तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचामुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर. (गणना २७: १८-१९)
मोशे त्याच्या पुढारीपणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आला होता. इस्राएली लोक आश्वासित भूमीच्या किनाऱ्यावर पोहचले होते आणि मोशे च्या आज्ञा न पाळण्या मुळे परमेश्वराने त्यास त्यात प्रवेश करू दिला नाही.
मोशेला देवाने आज्ञा दिली की सर्व लोकांसमक्ष यहोशवा वरआपले हात ठेव हे दाखविण्यासाठी की आता यहोशवा पुढारी झाला आहे.
तसेच, नवीन करारामध्ये जेव्हा डिकन हे निवडले गेले (प्रेषित ६:६), त्यांना प्रेषितांपुढे आणण्यात आले, ज्यांनी प्रार्थना केली आणि त्यांच्यावर हात ठेवले. जुना करार आणि नवीन करार या दोन्हीमध्ये हा प्रकार सारखाच आहे. पवित्र आत्मा हा ह्या लोकांत कार्य करीत होता आणि हात ठेवणे ह्याने केवळ ह्या वास्तविकतेला शिक्कामोर्तब केलेकी देवाचा हात सरळपणे त्यांच्यावर होता.
प्रेषित पेत्र आपल्याला हे म्हणत प्रेरणा देतो, "म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठीकी, त्याने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे. (१ पेत्र ५:६) येथे लीन ह्या शब्दाला ग्रीक शब्द जो आहे त्याचा अर्थ हा, की एका दिन सेवका सारखे आचरण असावे.
यहोशवाने मोशे ची सेवा केली जे काही थोडे वर्ष त्यास त्याचा सहवास मिळाला होता आणिमग योग्यवेळी, तो परमेश्वराची मोठया गोष्टींमध्ये सेवा करण्यास तयार होता.
तीच गोष्ट अलीशा ची होती ज्याने महान संदेष्टा एलीयाची सेवा केली होती. अलीशा ला नेहमी असे ओळखले जाते की ज्याने, "एलीयाच्या हातावर पाणी ओतले होते" (२ राजे ३:११). ही त्याची केवळ ओळखपत्रे होती. त्याने कशाचाही अपेक्षा न करता सेवा केली होती. आज, काही लोकांना त्रास होतो, जेव्हा त्यांचा आदर केला जात नाही किंवा स्टेज वर त्यांचा उल्लेख केला जात नाही. ते चर्च किंवा उपासनेला सुद्धा येण्याचे सोडतात जर त्यांना सार्वजनिकपणे स्वीकारले गेले नाही.
अलीशा अवश्य देवाचा एकमहान सेवक झाला, परंतु त्याने त्याचे प्रशिक्षण एक सेवक म्हणून प्राप्त केले होते! असे केवळ खरे आध्यात्मिक पुढारी हे बनविले जातात. दुसऱ्यांची सेवा करण्याद्वारे स्वतःला नम्र करणे आणि त्याकडून शिकणे ज्यांची आपण सेवा करतो हे त्यात समाविष्ट आहे. कोणीतरी म्हटले आहे, "आपणतसे करण्याद्वारे पुढारीपण देण्यास तयारी करू शकतो." हे महत्वाचे नाही की आपले कार्य हे किती लहान किंवा किती मोठे आहे परंतु आपल्या हृदयाच्या समर्पणाचे आचरण.
तुम्हाला पुढच्या स्तरावर जायचे आहे काय? तर मग तुमची पाण्याची घागरी घेऊन तयार राहा आणि रांगेत व्हा, तुम्हीपुढीलअलीशा, पुढील यहोशवा होऊ शकता?
Bible Reading: Ezekiel 31-32
अंगीकार
मी स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन करेन म्हणजे तो मला योग्यवेळी उंच करेन. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● प्रकाश हा वचना द्वारे येतो● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-२
● कोणीही सुरक्षित नाही
● स्वैराचाराच्या सामर्थ्यास मोडणे-२
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● ते लहान तारणारे आहेत
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
टिप्पण्या