डेली मन्ना
आई-वडिलांचा मान राखणे (दिवस ८)
Sunday, 19th of December 2021
48
13
2731
Categories :
उपास व प्रार्थना
आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख. (इफिस ६:२)
शब्द मान हा ग्रीक भाषे मध्ये "मूल्यवान मानने व किंमत देणे" आहे.
बायबल आपल्याला विशेषकरून आज्ञा देते की पृथ्वीवरील आपला बाप व आई ह्यांचा मान राखावा.
आपण त्या पीढी मध्ये राहत आहोत जे तंत्रज्ञान व ज्ञान द्वारे इतके विकसित आहे परंतु मान राखण्यावर इतके खालच्या दर्जाचे झाले आहेत. माझी खात्री आहे की आपल्यापैकी अनेक मजबरोबर यावर सहमत असतील. बायबल भविष्यात्मकरित्या अशा पीढी विषयी बोलते.
येथे अशी पीढी आहे जी बापाला शाप देते व आईला आशीर्वाद देत नाहीत. (नीतिसूत्रे ३०:११)
आश्वासनासह सर्वात पहिली आज्ञा कोणती आहे: (परमेश्वर काय आश्वासन देत आहे)
"तुझे कल्याण व्हावे व तूं पृथ्वीवर दीर्घायू असावे." (इफिस ६:२-३)
बायबल हे गरीबीचे पुस्तक नाही, परंतु हे संपन्नतेचे पुस्तक आहे. जसे आपल्याला पाहिजे की आपली लेकरे आशीर्वादित व संपन्न व्हावीत त्याचप्रमाणे परमेश्वर जो आपला पिता यास पाहिजे की त्याच्या लेकरांनी सर्व गोष्टीत संपन्न व्हावे व आरोग्यात राहावे जसे आपला जीव संपन्न होतो. (३ योहान २)
गरिबी देवाला गौरव आणीत नाही परंतु संपन्नता देवाला गौरव आणते. यात काही आश्चर्य नाही की तो आपल्या संपन्नते मध्ये हर्ष करतो. (स्तोत्र ३५:२७)
मला पाहिजे की तुम्ही दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात
की तुमचे कल्याण व्हावे (संपन्नता)
आणि तुम्ही पृथ्वीवर उदंड आयुष्य जगावे (एक आजार मुक्त जीवन, एक सुदृढ जीवन)
तुम्ही संपन्नतेचा आनंद घेऊ शकत नाही जर तुम्हाला सुदृढ शरीर नाही-ते संतुलन आहे. बायबल स्पष्टपणे सांगते की तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊ शकता जेव्हा तुम्ही एक गोष्ट करता- आपला बाप व आई ह्यांचा मान राखावा.
[खालील प्रार्थना मुद्द्यांवर काही वेळ घालवा, घाई करू नका.]
मुद्दा#१
परमेश्वरा मला क्षमा कर, जर मी माझ्या आई-वडिलांचा कोणत्याही प्रकारे अपमान केला असेन.
परमेश्वरा, मी माझ्या आई-वडिलांसाठी तुला धन्यवाद देतो.
मुद्दा #२
जर तुमचे संबंध तुमचे आई-वडील यांच्याबरोबर असंतुष्ट किंवा विखरले आहे, तर क्षमा, पश्चाताप व समेट ज्याची आवश्यकता आहे त्यासाठी प्रार्थना करा.
मुद्दा #३ जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना साहाय्य देत नसाल, कमीत कमी काहीतरी लहान बाबतीत त्यांना साहाय्य करण्याचा निर्णय करा. त्यांना बक्षीस पाठवा जे त्यांचा मान राखत आहे हे दाखवेल. (कृपा करून याकडे दुर्लक्ष करू नका जसे अनेक करतात.)
जुन्या कराराच्या पुस्तक मलाखी ४:५-६ मध्ये परमेश्वराने म्हटले, "पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्यास तुम्हांकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न होवो."
आपण जेव्हा ह्या वचनाकडे बारकाईने पाहतो, आपण हे जाणतो की परमेश्वराने मोठे मूल्य व महत्त्व पिता व त्याच्या मुलाबाळांबरोबर जोडले आहे.
मुद्दा #४
तुमच्या आई-वडिलांना तुम्हाला आशीर्वाद देण्यास विनंती करा
जर हे शक्य असेन, तर तुमच्या आई-वडिलांना तुम्हाला आशीर्वाद देण्यास विनंती करा.
जर तुम्ही आई-वडील आहात तर तुमच्या लेकरांना बोलवा, व त्यांना आशीर्वाद दया. असे, जितक्या वेळा तुम्ही करू शकता तितक्या वेळा करत राहा. (जर ते मोठे झाले आहेत आणि त्यांना विचित्र वाटते. तर ते जेव्हा झोपलेले आहेत तेव्हा असे करा.)
मुद्दा #५
इतरांसाठी प्रार्थना करा
आता त्यासाठी प्रार्थना करा जे तुम्हाला ठाऊक आहे तसेच ज्यांस आर्थिक चमत्कार व्हावा याची गरज आहे. जे ह्या २१ दिवस कार्यक्रमाचा हिस्सा आहेत त्यासर्वांसाठी प्रार्थना करा की आर्थिकदृष्टया आशीर्वादित व संपन्न व्हावेत.
(यावर कमीत कमी काही ७ मिनिटे किंवा अधिक वेळ खर्च करा जसे परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करतो.)
तुम्ही असे का केले पाहिजे? वाचत राहा....
ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दु:खाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. (ईयोब ४२:१०)
मुद्दा #६
अन्य भाषेत प्रार्थना करा
कमीत कमी १० मिनिटे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. तुम्ही एखादे उपासनेचे गीत ऐकत असे करू शकता. जर तुम्हाला अन्य भाषेचे दान नाही आहे, तर मग १० मिनिटे उपासना व स्तुति करीत वेळ घालवा.
मुद्दा #७
लक्षात ठेवा-तुमची संपन्नता ही एका कारणासाठी आहे-देवाचे राज्य स्थापित करावे.
करुणा सदन सेवाकार्य किंवा ज्या सेवाकार्याने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे व सध्या आशीर्वाद देत आहे त्यांना उदारपणे दान पाठवा.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
फिलिप्पै ३-४ ; कलस्सै १- ४
प्रार्थना
तुमच्या आई-वडिलांच्या निरंतर आध्यात्मिक वाढी साठी प्रार्थना करा, की ते जीवनाचा शेवट आध्यात्मिकदृष्टया अधिक बळकट होऊन करतील. जर तुमचे आई-वडील हे विश्वासणारे नाहीत, प्रार्थना करा की परमेश्वराने त्यांच्यामध्ये विश्वास जागृत करावा की त्यास हाक मारावी व तारण प्राप्त करावे.
प्रार्थना करा की परमेश्वराने तुम्हाला साहाय्य करावे की तुमच्या आई-वडिलांचा खाजगीपणे व सार्वजनिकपणे मान राखावा.
करुणा सदन सेवाकार्या मध्ये आई-वडील व लेकारांमधील संबंधात समेट स्थापित होण्यासाठी प्रार्थना करा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती● कृपे मध्ये वाढणे
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
● दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● २१ दिवस उपवासः दिवस १८
● दिवस १६ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या