हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. दिवस ०९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Daily Manna

दिवस ०९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना

Tuesday, 19th of December 2023
36 29 1503
Categories : उपास व प्रार्थना
तुमच्या नशिबाला मदत करणाऱ्यांशी जुळणे

“आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.” (स्तोत्र. १२१:२)


तुमचे नशीब हे तुम्ही जे प्राप्त करावे आणि ते व्हावे असा देवाचा हेतू आहे. तुमच्या अस्तित्वासाठी ही देवाची योजना आहे. मदत करावी आणि मदत घ्यावी म्हणून प्रत्येक व्यक्तीची रचना केली आहे. कोणीही त्यांचे नशीब एकाकी राहून पूर्ण करू शकत नाही.


देवाने आपली निर्मिती त्याच्यावर विसंबून राहण्यासाठी केली आहे, म्हणून येथे पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मानवी शक्तीने करू शकत नाही. आपण शक्ती, ज्ञान, शहाणपण आणि क्षमतेमध्ये मर्यादित आहोत. जर आपण देवावर विसंबून राहिलो, तर आपण पौलासारखे धैर्याने घोषित करू शकतो आणि म्हणू, “मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे” (फिलिप्पै. ४:१३). देव आपल्या साहाय्याचा स्त्रोत आहे, आणि तो आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांनी मदत पाठवतो, उदाहरणार्थ-मनुष्य, देवदूत, निसर्ग इत्यादी.


नशिबाला मदत करणाऱ्यांचे सेवाकार्य हे पवित्र शास्त्रात सर्वत्र आहे, आणि त्यापैकी काहींचा आपण आज अभ्यास करणार आहोत.


नशिबाला मदत करणारे पवित्र शास्त्रातील साहाय्यक

१. आदाम

नशिबाला मदत करणाऱ्यांच्या सेवाकार्याचा आनंद घेणारा आदाम हा पहिला व्यक्ती होता. आदामाला साहाय्य करण्यासाठी हव्वेची निर्मिती केली होती. तिची रचना त्याच्यासाठी “मदतनीस” म्हणून केली होती. (उत्पत्ती २:१८)


२. योसेफ

उत्पत्ती ४०:१४ मध्ये, प्यालेबदाराला योसेफाने स्वप्नाचा अर्थ सांगितल्यावर त्याने प्यालेबदाराकडे मदतीसाठी विनंती केली आणि ते हे की त्याने त्याला तुरुंगातून काढण्याचा प्रयत्न करावा पण प्यालेबदार त्याला पूर्ण दोन वर्षे विसरून गेला (उत्पत्ती ४०:२२; ४१:१, ९-१४). जेव्हा देवाने तुम्हांला साहाय्य केले असेल तेव्हाच लोक तुमची आठवण करतील.


३. दावीद

दाविदाने त्याच्या जीवनात वेगवेगळ्या वेळी मदतीचा आनंद घेतला होता. मदतीचा आनंद घेणे म्हणजे काय हे तो समजला होता, म्हणूनच त्याने वेगवेगळ्या वेळी मदतीविषयी लिहिले.


दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत रोजच्यारोज भर पडत गेली. त्यामुळे त्यांचे सैन्य वरचढ होत गेले. (१ इतिहास १२:२२)

“१५पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांशी पुन्हा युद्ध केले; तेव्हा दावीद आपले सैनिक बरोबर घेऊन पलिष्ट्यांशी लढला; त्या प्रसंगी दावीद थकून गेला. १६तेव्हा रेफाई वंशातला इशबी- बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला. १७पण सरुवेचा पुत्र अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला; त्या पलिष्ट्याला त्याने ठार मारले. मग दाविदाच्या लोकांनी त्याला शपथ घालून सांगितले, ‘पुन्हा आपण आमच्याबरोबर लढाईला येऊ नका; इस्राएलचां दीप आपण मालवू नये.” (२ शमुवेल २१:१५-१७)


नशिबाला मदत करणाऱ्यांना निवडणारे तुम्ही नाहीत; हा तो परमेश्वर आहे जो त्यांना तुमच्याशी जोडेल ज्यांना त्याने तुम्हांला मदत करण्यासाठी तयार केले आहे.


मी ठामपणे विश्वास ठेवतो की आजच्या प्रार्थनेनंतर, तुम्ही देवाकडून अद्भुत मदतीचा आनंद घेण्यास सुरुवात कराल. बंद दरवाजे पुन्हा उघडण्यात येतील, आणि लोक येशूच्या नावाने तुमच्यासाठी चांगले करण्यास सुरु करतील.


साहाय्याचे प्रकार

१. देवाचे साहाय्य

देव आपल्या साहाय्याचा मुख्य स्त्रोत आहे. जर देवाने साहाय्य केले, तर मनुष्याने साहाय्य केलेच पाहिजे. लोकांनी तुम्हांला साहाय्य करावे म्हणून सर्वत्र विनंती करण्यास जाण्याऐवजी, देवाच्या साहाय्याचा धावा करत प्रार्थनेत वेळ घालवा. तुम्हांला साहाय्य करण्यासाठी देव कोणाच्याही हृदयाला स्पर्श करेल.

“तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्वेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” (यशया ४१:१०)

“मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे

तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो.” (नीतिसूत्रे १६:७)


२. मनुष्याचे साहाय्य

देवाने संदेष्टा एलीयाला सांगितले की त्याने त्याचा सांभाळ करण्यासाठी एका विधवेला तयार केले आहे. प्रत्येकाला साहाय्याची गरज लागते, आणि जेव्हा तुम्ही देवावर विसंबून राहता, तेव्हा त्याने तयार केलेला योग्य व्यक्ती तो तुमच्याकडे पाठवील. (१ राजे १७:८-९)


“१बंधुंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो; २ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्याधिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यामध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. ३कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. ४त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी; ५आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले.” (२ करिंथ. ८:१-५)


३. देवदूताचे साहाय्य

यहोशवा आणि इस्राएली लोकांनी यरीहोची भिंत नष्ट करण्यासाठी देवदूताच्या साहाय्याचा आनंद घेतला.

“१३यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, ‘तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?’ १४तो म्हणाला, ‘नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे.’ तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, ‘स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे?’ १५परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, ‘आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.’ तेव्हा यहोशवाने तसे केले.” (यहोशवा ५:१३-१५)


आज, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा मी भविष्यवाणी करतो की परमेश्वर तुमच्यासाठी देवदूताचे साहाय्य पाठवेल. जे अशक्य, प्राप्त करण्यास अवघड असे दिसते, ते येशूच्या नावाने घडेल.


४. पृथ्वीपासून साहाय्य

निसर्ग देवाच्या वाणीला प्रतिसाद देतो आणि त्याच्या लोकांच्या भल्यासाठी कार्य करेल जेव्हा गरज उद्भवते. पवित्र शास्त्र सांगते की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. सर्व गोष्टींमध्ये निसर्ग देखील आहे; आपल्याला केवळ विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि पवित्र शास्त्रात उपलब्ध असलेले आशीर्वाद आपल्याला लागू करावे.


“परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली.” (प्रकटीकरण १२:१६)


“१२परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला, इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, ‘हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर होत;
‘हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.’ १३तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पूर उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.” (यहोशवा १०:१२-१३)


पुढील अभ्यासासाठी: स्तोत्र. १२१:१-८, स्तोत्र. २०:१-९, उपदेशक ४:१०, यशया ४१:१३
Prayer
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका. 

१) पित्या, कृपा करून तुझ्या पवित्रस्थानातून येशूच्या नावाने मला साहाय्य पाठव. (स्तोत्र. २०:२)

२) माझ्या जीवनाच्या सभोवतालच्या नशिबाला नष्ट करणाऱ्या कार्याला मी येशूच्या नावाने पक्षघाती करतो. (योहान. १०:१०)

३) काहीही जे मला आणि माझ्या नशिबाला साहाय्य करणाऱ्यास अडथळा करत आहे, ते येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे नष्ट केले जावे. (यशया ५४:१७)

४) माझ्या नशिबाच्या साहाय्यकांसमोर कोणतीही वाईट वाणी जी मला दोष देत असेल, ती येशूच्या नावाने शांत केली जावी. (प्रकटीकरण १२:१०)

५) हे परमेश्वरा, तुझ्या कृपेने, माझ्या पुढील स्तरासाठी तू तयार केलेल्या माझ्या साहाय्यकांशी येशूच्या नावाने तू मला त्यांच्याशी जोड. (निर्गम ३:२१)

६) परमेश्वरा, माझ्या आयुष्याच्या संबंधात निर्णय घेणाऱ्या ठिकाणी माझ्यासाठी येशूच्या नावाने तू बोल. (नीतिसूत्रे १८:१६)

७) कोणतीही शक्ती माझ्या विरोधात माझ्या साहाय्यकांशी चालाखी करत असेल, त्या शक्तीच्या प्रभावाला मी येशूच्या नावाने नष्ट करतो. (इफिस. ६:१२)

८) माझ्या नशिबाचे साहाय्यक मारले जाणार नाही, आणि येशूच्या नावाने त्यांना काहीही वाईट होऊ देऊ नको. (स्तोत्र. ९१:१०-११)

९) माझ्या जीवनाच्या विरोधात कार्य करण्यापासून तडजोड आणि अपयशाच्या प्रत्येक आत्म्याला येशूच्या नावाने मी प्रतिबंधित करतो. (२ करिंथ. १:२०)

१०) पित्या, मजवर कृपा करण्यासाठी तुझ्या पवित्र देवदूतांना लोकांकडे जाण्यास व त्यांना प्रभावित करण्यास येशूच्या नावाने मोकळे कर. (इब्री. १:१४)

११) करुणा सदन सेवाकार्याच्या नशिबाचे साहाय्यक आता येशूच्या नावाने येवोत. (१ करिंथ. १२:२८)

१२) या २१ दिवसांच्या उपास आणि प्रार्थनेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबांवर मी येशूचे रक्त लावतो. (निर्गम १२:१३)

Join our WhatsApp Channel


Most Read
● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
● आदर व ओळख प्राप्त करा
● नरक हे खरे स्थान आहे
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● राजवाड्याच्या मागील माणूस
● हुशारीने कार्य करा
● चेतावणीकडे लक्ष दया
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login