तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखविले. (जखऱ्या ३:१)
संदेष्टा जखऱ्याने स्वर्गीय न्यायदरबार पाहिला, जेथे यहोशवा जो यहूदाच्या लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहे जो देवाच्या दूतासमोर उभा आहे आणि सैताना द्वारे दोष लावला जात आहे. हा तो यहोशवा नाही, जो मोशे नंतर उत्तराधिकारी झाला होता, परंतु मुख्य याजक जो बंदिवासानंतर यरुशलेमला परत आला होता. (एज्रा ३:२)
सैतान: इब्री भाषेत अक्षरशः 'दोष देणारा' प्रकटीकरण १२:१० सैतानाला, "बंधूंवर दोष लावणारा" म्हणते, तो येथे त्याचे कार्य पूर्ण करीत आहे.तसेच, जेव्हा तुम्ही देवाच्या लोकांवर दोषारोप लावता तुम्ही सुद्धा सैतानाच्या सेवे मध्ये सहभागी होत असता.
सैतान(दोष लावणारा) याचा द्वेष करतो जेव्हा देवाचे लोक प्रार्थना, उपासना, देवाचे वचन वाचणे व मनन करण्या मध्ये परमेश्वराच्या उपस्थितीत येतात. तो त्यास जे सर्व काही करता येईल ते करेल की तुम्हाला थांबवावे.
मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; हा अग्नीतून काढिलेले कोलीत नव्हे काय?(जखऱ्या ३:२)
अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो!
परमेश्वर सैतानास त्याच्या लोकांवर आक्रमण व छळ करू देतो, परंतु तो नेहमीच सैतानाने काय करायचे आहे त्यावर कडकपणे नियंत्रण ठेवतो. सैतानाला पाहिजे होते की शिमोन पेत्राचा नाश करावा, गव्हाप्रमाणे त्यास चाळावे (लूक २२:३१-३२) परंतु येशूने पेत्रा साठी प्रार्थना केली आणि त्याचा पक्ष घेतला आणि सैतानाला त्याची दुष्ट योजना पूर्ण करू दिली नाही.
यहूदा १:९ आपल्याला सांगते की, मीखाएल ह्या आद्यदेवदुताने सैतानाचा सामना करताना ह्याच वाक्याचा उपयोग केला.
देवाचा दूत व मीखाएल याचे येथे उदाहरण हे आपल्याला आध्यात्मिक युद्धासाठी एक आदर्श दाखविते-जे आपण देवाच्या अधिकारासह नेहमीच संघर्ष केला पाहिजे.हे नेहमीच, 'येशूच्या नांवात' आहे. हा तो मार्ग होता ज्याद्वारे प्रेषितांनी केले होते
हे अग्नीतूनकाढिलेलेकोलीतनव्हे काय?
एक कोलीत हे जळत आहे, जळाले किंवा लाकडाचा जळालेला तुकडा आहे जो पूर्णपणे भस्म होईल जर ते अग्नीतून बाहेर काढले नाही.
यहोशवा मुख्य याजकास महानप्रतिष्ठा होती-परमेश्वराच्या दूता नंतर आणि सैतानी आक्रमणा विरोधात संरक्षण दिलेले होते.
तरीसुद्धा, मोठया सौभाग्याचे हे स्थान यहोशवाच्या स्वतःच्या चांगुलपणा किंवा गुणवत्तेवर आधारित नव्हते. त्याला स्वतःलाच अग्नीतून काढिलेल्या कोलीत प्रमाणे सोडविले होते.
हे विसरू नका की तुमच्यापैंकी काही (त्यात मी सुद्धा आहे)हे येथे असले नसते जर परमेश्वराने मध्यस्थी केली नसती. हे आपले चांगले प्रयत्न नाही जे आपल्याला तारण देते, ही त्याची कृपा आहे जी आपल्याला तारण देते.
