परंतु [पवित्र] आत्म्याचे [कार्य जे त्याच्या उपस्थितीने पूर्ण होते] फळ हे प्रीति, आनंद [हर्ष], शांति, सहनशीलता [मनोवृत्ती, तसेच धीर], ममता, चांगुलपणा [उपकार], विश्वासूपणा, सौम्यता [दीनता, नम्रता], इंद्रियदमन [संयम, आत्मसंयम] हे आहे; अशाविरुद्ध नियमशास्त्र नाही. (गलती ५:२२-२३ ऐम्पलीफाईड)
ही नऊ गुणवैशिष्ट्ये, आत्म्याची फळे, हेच प्रत्यक्षात देवाचे गुणविशेष आणि स्वभाव आहे. आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे ते गुणवैशिष्ट्ये आणि स्वभाव आहेत.
चालणे, बोलणे असे पवित्र आत्म्याचे प्रकटीकरण असा तो होता. आत्म्याचे फळ हे ख्रिस्ताची स्वतःची "प्रतिमा" आहे.
कारण परमेश्वर त्याच्या लोकांना अगोदरपासुनच जाणून आहे.
त्याने सुरुवातीपासूनच [पूर्वनियोजित करणे] निश्चित केलेले आहे की त्याच्या पुत्राच्या [येशू प्रमाणे आंतरिकतेत त्यानुसार व्हावे] प्रतिमे प्रमाणे बनावे, ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. (रोम ८:२९)
वास्तवात, देवाच्या वचनाचा आणि अभिषेक चा अंतिम उद्देश हा आपल्याला परिवर्तीत करणे व आपले गुणवैशिष्ट्ये त्याच्यासारखे करावे हा आहे.
लक्षात घ्या, प्रभु येशूने म्हटले, "तुम्ही विपुल फळ दिल्याने [निर्माण केल्याने] माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल."
जेव्हा लोक आत्म्याच्या फळा शिवाय आत्म्याच्या वरदाना मध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करतात, वरदान शेवटी भ्रष्ट होते आणि ते त्याच्या पूर्णते मध्ये कार्य करीत नाही.
वरदानाचा असा गैरवापर केल्याने पित्याला काहीही गौरव मिळत नाही. त्यामुळे, हे अत्यंत बंधनकारक आहे की त्याच्या उपस्थिती मध्ये जुळलेले असावे आणि फळ आणावे. पवित्र आत्म्याचे वरदान हे पवित्र आत्म्याच्या फळाच्या समन्वयात व त्याच्या सामर्थ्याच्या प्रभावाखाली नेहमी वापरले गेले पाहिजे.
गणना १७ मध्ये काठी ची कथा सापडते, परमेश्वर मुख्य याजक निवडत असतो आणि मोशेला आज्ञा देतो की प्रत्येक वंशातून एका मनुष्याने त्याची काठी आणावी आणि त्यास दर्शनमंडपातील द्वारापाशी ठेवावी. काठी ज्यास अंकुर फुटेल, त्यास परमेश्वराने मुख्य याजकासाठी त्याची पसंती दाखविलेले ते चिन्ह असेल.
दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले. (गणना १६:७)
प्रभु येशूने म्हटले, "तुम्ही त्यास त्यांच्या फळावरून ओळखाल...." (मत्तय ७:१६). देवाची मुख्य याजकाची निवड सुद्धा काठीवरील फळा द्वारे जाहीर झाली.
Bible Reading: Micah 4-7; Nahum 1
अंगीकार
मी मस्तकाशी (प्रभु येशू ख्रिस्त) जुडलेला आहे. त्यामुळे, माझे जीवन विपुल फळ निर्माण करेल आणि पित्याला आदर आणेल.
Join our WhatsApp Channel

Most Read
● गुप्त गोष्टी समजून घेणे● एल-शादाय चा परमेश्वर
● धार्मिकतेचे वस्त्र
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-५
● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 4
● दिवस ०९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या