डेली मन्ना
26
15
235
देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा
Friday, 22nd of August 2025
Categories :
आत्म्याची नावे आणि शीर्षके
देवाचे ७ आत्मे
यशया ११:२ मध्ये उल्लेख केलेल्या देवाच्या सात आत्म्यापैंकी पाचवा आत्मा आहे. ह्या उताऱ्यात शब्द "सामर्थ्य" याचा अक्षरशः अर्थ सामर्थ्यशाली, प्रबळ, आणि शूर असा आहे. एक कसलेल्या योद्ध्याचे वर्णन करण्यासाठी हे वापरले जाते.
शब्द "सामर्थ्य" हे दाविदाच्या बलाढ्य सैनिकांनी युद्धामध्ये मिळविलेल्या अद्भुत कामगिरीचे वर्णन करण्यासाठी सुद्धा वापरले गेले आहे.
ही त्या बलाढय पुरुषांची नावे आहेत जी दाविदाकडे होती....(२ शमुवेल २३:८)
एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की दाविदाचे बलाढय पुरुष हे तरीही मनुष्य होते, आणि त्यांना त्यांच्या सामर्थ्याची शक्ति कोणा स्त्रोत पासून घ्यावयाची होती. तो स्त्रोत हा पवित्र आत्मा होता. जेव्हा सामर्थ्याचा आत्मा तुमच्यामध्ये कार्यरत आहे, तो तुम्हाला निडर होण्यास लावेल.
यशया ९:६ मध्ये संदेष्टा यशया ने प्रभु येशू ख्रिस्ता विषयी हे भाकीत केले आहे आणि त्यास "सामर्थ्यशाली परमेश्वर" असे म्हटले आहे. देवाचे हे नाव सामर्थ्याच्या गुणाचा संदर्भ देते जे प्रभुत्व करते. बळाच्या प्रदर्शन विषयी ते अशा प्रकारे बोलते की ते शक्तिशाली वर विजय मिळविते.
सामर्थ्याचा आत्मा बाळगणे हे आपल्याला सर्व कठीण परिस्थितीत यशस्वी होण्यास समर्थ करते. ते आपल्याला हे कबूल करण्याच्याही मुद्द्या पुढे घेऊन जाईल की समजण्याच्या मुद्द्यापर्यंत "परमेश्वर समर्थ आहे" की आपण ती समर्थता बाळगतो जे काहीही करू शकते.
सामर्थ्याचा आत्मा आपल्याला योग्यता देतो की हे म्हणावे, "माझा परमेश्वर समर्थ आहे आणि म्हणून मी" (फिलिप्पै ४:१३). समजणे की काय करावयाचे आहे हे ज्ञानाच्या आत्म्याचे कार्य आहे; प्रत्यक्षात तसे करण्याची योग्यता हे सामर्थ्याच्या आत्म्याचे कार्य आहे.
शेवटी, माझ्या बंधुंनो, "प्रभु मध्ये आणि त्याच्या सामर्थ्याच्या आत्म्या मध्ये शक्तिशाली व्हा" (इफिस ६:१०). तुम्ही हे कसे कराल? सामर्थ्याच्या आत्म्याच्या उपस्थिती विषयी अवगत राहा आणि त्यास तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे व्यक्त करू दया.
निराशा व संकटाच्या ह्या समयात, देवाच्या प्रत्येक लेकरांनी सामर्थ्याच्या आत्म्याने भरले जाण्याची गरज आहे, म्हणजे आपण प्रभु साठी महान गोष्ठी पूर्ण करू शकतो. मग ते सेवाकार्य, व्यवसाय, कामाच्या ठिकाणी किंवा खेळामध्ये महान कार्ये करण्याची गोष्ट असो, तुम्हाला सामर्थ्याच्या आत्म्याने भरले जाण्याची गरज आहे.
Bible Reading: Jeremiah 32-33
प्रार्थना
धन्यवादित पवित्र आत्म्या, तूं जो महान आहे तो माझ्यामध्ये राहतो. तूं सामर्थ्याचा आत्मा आहे. तूं माझ्या बरोबर आहे, म्हणून कोण माझ्या विरुद्ध होऊ शकेल.
Join our WhatsApp Channel

Most Read
● भविष्यात्मक मध्यस्थी● देवासाठी आणि देवाबरोबर
● पहारेकरी
● युद्धासाठी प्रशिक्षण
● वेळेवर आज्ञापालन करणे
● इतरांची सेवा करण्याद्वारे आशीर्वाद जो आम्ही अनुभवितो
● प्रकाश हा वचना द्वारे येतो
टिप्पण्या