बायबल आपल्याला मोशेच्या निवासमंडपा बद्दल एक उल्लेखनीय आणि सहज दुर्लक्षित तपशीलावर सांगते:
“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर” (निर्गम ४०:२ )
“आणि असे झाले की दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली.” (निर्गम ४०:१७ )
दुसऱ्या शब्दांत, देवाने नवीन वर्षाचा दिवस निवडला ज्या क्षणी इस्राएलमध्ये त्याच्या निवासस्थानाची स्थापना झाली. हे चुकून (नकळत) नव्हते. ते जाणूनबुजून, भविष्यसुचक आणि अत्यंत माहितीपूर्ण होते जसे आपण १ जानेवारी २०२६ मध्ये प्रवेश करू.
देव त्याच्या उपस्थितीने सुरुवात करतो
निवासमंडप ही केवळ एक रचना नव्हती - हे देवाच्या लोकांसोबत राहणाऱ्या देवाची उपस्थितीचे दि-सून येणार चिन्ह होते. देवाने , इस्रायली लोकांचा पुढे विजय, वसाहत किंवा विस्तार करण्यापूर्वी ही खात्री केली की देवाची उपस्थिती प्रथम स्थापन करण्यात यावी.
हे एक अतिशय महत्त्वाचे नियम प्रकट करते: देव वर्षांची सुरुवात कामा पासून करत नाही; तो त्यांची सुरुवात त्याच्या उपस्थितीने करतो.
प्रभू येशूने आपल्याला हाच नमुना (पैटर्न) अनेक शतकांनंतर शिकवला जेव्हा तो म्हणाला,
” तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.”(मत्त. ६:३३)
आशीर्वादित वर्ष हे एकट्या योजनांपासून सुरू होणारे वर्ष नसून, तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी विराजमान असलेल्या देवा पासून सुरू होणारे वर्ष आहे.
एक पवित्र पुन्हस्थापन
पहिला महिना इस्रायलसाठी एका नवीन पर्वाची सुरुवात ठरला. त्याच दिवशी निवासमंडप उभारण्याचा आदेश देऊन, देव त्यांना हे शिकवत होता की प्रत्येक नवीन सुरुवात पवित्र केली गेली पाहिजे.
प्रेषित पौल नवीन करारात हे सत्य सांगतो जेव्हा तो लिहितो,
“म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, पाहा, ते नवे झाले आहे;”( २ करिं. ५:१७)
नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदलत नाही - हे आमंत्रण आहे आपले जीवन देवाच्या उद्देशांनुसार योग्य ठरवण्याचे. आपण जे प्रथम समर्पित करतो ते सहसा पुढील काय होणार आहे ठरवते.
गौरवाच्या आधी रचना असते
प्रभूच्या गौरवाने निवासमंडप भरण्यापूर्वी (निर्गम ४०:३४), मोशेने देवाच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन केले. प्रत्येक पडदा, खोबण (सॉकेट) , वेदी आणि फर्निचर ( मेज ) दैवी आदेशानुसार रचना करण्यात ( ठेवण्यात ) आली होती.
हे आपल्याला शिकवते की देवाचा गौरव जिथे त्याच्या आदेशाचा आदर केला जातो तिथेच असते.
प्रेषित पौल आपल्याला ख्रिस्तीना आठवण करून देतो,
“सर्वकाही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.” (१ करिंथकर १४:४०).
तुम्ही २०२६ मध्ये प्रवेश करताच, देवाला तुमच्या प्रार्थनांमध्येच रस नाही, तर तुमचे निर्णय, शिस्त आणि दैनंदिन आज्ञापालनातही रस आहे. नेहमी लक्षात ठेवा, रचना गौरवासाठी जागा निर्माण करते.
तंबूपासून ते मंदिरापर्यंत ते तुमच्यापर्यंत
निवासमंडप तात्पुरता होता, मंदिर कायमस्वरूपी होते-पण आज त्याहूनही मोठे सत्य आहे:
"तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय? (१ करिंथ ३:१६).
वर्षाच्या या पहिल्या दिवशी, देव तुम्हाला कापड आणि खांबांचा तंबू उभारण्यास सांगत नाही. तो तुम्हाला तुमचे जीवन त्याचे निवासस्थान म्हणून नव्याने सादर करण्यासाठी आमंत्रित करत आहे.
"तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. " (रोमन्स १२: १).
२०२६ साठी भविष्यसूचक आमंत्रण
वर्षाची सुरुवात देवापासून करा-
आणि तुम्हाला ह्या वर्षात काय होणार आहे याचा पाठलाग (पळण्या )करण्याची गरज नाही.
जेव्हा देवाची उपस्थिती प्रथम येते तेव्हा दिशा, तरतूद (पुरवठा) आणि विजय आपल्या पाठीशी असतील .
येशूच्या नावाने, मी भविष्यवाणी करतो, " परमेश्वर तुमच्या पुढे असेल, आणि इस्राएलचा देव या वर्षभरात तुमचा पाठीशी असेल"
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रार्थना
पित्या, जसे प्रेषित मोशेने नवीन वर्षाच्या दिवशी निवासमंडप उभारला, तसेच मी आज माझ्या हृदयात, माझ्या घरात एक वेदी उभारतो. मी तुम्हाला माझ्या जीवनात प्रथम स्थान देतो. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रीतीची भाषा● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-१
● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
● सर्वांसाठी कृपा
● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● आत्म्याची नावे आणि शीर्षक: देवाचा आत्मा
● चिंते वर वर्चस्व मिळविण्यासाठी, ह्या गोष्टींवर विचार करा
टिप्पण्या
