डेली मन्ना
19
15
205
काय तुम्ही एकाकीपणाचा संघर्ष करित आहात?
Sunday, 20th of July 2025
Categories :
एकाकीपण
जर तुम्ही उत्पत्ति 1 वाचले, तर तुम्ही तेथे परमेश्वर पृथ्वी आणि त्यातील सर्व निर्माण करीत असलेल्या गोष्टींचा वृत्तांत पाहाल. सृष्टी निर्माण करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर, देव थोडा थांबला आणि त्याने त्याच्या कामाची पडताळणी केली. "आणि देवाने पाहिले की ते चांगले आहे." (उत्पत्ति1:4, 10, 12, 18, 21, 25)
शेवटी, देवाने मनुष्यास त्याच्या स्वतःच्या प्रतिमे मध्ये निर्माण करण्याचा निर्णय केला. त्याने मग आदामास त्याच्या स्वरुपात आणि प्रतिमे मध्ये निर्माण केले. आदाम,पहिला मनुष्य, जो एदेन बागेमधील इतर सृष्ट निर्मिती सारखा नव्हता. परंतु आदामाला एदेन बागेमध्ये ठेवल्या नंतर, देवानेनिरीक्षण केले की तेथे काहीतरी राहून गेले आहे.
देवाने पाहिले की जरी आदामाभोवतीअसंख्य सुंदर प्राणी आणि पक्षी आहेत, जरी तो एका अत्यंत चांगल्या वातावरणात होता-तो एकटा होता. सत्य हे आहे, तुम्ही एका जमावात असू शकता आणि तरीसुद्धा तुम्हाला एकटे वाटेल. हा तो आदामाचा एकाकीपणा होता ज्याने देवाचे लक्ष वेधले आणि हीच पहिली गोष्ट होती ज्यास देवाने म्हटले हे चांगले नाही.
आणि प्रभू परमेश्वराने म्हटले, "हे बरे नाही की मनुष्याने एकटे राहावे." (उत्पत्ति 2:18)
जेव्हा प्रभू वधस्तंभावर होता, त्याने त्याच्या आईला, आणि शिष्य ज्यावर त्याची प्रीति होती त्यास जवळ उभे असलेले पाहिले. त्याने त्याच्या आईला म्हटले, "स्त्री, पाहा हा तुझा पुत्र! मग त्याने त्या शिष्याला म्हटले, "पाहा, ही तुझी आई!" आणि त्या घटकेपासून त्या शिष्याने तिला आपल्या स्वतःच्या घरी नेले. (योहान 19:26-27)
येशू अशा पद्धतीने का बोलला? मी विश्वास ठेवतो, जेव्हा आपला प्रभू वधस्तंभावर रक्तबंबाळ, अत्यंत पीडे मध्येव त्रासात असताना, त्याने त्याच्या आईला एकटे आणि एकाकी असे पाहिले. तो तिला असे तिच्या वृद्ध वयात तिच्या स्वतःची काळजी घेण्यास कसे सोडू शकत होता? त्याने सहसा तिचे छिन्नविछिन्न हृदय पाहिले असेन ज्याविषयी संदेष्टा शिमोन ने भाकीत केले होते (लूक 2:35). वधस्तंभावर असताना सुद्धा येशूने त्याच्या आईची काळजी घेतली. त्याने तिचे एकाकीपण काढून घेतले.
जर मरत असलेला आणि रक्तबंबाळ असा तारणारा कोणाची गरज भागवू शकतो, मग आज कितीतरी अधिकरित्या जेव्हा तो स्वर्गात राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजव्या हाताकडे बसलेला असताना ती गरज भागवू शकतो? (इब्री 8:1).
काय तुम्ही एकाकीपणात संघर्ष करीत आहात? काय तुम्हाला एकटे आणि तिरस्कृत असे वाटते? मग ही वेळ आहे की येशू कडे पाहावे-एक जो ज्याने हे सर्व अनुभविले आहे आणि त्याकडे सामर्थ्य आहे की तुमचा सर्व एकाकीपणा काढून टाकावा.
Bible Reading: Proverbs 29-31, Ecclesiastes 1
प्रार्थना
पित्या, याची पर्वा नाही की मला याक्षणी कसे वाटते. तू म्हटले आहे, मी तुला कधी टाकणार आणि तुला सोडणार नाही. मी या शब्दावर धीर धरून आहे. येशूच्या नांवात, आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● एका उद्देशाने जन्म घेणे● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात
● दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)
● शोधण्याची आणि सापडण्याची कथा
● दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● अडथळ्यांवरमात करण्याचे व्यवहारिक मार्ग
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
टिप्पण्या