डेली मन्ना
5
3
10
देवाचे ७ आत्मे: समज चा आत्मा
Wednesday, 20th of August 2025
Categories :
आत्म्याची नावे आणि शीर्षके
देवाचे ७ आत्मे
आपला प्रभु येशू ख्रिस्तयाचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा दयावा; म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, 'पवित्र जनांमध्ये' त्याने दिलेल्या 'वतनाच्या' वैभवाची समृद्धि केवढी. (इफिस १:१७-१८)
इफिस येथील ख्रिस्ती लोकांसाठी पौलाच्या प्रार्थनेच्या घटकांवरलक्ष दया: "त्यामुळे तुमचे अंत:चक्षु प्रकाशित व्हावे." हे समजच्या आत्म्याचे कार्य आहे.
तोच जो एकमेव आहे जो तुम्हाला आशेचे ज्ञान व समज साठी साहाय्य करतो ज्यासाठी त्याने तुम्हांला बोलाविले आहे आणि संतांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धि केवढी आहे. (इफिस १:१८ ऐम्पलीफाईड)
तिची रुंदी, लांबी, उंचीव खोली किती, हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीति ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे; असेकी तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. (इफिस ३:१८-१९)
इफिस येथील ख्रिस्ती लोकांसाठी पौलाची प्रार्थना ही हे समजण्यासाठी की ख्रिस्ताची प्रीति किती रुंद, लांब, उंचवगहन आहे हे समजावे हे आवश्यक आहे की कारण त्यांनी ख्रिस्ताच्या प्रीतीची गहनता व सामर्थ्य हे अजूनही समजलेकिंवा जाणले नाही. त्यांना सिद्धांतिकबुद्धी व समज होतीपरंतु आत्म्याची समज व आत्म्याचे ज्ञान जे त्यांच्या जीवनात कार्यरत होते त्याबद्दल व्यवहारिक प्रत्यक्षता ठाऊक नव्हती.
मला ते स्पष्ट करू दया:आज अनेक आहेत की ज्यांच्याद्वारे आत्म्याच्या वरदानाची कार्ये होत आहेत परंतु वचनाच्या समज चा अभाव आहे. अशा लोकांनी प्रार्थना करण्याची गरज आहे की त्यांना आत्म्याची समज प्राप्त व्हावी म्हणजे ते इतर संतासोबत ख्रिस्ताच्या सामर्थ्याचीप्रीति त्यांच्यासाठी आणि त्यांच्याद्वारे समजू शकतील.
आत्म्याचा अभिषेक आपल्यावर विभिन्न वेळेला आणि विभिन्न मार्गांनी येतो, परंतु आपल्याला आत्म्याचा उद्देश समजण्याची गरज आहे.
मग येशूने त्यांच्यावर श्वास फुंकला, आणि म्हटले, "पवित्र आत्मा प्राप्त करा." (योहान २०:२२)
आणि सर्वसमर्थाचा श्वास त्यास बुद्धि देतो. (ईयोब ३२:८)
तुम्ही पाहा जेव्हा प्रभु येशूने त्याच्या शिष्यांवर श्वास फुंकला आणि त्यांस म्हटले, "पवित्र आत्मा प्राप्त करा", त्याने प्रत्यक्षात बुद्धीचा आत्मा त्यांना दिला आणि त्यांची मने अभिषिक्त झाली की पवित्र शास्त्र समजावे.
एके दिवशी येशूने लोकांना हे म्हणत शिकविले:
"एका; पाहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला; आणि तो पेरीत असतांना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. (मार्क ४:३-४)
नंतर, जेव्हा हा दाखला त्याच्या शिष्यांना समजावीत असताना, येशूने त्यांना प्रगट केले की बी जे वाटेवर पडले ते त्यास प्रतिनिधित करतात ज्यांनी देवाचे वचन ऐकले परंतु समजले नाही आणि कारण की त्यांनी ते समजले नाही, सैतान ताबडतोब आला आणि त्यांच्या मनातून ते वचन हिरावून घेतले.
आता तुम्ही पेरणाऱ्याचादाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंत:करणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे. (मत्तय १३: १८-१९)
तर मग तुम्ही पाहता की समजणे हे किती महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही राज्याचे वचन ऐकता व त्यास समजण्यास दुर्लक्ष करता, तुम्ही सैतानाला जागा देत आहात की ते तुमच्या अंत:करणातून हिरावून घ्यावे. ह्यामुळेच तुमच्या जीवनात बुद्धीच्या आत्म्याचे कार्य होत राहणे गरजेचे आहे. हा तोच आहे.
Bible Reading: Jeremiah 28-29
प्रार्थना
पवित्र आत्म्या ये. मला ताजेतवाने कर. धन्य पवित्र आत्म्या, पवित्रशास्त्र समजण्यास माझे मन प्रज्वलित कर. देवाच्या पवित्र आत्म्या, माझ्या जीवनाच्या परिस्थितीला पवित्र शास्त्र लागू करण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● स्वर्गाचे द्वार उघडा व नरकाचे द्वार जोरानेबंद करा● दिवस १५ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
● वाईटपद्धतींनानष्ट करणे
● भेट देणे व प्रकटीकरण देण्यामध्ये
● तुमची प्रतिक्रिया काय आहे?
● २१ दिवस उपवासः दिवस १५
टिप्पण्या