दावीद युद्धभूमीवर आला होता; तो स्वतःहून आला नव्हता, परंतु कारण की त्याच्या बापाने त्यास काही काम सांगितले होते. त्याच्या बापाला पाहिजे होते की त्याच्या भावांना काही पुरवठा करावा जे तेथे युद्धभूमीवर अग्रस्थानी होते. (१ शमुवेल १७: १७-१८ वाचा)
दाविदाने सुद्धा स्वतः पाहिले होते की पलिष्टी गल्याथ इस्राएली लोकांची निर्भत्सना करीत होता.त्याच्यामधील आत्मा खवळला आणि त्याने त्या जवळच्या पुरुषांना विचारले की गल्याथ बरोबर युद्ध करण्याचा पुरस्कार काय आहे. पुरुषांनी लगेच त्यास उत्तर दिले हे म्हणत, "जो पुरुष त्या मनुष्यास (गल्याथ) ला जिवंत मारील, राजा त्यास बहुत धन देऊन संपन्न करील व आपली कन्या त्यास देईल आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे कर देण्यापासून स्वतंत्र करील. (१ शमुवेल १७: २५)
आता त्याचा वडील भाऊ अलीयाब याने ऐकले; तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, येथे आलास कशाला? थोडीशी शेरडेमेंढरे आहे ती रानात तूं कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे; तूं केवळ लढाई पाहण्यास येथे आला आहेस.(१ शमुवेल १७: २७-२८)
जेव्हा त्याचा वडील भाऊ अलीयाब याने ऐकले जेव्हा दाविदाने त्या मनुष्यांबरोबर बोलणे केले आहे, त्याने त्या सर्वांसमोर त्याला कडक शब्दात फटकारले. दावीद फार सहजपणे जे घडले आहे त्याने दु:खी आणि निराश झाला असता परंतु त्याने तसे न करण्याचे निवडले.
येथे महत्वाची किल्ली लपलेली आहे:
दावीदाने व्यत्ययामुळे विचलित होण्यापासून नाकारले
जेव्हा तुम्ही युद्धात आहात, शत्रू हा नेहमीच तुमच्याकडे अडथळे टाकेल की तुम्हाला खरे युद्ध करण्यापासून रोखावे.
प्रेषित पौलाने तीमथ्यीला लिहिले,हे म्हणत, "हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो; तुम्हांस फासांत गुंतवावे म्हणून नव्हे तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो." (१ करिंथ ७: ३५)
अडथळे हे देवाच्या उद्धेश व योजनेत सर्वात पहिला शत्रू आहे.
जेव्हा लोक तुम्हाला त्रास देतील, दु:ख देतील, त्या गोष्टी बोलतील ज्या खऱ्या नाहीत,आपण त्याबरोबर सामाजिक माध्यमावर, किंवा इतर दुसऱ्या स्तरावर लढा देण्याची वृत्ती ठेवतो जेणेकरून आपल्या स्वतःचे समर्थन करावे. हे दुसरे काही नसून अडथळा आहे की तुम्हाला खऱ्या गोष्टीकडून रोखावे ज्यासाठी देवाने तुम्हाला बोलाविले आहे.
भूतकाळात दाविदाने सिंह आणि अस्वल यांना जिवंत मारले आहे आणि तो फार सहजपणे अलीयाब ला उत्तर देऊ शकतो परंतु तो त्याच्या स्वतःच्या भावा बरोबर भांडण्यापासून मागे वळलेला आहे. जर त्याने अलीयाब बरोबर भांडण केले असते, त्याने गल्याथ बरोबर त्याच्या लढाई ला गमाविले असते. जर दाविदाने गल्याथ बरोबर युद्ध गमाविले असते, तर तो इस्राएल मध्ये कधीही एवढा प्रसिद्ध झाला नसता.
Bible Reading : Genesis 45 - 46
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मला साहाय्य कर की माझे नेत्र त्यावर केंद्रित करावे जे करण्यासाठी तू मला बोलाविले आहे.
माझ्या विरोधातील अडथळ्याची प्रत्येक शक्ती येशूच्या नांवात कापून टाकली जावो. आमेन.
माझ्या विरोधातील अडथळ्याची प्रत्येक शक्ती येशूच्या नांवात कापून टाकली जावो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा आशीर्वाद बहुगुणीत करण्याचा खात्रीशीर मार्ग● बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश
● दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
● धन्यवादाचे सामर्थ्य
● देण्याने वाढ होते - 1
● बदलण्याची वेळ
● मी प्रयत्न सोडणार नाही
टिप्पण्या