डेली मन्ना
परिवर्तनासाठी सक्षम
Friday, 31st of January 2025
27
20
223
Categories :
एस्तेरचे रहस्य: मालिका
परिवर्तन
"परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहोत; आणि प्रभु जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रुपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो." (२ करिंथ. ३:१८)
परिवर्तन म्हणजे निसर्ग, स्वरूप किंवा प्रकारामधील स्पष्ट बदल आहे. वास्तवात, प्रत्येकाला परिवर्तनाच्या गोष्टी आवडतात. आपल्या सर्वांची इच्छा असते की आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्यापेक्षा जो कोणीतरी अधिक आरामदायक स्थितीत आहे तसे व्हावे. आपल्या नम्र मनामध्ये आपण जो पुढील व्यक्ति बनावे अशी इच्छा बाळगतो त्याबद्दलच्या स्थितीचे परिपूर्ण चित्र आहे.
कदाचित या काल्पनिक कथांमधील सर्व मनोरंजक बदल एस्तेरच्या बायबलसंबंधी अहवालात आढळतो. एस्तेरची कथा ही एका तरुण अनाथ यहूदी शेतकरी मुलीची खरी कथा आहे जी एक सौंदर्य प्रतियोगिता जिंकते आणि पर्शियन राजाच्या राजवाडयात प्रवेश करते. मग ती राजाचे मन जिंकते आणि सर्व विषम परिस्थिती असताना देखील राणी बनते आणि शेवटी तिचे राष्ट्र-इस्राएलास विनाशापासून वाचविते.
एस्तेरच्या बायबलसंबंधी अहवालाने मला खात्री पटवून दिली आहे की देवाबराबर घनिष्ठता आणि योग्य निवड केल्यामुळे आजही परिवर्तनाबद्दलचे आपले आजीवन आकर्षण शक्य आहे. आजच्यासाठी आपले वचन "आपण सर्व जण" या वाक्प्रचाराने सुरु होते. हे सुचविते की परिवर्तनापासून कोणीही सुटत नाही. वास्तवात, देवाची ही इच्छा आहे की, आपण गौरवाकडून गौरवाकडे बदलत राहावे. देवाची इच्छा आहे की आपण या पृथ्वीवर त्याचा स्वभाव प्रतिबिंबित करावा आणि गौरवाच्या एका अंशापासून दुसऱ्यापर्यंत त्याच्या व्यक्तिमत्वाला प्रदर्शित करावे.
या क्षणी तुम्हीं कोणत्या स्तरावर आहात? तुमच्या कुटुंबासाठी गोष्टी कशा आहेत? तुमच्या जीवनाभोवती कोणत्या मर्यादा आहेत ज्या कदाचित तुम्हांला तुमच्या बुद्धीच्या टोकावर असल्याचे सूचित करतात? कोणी तुम्हांला सांगितले आहे की तुमच्या जीवनातून आता काहीही चांगले होऊ शकत नाही? कोणी तुम्हांला सांगितले की तुम्ही क्रूर आणि अनाकर्षक असेच राहाल? माझ्याकडे तुमच्यासाठी सुवार्ता आहे; देवाची इच्छा आहे की तुम्ही धुळीपासून वरच्या स्तरावर परिवर्तीत व्हावे. स्तोत्रसंहिता ११३:७-८ मध्ये बायबल सांगते, "तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्र्यांस उकिरड्यावरून उचलितो; आणि त्यांस अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवितो."
आता, एस्तेरला पर्शियाच्या राणीच्या पदावर अचानक बढती देण्याच्या खूप आधी, दुसरी राणी जिचे नाव वश्ती ही कृपेवरून पतन पावली. बायबल म्हणते, "सातव्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्लासयुक्त झाले असता त्याने महूमान, बिगथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर, कर्खस असे जे सात खोजे त्याच्या तैनातीस असत त्यांस आज्ञा केली की, ११ वश्ती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांस व सरदारांस दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्यापुढे घेऊन यावे; कारण ती फार देखणी होती. १२ खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा आली तरी वश्ती राणीने येण्याचे नाकारीले; त्यावरून राजास फार क्रोध येऊन तो संतप्त झाला. (एस्तेर १:१०-१२)
कोणालाही ठाऊक नाही की राजा अहश्वेरोश राजाची आज्ञा मानण्याचे राणीने का नाकारीले. ना ही आपल्याला हे ठाऊक आहे की तिच्या बाबतीत खरोखर काय झाले. बायबलचे काही विद्वान आपल्याला सांगतात की, राणी वश्तीला राणीच्या पदावरून काढण्यात आले आणि तिला हद्दपार केले किंवा राजवाडयात महिला विभागात एका ठिकाणी नजरबंदीत ठेवण्यात आले. काही हे देखील विश्वास ठेवतात की तीचा वध केला गेला कारण तिने राजाची आज्ञा मानण्यास नकार दिला होता.
आपल्यापैंकी पुष्कळ जण मला चांगले जीवन असावे आणि मी चांगला व्हावे याचे स्वप्न पाहतात. आपण वर्तमान क्षणी जे करीत आहोत त्यापेक्षा आपल्याला अधिक उत्तम करण्याची इच्छा आहे. तथापि, आपल्या सभोवालाच्या लोकांना आपल्यातील आणि सांसारिक जीवन जगणाऱ्यांमधील फरक पाहण्यात अनेकदा अडचण येते. आपल्याला जगाच्या मानकाचे पालन करून चांगले होण्याची इच्छा असते. दुर्दैवाने, उपहास होण्यातच आपला शेवट होतो.
तर देवाशीच आज का नाही जडून राहावे? सत्य हे आहे की देवाच्या वचनाकडून प्रकटीकरणच केवळ आपल्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकते. एस्तेरच्या पुस्तकात असलेले सत्य हे तुमच्या जीवनास त्या अंशापर्यंत बदलवू शकते ज्याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. एस्तेरने देवासमोर तिची भूमिका कायम ठेवली, आणि तिने परिवर्तनाच्या तिच्या क्षणाला गमाविले नाही. आता तुमची वेळ आहे. देवावर विसंबून राहा.
Bible Reading: Exodus 36-38

अंगीकार
पित्या, येशूच्या नावाने, आज माझ्यासाठी तुझ्या वचनाबदल मी तुझे आभार मानतो. मी तुझे आभार मानतो कारण तुझी इच्छा आहे की माझे जीवन गौरवाकडून गौरवाकडे जावे. मी प्रार्थना करतो की तूं मला तुझ्याबरोबर ठाम राहण्यास साहाय्य कर. मी प्रार्थना करतो की तूं मला तुझ्या वचनाच्या सत्यावर स्थिर उभे राहण्यास साहाय्य कर, जे मला स्वतंत्र करते. या वर्षी माझे जीवन खऱ्या परिवर्तनाचा अनुभव करील. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1● दिवस १३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● तुमच्या मनाला शिस्त लावा
● संकटाच्या काळाकडे पाहणे
● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● देवाच्या प्रकारची प्रीति
टिप्पण्या