नहेम्या हा हखल्याचा मुलगा. त्याची ही वचने: किसलेव महिन्यात मी, नहेम्या, शूरान या राजधानीत होतो. राजा अर्तहशश्तच्या कारदीर्चीचे तेव्हा विसावे वर्ष होते.(नहेम्या 1:1)
शूशन, जी पारस साम्राज्याची राजधानी येथे नहेम्या राहिला, आणि तो किल्यामध्ये राहिला-म्हणजे, पारस साम्राज्याच्या किलेबंद राजवाड्यात. ही वास्तविकता ही नहेम्या याने पारसाच्या राजाच्या राजवाडयात त्याचे निवासस्थान केले होते हे आपल्याला ताबडतोब इशारा देते की तो एक महत्वाचा व्यक्ति होता.
त्यांच्याकडे मी तेथे राहणाऱ्या यहुद्यांची चौकशी केली. हे युहदी म्हणजे बंदिवासातून सुटून अजून यहुदातच राहणारे लोक होते. यरुशलेम नगराचीही खुशाली मी त्यांना विचारली. (नहेम्या 1:2)
नहेम्याने स्तोत्रसंहिता १३७:५-६ चे मनापासून व आत्मीयतेने पालन केले होते
५ हे यरुशलेमे. जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
६ जर मी तुझी आठवण ठेविली नाही, जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानिले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. (नहेम्या 1:4)
यरुशेलेमेची भिंत बांधण्यास जाण्यापूर्वी नहेम्याने, उपास व प्रार्थना केली.
परमेश्वराने तुमच्याद्वारे कार्य करण्याअगोदर, तो तुमच्यामध्ये कार्य करील. कोणामध्येतरी महान कार्य देवाने करण्यासह देवाच्या कोणत्याही महान कार्याला आरंभ होतो.
मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.(फिलिप्पैकरांस 1:6)
तुमच्यामध्ये ज्या कार्याला 'आरंभ' होतो त्याकडे लक्ष दया. आणि देव जेव्हा नवीन कार्याला आरंभ करतो, तेव्हा तुम्ही याची खात्री बाळगून राहा की तो ते पूर्ण करील. देवाबरोबर येथे कोणतेही कार्य अपूर्ण राहत नाही. तो महान पूर्ण करणारा आहे.
कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो. (फिलिप्पैकरांस 2:13)
तुमच्यामध्ये देवाच्या कार्यास येथे दोन पैलू आहेत
इच्छा करणे
आणि तसे करणे
इच्छा करणे- तुमच्यामध्ये इच्छा निर्माण करणे.
तसे करणे-कार्य करण्यासाठी तुम्हांला शक्तिशाली करणे व तुम्हाला स्फूर्ति देणे.
मी राजाचा मद्य चाखणारा सेवक (नहेम्या 1:11)
राजवाडयात राजाचा प्यालेबदार असणे हा राजाचा सर्वात भरवशाचा अधिकारी असणे असे होते. राजाने कोणतेही भोजन करण्याअगोदर ते अन्न व पेय प्रथम सेवन करणे व ते चाखणे हे त्याचे कर्तव्य होते. राजवंशातील लोकांस विष देऊन मारून टाकण्याच्या सततच्या भीतीमुळे असे केले जात होते. प्यालेबदाराचे राजाशी असलेल्या घनिष्ठतेमुळे त्यास मोठया प्रभावाचे पद होते. हे पद हे प्रथम उत्पत्ति ४०:१ मध्ये उल्लेख केले आहे.