ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते, आणि जग त्यांचे ऐकून घेते. (१ योहान ४:५)
एक मार्ग की हे ओळखावे की तुम्ही जगाचे आहात ते तुम्ही कसे बोलता ते ऐकणे आहे.
कारण तो जसा आहे, तसे आपणही ह्या जगात आहोत.
प्रीतीच्या ठायी भीति नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीति भीति घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीति बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.(१ योहान ४:१८)
१ योहान ४:१२ आपल्याला सांगते की, "आपण एकमेकांवर प्रीति करीत असलो तर देव आपल्या ठायी राहतो, आणि त्याची प्रीति आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे."
अधिक लोक, जेव्हा कशाकडे तरी जे सिद्ध आहेअसा संदर्भ देतात, तेव्हा त्यांचा सामान्यपणे अर्थ हा, ते चूक अपूर्ण अवस्थेपासून चूकरहित सिद्धतेच्या अवस्थेमध्ये बदलले आहे.
परंतु नवीन करारात ग्रीक शब्द (टेलीओ)जे प्रेषित योहान वापरीत आहे त्याचा अर्थ येथे तसा नाही. नवीन करारात, ह्या शब्दाचा सामान्यपणे अर्थ हासंपले, किंवा पूर्ण केले किंवा साकार केले असे आहे. जेव्हा काहीतरी, जसे सहल किंवा काही कार्य हे पूर्ण केले गेले, असे म्हणतात कीते"सिद्ध" झाले आहे.
उदाहरणार्थ, तोच शब्द योहान ४:३४ मध्ये वापरला आहे, जेथे येशू बोलतो, "माझे भोजन हे ज्याने मला पाठविले त्याची इच्छा पूर्ण करणे आहे, आणि त्याचे कार्य सिद्धीस न्यावे. "सिद्धीस" नेणे हा शब्द तोच आहे जो १ योहान ४:१२ मध्ये वापरला आहे.
भीति मध्ये शासन आहे
जर तुम्ही विचार करता की परमेश्वर तुमच्यावर रागावला आहे आणि त्याने तुम्हाला शिक्षा करण्याचे ठरविले आहे, तर मग तुम्हाला स्वस्थ होणे किंवा मुक्त होण्यात विश्वास कसा येईल?
तुमच्या चमत्कारासाठी तुम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवू शकता?
तथापि, जेव्हा तुम्ही याचे प्रकटीकरण प्राप्त करता की परमेश्वर तुमच्यावर किती अधिक प्रीति करतो, तर तुम्ही अधिक वेळपर्यंत आजारी किंवा बंधनात राहणार नाही. आपल्यासाठी असणाऱ्या त्याच्या प्रीति वर मनन करणे हे भीति साठी सिद्ध औषध आहे.
आणि जसे आपण देवामध्ये जगतो, आपले प्रेम अधिक सिद्ध असे वाढते. म्हणून आपण न्यायाच्या दिवशी घाबरणार नाही परंतु आपण त्यास आत्मविश्वासाने सामोरे जाऊ कारण आपण ह्या जगात येशू सारखे जगतो. (१ योहान ४:१७)
येथे एक विचार आहे जो माझ्या मनात येतो, त्या दिवशी मी त्यास कसे सामोरे जाऊ शकतो. हे वचन माझ्या प्रश्नाला सिद्धपणे उत्तर देते.
पापकबुली:
मी देवापासून जन्मलेलो आहे, आणि माझ्यामध्ये जगावर विजय मिळविणारा विश्वास राहत आहे. कारण जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. (१ योहान ५:४-५; १ योहान ४:४)
Join our WhatsApp Channel
