डेली मन्ना
17
14
96
आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1
Sunday, 14th of September 2025
Categories :
आत्म्याचे फळ
पवित्र आत्म्याची फळे ही "स्वीकारली" जातात, त्याउलट त्याची "फळे" ही निर्माण केली जातात. हे आत्म्याच्या फळा द्वारेच आपण आपल्या पापमय स्वभावाच्या इच्छांवर प्रभुत्व मिळवितो.
आत्म्याची फळे विकसित करणे हे प्रभू बरोबरील संबंधाने येते. आत्म्याच्या फळांस आपल्या जीवनात जबरदस्ती करणे हे केवळ शरीराचे कार्य असेन आणि ते एक डोकेदुखीअनुभव होईल.
आत्म्याची फळे ही केवळ आत्म्याद्वारेच निर्माण केली जाऊ शकतात जेव्हा आपण ख्रिस्ताबरोबर एक असतो. पुढील वचनांवर काळजीपूर्वक मनन करा.(त्यांस जितक्या वेळा तुम्ही वाचू शकता तितक्या वेळा वाचा)
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसे फाटा वेळात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात...(योहान 15:4-6)
आत्म्याची फळे विकसित करणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया होतेजेव्हा आपण प्रभूला शरण जातो. त्याच्याबरोबर वेळ घालवून आणि त्याच्याबरोबर संबंध विकसित करून, त्याची प्रशंसा करून की तो आपल्यावर किती प्रीती करतो आणि हे जाणून की तो कोण आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोण व्हावे असे त्यास पाहिजे, आपण येशूला शरण जाऊ लागतो. ती प्रक्रिया त्याच्यामध्ये आपल्याला एकता विकसितकरू देते ज्याचा परिणाम आपल्यामध्ये आत्म्याची फळे विकसित होण्यात होतो.
तो जो बुद्धिमान मनुष्याबरोबर चालतो तो बुद्धिमान होईल
परंतु मूर्खांचे सोबती हे नष्ट होतील. (नीतिसूत्रे 13:20 नवीन किंग जेम्स अनुवाद)
बुद्धिमान बरोबर चला आणि बुद्धिमान व्हा,
मुर्खाबरोबर जुळा आणि संकटात पडा. (नीतिसूत्रे 13:20 नवीन लिविंग अनुवाद)
मुद्दा जो मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तो, म्हणजे आपण त्यासारखे बनतो ज्याबरोबर आपण आपला वेळ घालवितो.
पवित्र आत्म्याबरोबर दररोज संगती करणे हे पवित्र आत्म्याचीफळे निर्माण करण्यास आवश्यक आहे. कशाने तरी मूळ धरले पाहिजे याअगोदरकी त्याने फळ निर्माण करावे. यशया 37:31म्हणते, "मूळ खाली धरावे आणि फळे वरती निर्माण करावीत."
Bible Reading: Ezekiel 36-37
अंगीकार
मी माझे मन वरील गोष्टींवर लावतो जेथे ख्रिस्त आहे; पृथ्वीवरील गोष्टींवर नाही. पवित्र आत्मा त्याची फळे माझ्या जीवनात निर्माण करीत आहे. माझे जीवन हे हजारो लोकांसाठी आशीर्वादाचे होईल.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमच्या सुटकेला कसे राखून ठेवावे● यहूदा च्या जीवनाकडून धडा- २
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● जीवन हे रक्तात आहे
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
● शरण जाण्याचे ठिकाण
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
टिप्पण्या