english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
डेली मन्ना

परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक

Wednesday, 14th of May 2025
18 11 189
Categories : Storms
याकोब १:४ म्हणते, "आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू दया, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी." जीवनाच्या वादळांतून, देव आपल्याला एक ब्रँड नवीन सृष्टि म्हणून शुद्ध करीत आहे, जे त्याची प्रीति व कृपेचा करार आहे.

याची पर्वा नाही की आपण कोणत्या परीक्षा आणि संकटांना सामोरे जातो,  आपण देवाच्या दृष्टीसमोर आपले खरे मूल्य नाही विसरले पाहिजे. प्रभु येशूने त्याचे मौल्यवान रक्त काहीतरी अयोग्यसाठी वाहिले नाही; त्याने त्याचे जीवन तुमच्या व माझ्यासाठी, जे आपण व्यक्तिगत जे अमर्यादितपणे मूल्यवान आणि प्रेमळ आहोत  त्यांच्यासाठी अर्पण केले. जेव्हा आपण जीवनाच्या वादळांतून मार्ग काढत जातो, तेव्हा आपण हे स्मरण ठेवले पाहिजे की आपण उच्च ब्रँड आहोत, ज्यांस अंतिम ब्रँड व्यवस्थापक- स्वतः परमेश्वरा द्वारे काळजी आणि उद्देशासह घडविलेले आहे.

देवाचे आपल्या जीवनात काळजीपूर्वक आणि संयमाने केलेले कार्य हे उल्लेखणीय पेक्षा किंचितही कमी नाही. तो प्रेमळपणे आपल्यातील अशुद्धपणा काढून टाकतो, आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या उत्तम स्वरुपात शुद्ध करतो. प्रत्येक आव्हाहन ज्यास आपण सामोरे जातो, त्यामध्ये तो आपल्या चारित्र्यास बळकट करतो, आपल्या विश्वासाला दृढ करतो, आणि आपला खरा उद्देश प्रकट करतो.

आपल्या स्वतःला कमी लेखू नका; त्याऐवजी, स्वतःला एकमेव आणि मौल्यवान ब्रँड, जे देवाच्या प्रतिमेनुसार बनविलेले आहे म्हणून पाहा. हे लक्षात ठेवा की आपल्या प्रत्येकाला भयप्रद आणि अद्भुत मार्गाने बनविलेले आहे आणि हे की देवाची आपल्यासाठी प्रीति ही अटळ आहे. तो एक परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक आहे, आणि जेव्हा आपण त्याचे मार्गदर्शन व नेतृत्वामध्ये भरवसा ठेवतो, तेव्हा आपण आत्मविश्वासी होऊ शकतो की तो आपल्याला आपल्या खऱ्या उद्देशाकडे नेईल.

जेव्हा येशूने वादळ शांत केले, तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्या सामर्थ्यावर आश्चर्य व्यक्त केले, हे उद्गारत, "हा आहे तरी कोण?" वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात" (मार्क ४:४१). ही भीति वादळाने निर्माण केली नाही परंतु शांति जिचा त्यांनी अनुभव केला त्याद्वारे. हा प्रसंग त्या सत्यास प्रकट करतो की प्रत्येक भयावर देवाच्या भया द्वारे विजय मिळविला जाऊ शकतो. काहीही आपल्याला धाडसी बनवीत नाही, जसे केवळ देवाचे भय बनविते. देवाच्या एका माणसाने एकदा म्हटले, "देवाचे भय धर; आणि तुम्हांला इतर कशालादेखील भिण्याची गरज नाही."

जीवनात ज्या प्रत्येक वादळांना आपण सामोरे जातो ते आपल्याला एकमेव संधी देते की देवाचा स्वभाव व सामर्थ्याविषयी गहन समज प्राप्त करावी, जे शेवटी आपल्याला परिवर्तनीय प्रकटीकरणाकडे नेते.

एक प्रकटीकरण जीवनात क्रांती निर्माण करेल. देवाच्या चारित्र्याचे प्रकटीकरण केवळ आपल्या विश्वासाला बळकट करणार नाही परंतु ते आपल्या जीवनात क्रांती देखील निर्माण करते. ते आपल्या दृष्टीकोनास पुन्हा घडविते आणि आव्हाहनांना जसे आपण उत्तर देतो त्या दृष्टीकोनास बदलते.

तुमच्यापैकी काही जण मरणप्राय आजारांना सामोरे गेले आहात, ज्यामध्ये डॉक्टरांनी जगण्यासाठी फारच कमी आशा दाखविली. तरीही, देवाच्या दयेने आणि दैवी हस्तक्षेपाद्वारे, तुम्ही विजयी झालात, आणि लाजरासारखे कबरेमधून बाहेर आलात, जिवंत केले गेले. ह्या अनुभवाने येशू आरोग्य देणारा म्हणून एक गहन प्रकटीकरण तुम्हांला दिले.

आता या प्राप्त केलेल्या नवीन समजसह सज्ज होत, पुढील वेळी जेव्हा तुम्ही कोणाला "ही एक शवपेटी आहे" हे बोलताना भेटता. तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने घोषित करता की, "नाही! येशू हा आरोग्यदाता आहे." हे प्रकटीकरण तुम्हांला विश्वासात ठामपणे उभे राहण्यास आणि देवाची प्रीति, कृपा आणि आरोग्य देणाऱ्या सामर्थ्याचे साक्षीदार म्हणून समर्थ करते.

म्हणून, जेव्हा तुम्ही वादळांतून जाता, तेव्हा प्रकटीकरण जे तुम्ही प्राप्त केले आहे त्याचे स्मरण करा आणि त्यास तुमच्या विश्वासाला दृढ करू दया जसे तुम्ही त्या एकमेव व्यक्तीमध्ये सतत विश्वास ठेवता जो वारा व समुद्राला शांत करतो.

Bible Reading: 1 Chronicles 1-3
प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानतो की तू मजमध्ये कार्यरत आहे आणि मी तुझ्यामध्ये पूर्ण आहे, कोणत्याची चांगल्या गोष्टींची उणीव नाही. पवित्र आत्म्या, माझ्या स्मरणात आण ते सर्व काही जे तू मला शिकवले आहे की वादळ ज्यास मी सामोरे जात आहे त्यावर विजय मिळवावा. येशूच्या नावाने. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● दानधर्म करण्याची कृपा-२
● २१ दिवस उपवासः दिवस १२
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● नम्रता हे कमकुवतपणा समान नाही
● आध्यात्मिक प्रवेश द्वारांचे रहस्य
● किंमत मोजणे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन