पृथ्वीग्रहाच्या पृष्ठभागावर ऑलिम्पिक स्पर्धक हे सर्वात जास्त शिस्तबद्ध, ध्येयी आणि समर्पित असतात. ऑलिम्पिक स्पर्धकास दररोज शिस्तबद्द्पणापाळण्याची गरज असते, नाहीतर जिंकण्याची सर्व आशा ही गमाविली जाते.
प्रेषित पौलाने असेच काहीतरी जे पवित्र शास्त्रात स्वीकारले आहे, ज्यानेलिहिले, "शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला ते मिळेल." (१ करिंथ ९: २४)
ख्रिस्ती जीवन हे ऑलिम्पिक स्पर्धक समान पाहता येऊ शकते. हेअगदी सत्य आहे की आपण सर्व जण हे कृपे द्वारे वाचविले आणि कृपे द्वारे जगतो. तथापि, प्रेषित पौल काय लिहितो त्याकडे पाहा, "तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले.(१ करिंथ१५: १०)
जे काही आपण आज आहोत हे केवळ देवाच्या कृपे द्वारेच आहोत. प्रेषित पौलाने हे स्वीकारले. तथापि, तो हे सुद्धा म्हणतो, "की मी इतरांपेक्षा अधिक परिश्रम केले आहेत." दुसऱ्या शब्दात, देवाने त्याचा हिस्सा केला आहे, आणि पौल आता त्याचा हिस्सा करीत आहे.
एक ख्रिस्ती प्रथम किंमत मोजल्याशिवाय परमेश्वरासोबत चालू शकत नाही. सरळपणे म्हटल्यास, येशूच्या मागे चालण्यात किंमत भरावयाची आहे. येशूने काहीही लपविले नाही. येशू सह येथे काही चांगली छबी नाही-हे सर्व काही उघड आणि स्पष्ट आहे.
तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. (लूक १४: २८)
प्रभु आपल्याला आपला वधस्तंभ घेऊन चालण्यास आणि शरीराच्या इच्छांवर नियंत्रण करण्यास बोलावीत आहे, नाहीतर आपण शर्यत कधीही पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आपण प्रथम किंमत मोजली पाहिजे आणि आपल्या आचरणात आत्म-संयमी असले पाहिजे.
प्रेषितपौलाच्या महानते आणि प्रभावी पणाचे गुपित हे ह्या वचनात आहे: "स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो; ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करितात, आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठी असे करितो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करितो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करीत नाही; तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन." (१ करिंथ ९: २५-२७)
Prayer
मी विश्वासाकडून विश्वासाकडे, गौरवाकडून गौरवाकडे वाढत आहे. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे म्हणून कोण माझ्या विरोधात उभा राहू शकतो. मी येशूच्या मागे चालण्याचा निर्णय घेतला आहे, मागे वळावयाचे नाही, मागे वळावयाचे नाही.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमचा दिवस तुमची व्याख्या देतो● बहाणा करण्याची कला
● आपल्या निवडींचा प्रभाव
● २१ दिवस उपवासः दिवस १७
● प्रार्थनेची निकड
● भूतकाळातील कपाट उघडणे
● प्रीति साठी शोध
Comments