जेव्हा जॉन वेस्ली ( एक प्रसिद्ध प्रचारक ज्यांनी मेथडीस्ट चळवळ स्थापन केली)केवळ सहा वर्षाचे होते, तेव्हा ते एका जळत्या घरात अडकले होते, आणि तेव्हाच वाचविले गेले जेव्हा एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्याच्या खांद्यावर चढले आणि त्यास खिडकीतून बाहेर ओढून काढले. ह्या दृश्याच्याचित्राने वेस्ली ला आकर्षून घेतले होते आणि त्याने ते चित्र त्यांच्या मरणापर्यंत जपून ठेवले होते, आणि त्याच्या खाली, जखऱ्या ३:२ हे लिहिले, हे अग्नीतूनकाढिलेलेकोलीत नव्हे काय?
यहोशवा मलीन वस्त्रे परिधान करून त्या दिव्यदूतापुढे उभा होता. त्याच्यासमोर जे उभे होते त्यांस तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पाहा, मी तुझा अधर्म तुजपासून दूर केला आहे, मी तुला उंची पोषाख घालीत आहे. मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा, तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदील व पोषाख घातला; आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता. (जखऱ्या ३:३-५)
यहोशवा मुख्य याजक परमेश्वराच्या उपस्थितीत उभा राहिला,परमेश्वरासमोर मलीन वस्त्रे घालून उभा आहे म्हणून सैतान त्यास दोष लावीत आहे. तरीसुद्धा, परमेश्वरयहोशवा ला शुद्ध करून, मलीन वस्त्रे आणि अपराध ज्यास ते प्रतिनिधित करतात ते काढून टाकण्याद्वारे समस्येचे निवारण करतो.
आम्ही सर्व अशुद्ध मनुष्यांसारखे झालो आहो; आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत. (यशया ६४:६)
मी तुला उंची पोषाख घालीत आहे:
यहोशवाकेवळ त्याचा अधर्म दूर केला म्हणूनआनंद करीत नाही, तर त्यास सकारात्मक धार्मिकता दिली गेली आहे-त्यास उंची पोषाख घालण्यात आले आहे. परमेश्वरामध्ये धार्मिकतेद्वारे पोषाख घातले आहे असा विचार येतो.
ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले; ह्यासाठीकी, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. (२ करिंथ ५:२१)
जेव्हा उधळ पुत्र सर्व काही गमाविल्यानंतर पित्याकडे घाणेरड्या वस्त्रासह आला
मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यांत गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.
मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही; पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडा घाला. (लूक १५: २०-२२)
त्यास उत्तम झगा घातल्यावर पिता उधळ्या पुत्रालातसेच जे पाहत होते त्यांना सांगत होता कीत्याचे स्थान पुत्र म्हणून पुनर्स्थापित केले आहे. हा झगा काही कोणाचाही झगा नाही परंतु पित्याचा स्वतःचा झगा आहे.
त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा:
मंदील हे मुख्य याजकाच्या वस्त्राचा एक भाग होता आणि त्याच्या समोरच्या बाजूस कपाळपट्टीवरसोन्याची पट्टी लावलेली होती आणि त्यावर "परमेश्वरासाठी पवित्र" असे कोरलेले होते. (निर्गम २८:३६-३८)
परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशवासप्रतिज्ञापूर्वक सांगितले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
तूं माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपविलेले सर्व सांभाळिले तर तूं माझ्या मंदिरात न्याय करिशील व माझ्या अंगणाचे रक्षण करिशील व तेथे उभे असणाऱ्यात तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन. (जखऱ्या ३:६-७)
तूं माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपविलेले सर्व सांभाळिले:
तारण हे कृपे द्वारे आहे. हे आपल्या चांगल्या कृत्यांनी नाही. दुसऱ्या शब्दात,आज्ञाधारकपणा तारण आणत नाही. परंतु आज्ञाधारकपणा हा तारणाचे फळ किंवा प्रमाण आहे. प्रभु येशूने म्हटले, "जर तुम्ही माझ्यावर प्रीति करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल" तो तारण न झालेल्यांना बोलत नाही तर तारण झालेल्यांना.
तीन गोष्टी होतात जेव्हा आपण त्याच्या आज्ञा पाळतो
१.तूं माझ्या मंदिरात न्याय करिशील
२.माझ्या अंगणाचे रक्षण करिशील
३.तेथे उभे असणाऱ्यात तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन.