हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. तुमच्या पडीक जमिनीस नांगरा
Daily Manna

तुमच्या पडीक जमिनीस नांगरा

Thursday, 1st of August 2024
29 22 933
Categories : पश्चाताप मानवी हृदयाचा
आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका. (यिर्मया ४:३)

नेहमी असे होते की आपण दुसऱ्यांच्या त्रुटी किंवा दोष दाखविण्यात फार तत्पर असतो, तर इतर लोकांच्या जीवनातील त्या भागांसाठी प्रार्थना करण्यास देखील मनमिळावूपणाची गरज लागते. तथापि, आता अत्यंत महत्वाचे झाले आहे की आपण आपल्या स्वतःच्या अंत:करणाचे परीक्षण करावे.

पडीक जमीन ही शेती न केलेली भूमी आहे, विशेषतः ती भूमी जी पूर्वी नांगरली होती परंतु तिला महिने तशीच निष्क्रिय अशी ठेवली. अशा भूमीवर नागरणी करणे हे कठीण आहे; तेथे काहीही उपयोगी असे उपजू शकत नाही जोपर्यंत पडीक जमिनीस नांगरित नाही.

आपली अंत:करणे ही कधीकधी पडीक जमिनीसारखी आहेत. कदाचित तुम्ही प्रार्थना केली असेन, तुमचे वडील किंवा आईने (किंवा कोणीतरी जवळचे) बरे व्हावे म्हणून प्रभूकडे विश्वास ठेवला असेन, आणि तसे घडले नाही. कदाचित तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी महिनो नोकरीवाचून आहात, आणि त्याने तुमच्या विश्वासाला तडा दिला आहे. कदाचित वर्षांपासून तुम्ही काही विखरलेल्या दु:खद नातेसंबंधाला तोंड देत असाल. आता तुम्ही या निर्णयापर्यंत पोहचला असाल, की देव प्रार्थनांची उत्तरे देत नाही, कमीत कमी माझ्या बाबतीत तरी नाही.

अविश्वासाच्या हया कठीणपणास सर्वदृष्टीकोनातून सामोरे गेले पाहिजे आणि त्यास मोडले पाहिजे जर देवाने तुमच्या अंत:करणात काहीतरी नवीन व फलदायक असे रोपावयास पाहिजे. मनापासून पश्चाताप व कबुली हा खोलवर नांगरण्याचा एक मार्ग आहे.

काट्यांमध्ये पेरू नका. (यिर्मया ४:३)

बायबल पेरण्यास फारच प्रोत्साहन देते परंतु त्याचवेळी चुकीच्या ठिकाणी पेरण्यापासून निरुत्साहित करते.

कांटे आपल्या अंत:करणाच्या भागाला अनुत्पादित करतात. पेरणाऱ्याच्या दाखल्यात, येशू भूमिमधील काट्यांचा उपयोग करतो की मानवी अंत:करणाच्या अवस्थेचे वर्णन करावे. "कांटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनांची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो." (मत्तय १३:२२)

"व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लाभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होते." (मार्क ४:१९)

"कांटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करीत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत." (लूक ८:१४)

वरील वचनांवरून चार गोष्टी ठळकपणे स्पष्ट होतात:

१. हया जीवनाच्या चिंता
२. संपत्तीची फसवणूक
३. इतर गोष्टींसाठी इच्छा
४. श्रीमंती व सुखविलास

तुमच्या अंत:करणाच्या अवस्थेवर आधारित, ते कांटे कदाचित लैंगिक मोह आणि वासना, असंयम, गर्व, क्रोध, स्वार्थीपणा व मनोरंजनासाठी बेफाम प्रेम, पुनर्निर्मिती, व्यसने, लोभ आणि इतर कांटे यांस प्रतिनिधित करते. यातील प्रत्येक हे वचनास कुंठीत करतात. प्रत्येकाचा पिकांवर विनाशकारक परिणाम आहे जी देवाची इच्छा नाही की तुमच्या व माझ्या जीवनात वाढावी.

"तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा; कारण परमेश्वराने येऊन तुम्हांवर धार्मिकतेची वृष्टि करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे." (होशेय १०:१२)

प्रभूसमोर तुम्ही अक्षरशः गुडघ्यावर आला होता अशी मागील शेवटची वेळी केव्हा घडली होती? तुमच्या जीवनातील पडीक जमिनीस तुम्ही त्यास नांगरू द्याल काय? त्याच्या हाकेला तुम्ही आज्ञाधारक राहाल काय?
Prayer
पित्या, तुझे वचन म्हणते, "ज्ञान ही प्रमुख गोष्ट आहे." येशूच्या नावात, मला ज्ञान दे, ज्याची माझ्या पडीक जमिनीस नांगरण्याची गरज आहे.

पित्या, तुझे वचन म्हणते, "प्रत्येक रोपटे जे माझ्या पित्याने लावलेले नाही ते उपटून टाकण्यात येईल." आता माझ्या अंत:करणातून त्या सर्व गोष्टी उपटून टाक ज्या मला फळ देण्यापासून अडथळे करतात. येशूच्या नावात. आमेन.



Join our WhatsApp Channel


Most Read
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
● कृपेवर कृपा
● सापांना रोखणे
● लहान तडजोडी
● शहाणपणाची पारख होत आहे
● दिवस १४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आदर आणि मूल्य
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login