डेली मन्ना
नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ (दिवस २१)
Saturday, 1st of January 2022
47
13
1928
Categories :
उपास व प्रार्थना
शालोम
माझ्या व करुणा सदन सेवाकार्याच्या संघाच्या वतीने, मी ही संधी घेत आहे की तुम्हाला अभिवादन करावे, "तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हे २०२२ वर्ष फलदायक व शांतीपूर्ण होवो."
परमेश्वराचा धन्यवाद करा
१ शमुवेल ७:१२ मध्ये आपण वाचतो, की "शमुवेल ने एक दगड घेऊन त्यास मिस्पा व शेण याच्या दरम्यान उभा केला व त्यास एबन-एजर हे नांव देऊन म्हटले की, येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे." परमेश्वराच्या विश्वसनीयतेस धन्यवाद देण्यासाठी का नाही काही वेळ घ्यावा. त्याने आपल्याला येथवर आणले आहे. त्याच्यावर भरवसा ठेवा व तो तुम्हाला पुढेही नेईल.
१. स्वर्गातील पित्या, मला हे पूर्ण पटले आहे की जर माझ्या जीवनात हा तो तूं नसतां, आम्ही येथपर्यंत येऊ शकलो नसतो.
२. पित्या परमेश्वरा, २०२१ ह्या वर्षा मध्ये माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर तुझी विश्वसनीयता, तुझी दया, तुझे मार्गदर्शन व तुझे संरक्षण साठी येशूच्या नांवात मी तुला धन्यवाद देतो.
३. अनमोल अब्बा पित्या, २०२२ ह्या वर्षात मला पूर्ण आत्मविश्वास आहे की माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या संबंधात तू येशूच्या नांवात सर्व काही सिद्ध असे करेल.
तुमच्या स्वतःला, तुमच्या घराला, तुमच्या संपत्तीला व तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना तेलाने अभिषेक करा. जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांना सुद्धा तेलाने अभिषेक करा.
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचने
यशया ४३:१८-१९
यिर्मया २९:११
२ करिंथ ५:१७
प्रार्थना
[प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी १ मिनीट असे करा.]
पित्या, येशूच्या नांवात, २०२१ वर्षामध्ये, प्रत्येक व्यथा व निराशा ज्या मी पाहिल्या आहेत त्यावर मी घोषणा करीत आहे, त्यास येशूच्या नांवात मी पुन्हा कधी व कायमचे पाहणार नाही.
पित्या, येशूच्या नांवात, ह्या २०२२ वर्षात, जसे आम्ही आध्यात्मिकतेमध्ये संपन्न होत आहोत माझ्या व माझ्या कुटुंबीतील सदस्यांच्या जीवनात चांगले आरोग्य मिळावे व सर्व काही चांगले व्हावे, यासाठी येशूच्या नांवात मी प्रार्थना करीत आहे. (३ योहान २)
करुणा सदन सेवाकार्याच्या विरोधातील दुष्टाच्या प्रत्येक अपेक्षा येशूच्या नांवात विखरून जावो.
खात्रीने कल्याण व दया ही माझ्या व माझ्या कुटुंबीयांसोबत ह्या संपूर्ण २०२२ वर्षात व आमच्या संपूर्ण आयुष्यात राहो; व आम्ही परमेश्वराच्या घरात कायमचे राहो.
पवित्र आत्म्या माझ्या नेत्रांना कार्यशील कर की २०२२ वर्षात तुझे गौरव पाहावे.
पवित्र आत्म्या माझ्या कानांना कार्यशील कर की २०२२ वर्षात तुझे गौरव ऐकावे. ज्या मार्गात मी गेले पाहिजे त्याचे मार्गदर्शन मला दे व मला शिकीव.
पवित्र आत्म्या माझ्या हातांना कार्यशील कर की २०२२ वर्षात संपन्न व्हावे.
पवित्र आत्म्या, माझा आत्मा, जीव व शरीरास २०२२ वर्षात येशूच्या नांवात पुनरुज्जीवित कर.
२०२२ ह्या वर्षी, परमेश्वरा, मी तुझा आदर करीन म्हणून मला प्रमाणाबाहेर आशीर्वादित कर. मी तुला सर्व गोष्टींत प्रथम ठेवतो.
कारण तूं हे परमेश्वरा, ह्या २०२२ संपूर्ण वर्षभरात मला व माझ्या कुटुंबियांवर दुताला आदेश देतो, की आमच्या सर्व मार्गात आम्हाला राखावे. ते आम्हाला त्यांच्या हातात झेलून धरितील की आमच्या पायांना दगडाची ठेच लागू नये.
पित्या, येशूच्या नांवात, ह्या पिढीचा इतिहास पुन्हा लिहिण्यास येशूच्या नावात माझा उपयोग कर.
जसे परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करेल तसे पास्टर मायकल त्यांचे कुटुंबीय व करुणा सदन सेवाकार्या साठी प्रार्थना करण्यास कृपा करून काही वेळ घ्या.
हे परमेश्वरा नवीन प्रारंभ करणाऱ्या: २०२२ ह्या वर्षामध्ये: येशूच्या रक्ता द्वारे माझे भूतकाळातील अपयश व लज्जाजनक कार्य पुसून काढ.
गौरवाच्या परमेश्वरा: मला प्रगट हो, व ह्या वर्षात माझी गुप्त लज्जा पुसून काढ! येशूच्या नांवात.
हे परमेश्वरा नवीन प्रारंभ करणाऱ्या: ह्या वर्षी तुझ्या वचनाचे भांडार माझ्या जीवनात प्रगट होवो असे कर व माझ्या जीवनातील प्रत्येक दारिद्रय गिळून टाको! येशूच्या नांवात.
२०२२ ह्या वर्षात मी घोषणा देतो व आदेश देत आहे की माझ्या, माझ्या कुटुंबाच्या व करुणा सदन सेवाकार्याच्या जीवनात आनंद, शांति, चमत्कार व कृपा ही अबाधित अशी येशूच्या नांवात प्रवाहित होत जावो.
त्याचा धन्यवाद व त्याची उपासना सतत करीत राहा.
तुमची साक्ष सांगा: "नोहा" ऐप वर कृपा करून क्लिक करा की तुमच्या साक्षी आम्हाला पाठवावे. तुमच्या साक्षी परमेश्वराचे गौरव करेल व त्याच्या लोकांचा विश्वास वाढवेल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सार्वकालिक निवेश● त्याच्या प्रकाशात नातेसंबंधांचे संगोपन करणे
● प्रेमाद्वारे प्रेरित व्हा
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
● दानधर्म करण्याची कृपा-२
● योग्य पाठपुरावा अनुसरण
● आज पवित्र व्हा आणि अद्भुत कृत्येउद्या होतील
टिप्पण्या