english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. ठेसचा (नाराजी) लपलेला सापळा
डेली मन्ना

ठेसचा (नाराजी) लपलेला सापळा

Monday, 5th of January 2026
11 10 167
ठेस ही ख्रिस्त्यांविरुद्ध शत्रू वापरत असलेल्या सर्वात सूक्ष्म पण विध्वंसक शस्त्रांपैकी एक आहे. ठेस क्वचितच मोठ्याने स्वतःची घोषणा करतो. त्याऐवजी ती दुःख, गैरसमज, अपूर्ण अपेक्षा किंवा जाणवलेला अन्याय यांच्या माध्यमातून शांतपणे हृदयात (मनात) शिरते. पवित्रशास्त्र आपल्याला स्पष्टपणे सावध करते:

“जे तुझ्या नियमावर प्रेम करतात त्यांना महान शांती प्राप्त होते, आणि काहीही त्यांना अडखळवू शकत नाही.” (स्तोत्र 119:165).

येथे वापरलेला “अडखळणे” हा शब्द एका लपलेल्या सापळ्याचा अर्थ दर्शवतो जो वाटेवर ठेवलेला असतो, प्रगती थांबवण्यासाठी. ठेस (नाराजी /अपमान/ दुखावणे) हाच तो सापळा आहे: तो फक्त आपल्याला दुखावण्यासाठी नव्हे, तर आपल्याला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी रचलेला असतो.

ठेस अपरिहार्य आहे, पण कैद ऐच्छिक आहे

प्रभु येशूने कधीही ठेसरहित (अपमानरहित) जीवनाचे वचन दिले नाही. उलट, त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे:

“ठेस (अपमान /दुखावणे) येणारच नाही असे होऊ शकत नाही” (लूक 17:1). 

प्रश्न ठेस येतो की नाही हा नसून, तो आला की आपण काय करतो हा आहे. ठेस घडते तेव्हा ती धोकादायक ठरत नाही; तो मनात साठवून ठेवला जातो तेव्हा तो धोकादायक ठरतो. जे काही प्रश्न न करता हृदयात प्रवेश करते, ते लवकरच मनाला आकार देते, आणि जे मनाला आकार देते ते शेवटी निर्णयांवर नियंत्रण मिळवते. 

नीतिसूत्रे आपल्याला सावध करतात: 

“आपल्या हृदयाचे सर्वतोपरी जतन कर; कारण त्यातूनच जीवनाचे झरे उगम पावतात” (नीतिसूत्रे 4:23). 

ठेसग्रस्त (दुखावलेले/अपमानित) हृदय हळूहळू आनंद, स्पष्टता, विवेक, आणि शांती गमावते. 

अनेक ख्रिस्ती ठेसग्रस्त होऊन सुरुवात करतात पण कठोर होऊन शेवट करतात. इब्री लोकांस लिहिलेले पत्र या प्रगतीबद्दल गंभीरपणे सांगते:

“बंधूंनो, सावध राहा, तुमच्यापैकी कोणाच्याही
ठिकाणी अविश्वासाचे दुष्ट हृदय आढळू नये… पापाच्या फसवणुकीमुळे तुमच्यापैकी कोणी कठोर होऊ नये” (इब्री 3:12–13).

ठेस स्वतःचे समर्थन करून फसवते. ती आपल्याला पटवून देते की आपण मागे हटणे, कठोर शब्द बोलणे, एकाकी होणे, किंवा सेवा करणे थांबवणे योग्य आहे. तरीसुद्धा प्रभु येशूने इशारा दिला आहे की ठेस (अपमानाचा) परिणाम अनेक पटींनी वाढत जातो:

“आणि तेव्हा अनेक जण ठेसग्रस्त होतील, एकमेकांशी विश्वासघात करतील, आणि एकमेकांचा द्वेष करतील” (मत्तय 24:10).

जे वैयक्तिक जखम म्हणून सुरू होते ते नातेसंबंधांचे तुटणे, आध्यात्मिक थंडपणा, आत्मिक थंडपणा आणि अगदी उद्देशापासून दूर जाणे यामध्ये समाप्त होऊ शकते. 
ठेस न मानणारा ख्रिस्त

भविष्यवक्ता यशयाने येशूविषयी भविष्यवाणी केली:

“तो तुच्छ मानला गेला आणि मनुष्यांनी त्याचा त्याग केला… तरीही त्याने आपले तोंड उघडले नाही”(यशया 53: 3, 7).

येशूने विश्वासघात, गैरसमज, खोटे आरोप, आणि परित्याग यांचा सामना केला—तरीही त्याने ठेस मानण्यास नकार दिला. का? कारण ठेस त्याला क्रुसापासून विचलित केली असती.

प्रेषित पेत्र आपल्याला आठवण करून देतो: 

“त्याची निंदा केली गेली तेव्हा त्याने प्रतिनिंदा केली नाही… तर न्यायाने न्याय करणाऱ्या परमेश्वराकडे स्वतःला सोपवले” (1 पेत्र 2:23).

ठेसपासून स्वातंत्र्य हे दुर्बलता नाही ते आध्यात्मिक अधिकार आहे.
ठेस इतकी धोकादायक का आहे
ठेस विवेक आंधळा करतो. तो हेतूंना विकृत करतो. तो संवादांचे अर्थ प्रेमाच्या ऐवजी संशयाच्या दृष्टीने लावतो.

प्रेषित पौल इशारा देतो:

“जिथे मत्सर आणि स्वार्थी अभिलाषा असते, तिथे गोंधळ आणि प्रत्येक प्रकारचे दुष्टपण असते” (याकोब 3:16).

ठेसग्रस्त विश्वासू प्रार्थना करू शकतो, उपासना करू शकतो, आणि सेवा देखील करू शकतो पण शांती, आनंद, आणि स्पष्टता यांशिवाय. बाहेरून सर्व काही सक्रिय दिसते, पण आतून मन संरक्षित आणि बंद झालेले असते.

एक भविष्यसूचक आवाहन

वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या हृदयांची तपासणी करण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो. सवयी तयार होण्यापूर्वी आणि वाटा कठोर होण्यापूर्वी, देव आपल्याला अपमानाच्या मुळाशीच सामना करण्यासाठी बोलावतो.

 दावीदाने प्रार्थना केली:

“हे देवा, मला शोधून पाहा आणि माझे हृदय ओळखा… आणि मला अनंत मार्गावर चालवा.”(स्तोत्र 139:23–24).

Bible Reading : Genesis 19-21
प्रार्थना
प्रभु, माझ्या हृदयातील अपमानाचे प्रत्येक बीज उघडी कर. जे मला जखमी झाले आहे ते बरे कर, जे कठोर झाले आहे ते मऊ कर, आणि तुझ्यासोबत चालताना माझ्या हृदयाचे रक्षण कर. येशूच्या नावाने. आमेन!!

Join our WhatsApp Channel


Most Read
● महाविजयीठरणे
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● रविवारी सकाळी मंडळीमध्ये वेळेवर कसे यावे?
● २१ दिवस उपवासः दिवस २०
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन