नावात कृपा करून मजवर दया कर; मला क्षमा कर आणि मला सर्व अधर्मापासून शुद्ध कर.
2.“येशूचे रक्त” असे सतत बोलत राहा जोपर्यंत तुम्हाला काहीतरी भास होत नाही.
3.येशूच्या नावात, येशूचे रक्त मला सर्व वांशिक अशुद्धतेपासून शुद्ध करते.
4.येशूच्या नावात, येशूचे रक्त मला स्वप्नातील सर्व अशुद्धतेपासून शुद्ध करते.
5.कोणतीही शक्ती जी माझा आत्मा, प्राण आणि शरीराला अशुद्ध करीत आहे ती येशूच्या नावाने नष्ट केली जावो.
6.पित्या, कृपा करून मला धार्मिकतेवर प्रीती करण्यासाठी आणि आवेशाने अपराधाचा द्वेष करण्यासाठी कृपा प्रदान कर. येशूच्या नावात कृपा करून माझ्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा, मला हर्षरूपी तेलाने अभिषेक कर.
7.पित्या, कृपा करून माझ्या पावलांना आदेश दे, आणि येशूच्या नावात माझ्यावर कोणत्याही अधर्माचे वर्चस्व होऊ देऊ नको.
8.पित्या, येशूच्या नावात, माझ्या हृदयातील बंडखोरीचा प्रत्येक आत्मा तुझ्या अग्नीने भस्म होवो.
9.“पवित्र आत्म्याचा अग्नी” असे सतत बोलत राहा जोपर्यंत तुम्ही सुटकेचा अनुभव करीत नाही.
10.पित्या, तुझ्या वचनाविरुद्ध माझे अंत:करण कधीही कठीण करू नये म्हणून येशूच्या नावात मला कृपा प्रदान कर.
11.ख्रिस्ताला माझ्यासाठी देवाचे शहाणपण केले आहे. (संपूर्ण दिवसभर असे सतत बोलत राहा)
Join our WhatsApp Channel
Most Read
● फसवणुकीच्या जगात सत्याची पारख करणे● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
● ज्ञान व प्रीति हे प्रोत्साहन देणारे
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात का?
● सापडलेल्या मेंढराचा आनंद
● विश्वास, आशा आणि प्रीति
टिप्पण्या