english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. अत्यंत प्रभावी लोकांच्या ९ सवयी: सवय क्रमांक ७
डेली मन्ना

अत्यंत प्रभावी लोकांच्या ९ सवयी: सवय क्रमांक ७

Friday, 16th of January 2026
14 14 149
Categories : अत्यंत प्रभावी लोकांच्या ९ सवयी
“गहूचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; पण तो मरण पावला तर तो पुष्कळ फळ देतो.” (योहान१२:२४)

अत्यंत प्रभावी लोक हे समजून घेतात की जे आपण स्वतःसाठी जपून ठेवतो ते हळूहळू कमी होत जाते, पण जे आपण देवाला अर्पण करतो ते अनेकपटींनी वाढते. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की टिकाऊ प्रभाव कधीही आरामातून जन्म घेत नाही, तर समर्पणातून घेतो. जिथे 

स्वतःला जपले जाते तिथे नियती वाढत नाही; जिथे स्वतःला अर्पण केले जाते तिथेच नियती फुलते.

१. शरणागतीद्वारे राज्याची प्रगती होते

उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत, देव आपली उद्दिष्टे अशा लोकांद्वारे पुढे नेतो जे काहीतरी सोडून देण्यास तयार होते. अब्राहामाने
इसहाकाला वेदीवर अर्पण केले (उत्पत्ती २२). हन्नाने शमुवेलाला सोडले (१ शमुवेल १). प्रभु येशूने स्वतःला अर्पण केले (फिलिप्पैकरांस २:५–८).

रोमकरांस १२:१ हे शाश्वत तत्त्व स्पष्टपणे सांगते:
"म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या दयेमुळे तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला मान्य अशी यज्ञ म्हणून अर्पण करावी; ही तुमची योग्य सेवा आहे". 

लक्ष द्या देव आपल्याकडून सोयीची अपेक्षा करत नाही; तो समर्पण मागतो. अत्यंत प्रभावी लोक हे विचारत नाहीत, “मी काय ठेवू शकतो?” तर ते विचारतात, “देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला काय अर्पण करावे लागेल?”

२. त्याग बोलावणं आणि गर्दी यांच्यात फरक स्पष्ट करतो

अनेक लोक येशूचे कौतुक करतात, पण फारच थोडे जण त्याच्यासोबत क्रूसापर्यंत चालतात. जेव्हा त्याने स्वतःचा त्याग करण्याविषयीबोलले, तेव्हा गर्दी कमी झाली (योहान ६:६६). त्याग नेहमीच हे उघड करतो की नियतीबद्दल कोण खरोखर गंभीर आहे आणि कोण फक्त उत्सुकतेपोटी मागे चालतो.

प्रभु येशू स्पष्टपणे म्हणाला:

“जो कोणी माझ्या मागे यायची इच्छा करतो, त्याने स्वतःचा नकार करावा, दररोज आपला क्रूस उचलावा आणि माझ्या मागे यावे”
(लूक ९:२३).

अत्यंत प्रभावी लोक हे स्वीकारतात की खरे शिष्यत्व याची एक किंमत असते. ते हे समजून घेतात की देवामधील प्रत्येक उंचीला पोहोचण्यासाठी ‘स्वतःचा’ त्याग होणे आवश्यक आहे.

३. त्यागातून आत्मिक अधिकार निर्माण होतो

पवित्र शास्त्रानुसार अधिकार पदामुळे दिला जात नाही; तो शरणागतीद्वारे घडवला जातो. प्रेषित पौल म्हणतो, “मी दररोज मरतो” (१ करिंथकर १५:३१).

हा दररोजचा मृत्यू विलक्षण अधिकार, सहनशक्ती आणि फलदायित्व निर्माण करतो. ज्याला अनेकजण “थकवा”
म्हणतात, त्याला शास्त्र अपूर्ण शरणागती (समर्पण) म्हणते. जेव्हा स्वतः अजूनही सिंहासनावर असते, तेव्हा दबाव माणसाला हरवून टाकतो; पण 
जेव्हा ख्रिस्त राज्य करतो, तेव्हा कृपा आपल्याला टिकवून ठेवते.

अत्यंत प्रभावी लोक शत्रूसाठी धोकादायक असतात, कारण ते आधीच प्रतिष्ठा, आराम आणि टाळ्यांबद्दल मेलेले असतात.

४. स्वतःचे संरक्षण हे नियतीचे लपलेले शत्रू आहे

पेत्राने येशूला दुःखापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कठोर शब्दांत झिडकारण्यात आले (मत्तय १६:२२–२३). का?
कारण स्वतःचे संरक्षण अनेकदा शहाणपणासारखे वाटते, पण ते देवाच्या उद्धाराच्या योजनेच्या विरोधात जाऊ शकते.

प्रभु येशूने आपल्याला इशारा देताना म्हटले,

“जो कोणी आपले जीवन वाचवण्याचा प्रयत्न करतो, तो ते गमावेल” (लूक १७:३३).

अत्यंत प्रभावी विश्वासू ओळखतात की कधी संरक्षण हे अवज्ञा बनते. ते सुरक्षिततेपेक्षा आज्ञाधारकता, आरामापेक्षा बोलावणं आणि पसंतीपेक्षा उद्देश निवडतात.

५. त्यागातून वाढ (गुणाकार) उघडतो

क्रूस पराभवासारखा दिसत होता पण त्यातून जगासाठी तारण जन्माला आले. हेच राज्याचे नियम आहेत: वाढ होण्याआधी मृत्यू येतो.

पौलाने या नियमाची पुष्टी करत म्हटले:

“प्रभू येशूचे जीवनही प्रकट व्हावे म्हणून नेहमी शरीरात त्याचे मरण घेऊन फिरत राहा” (२ करिंथ ४:१०).

अत्यंत प्रभावी लोक त्यागाला स्वीकारतात, कारण ते वेदनेपलीकडे असलेले वचन पाहतात. त्यांना माहीत आहे की देव कधीही अर्पण
केलेले जीवन वाया घालवत नाही.

हीच सवय क्रमांक ७ आहे.
जे लोक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जगतात ते कदाचित फक्त जगतील पण जे समर्पणाने जगतात ते पिढ्यांना परिवर्तन घडवतील.

बायबल वाचन योजना: उत्पत्ति ४५-४६
प्रार्थना
पित्या, मी माझे जीवन पुन्हा एकदा अर्पण करतो. स्व-संरक्षणाची पकड तोड, मला दररोज स्वतःसाठी मरण्याचे सामर्थ्य दे आणि माझ्या त्यागाचा तुझ्या गौरवासाठी पिढ्यान्पिढ्या प्रभाव निर्माण होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन!!




Join our WhatsApp Channel


Most Read
● भविष्यात्मकदृष्टया शेवटच्या समयाचे संकेत काढणे
● स्वर्गाचे द्वार उघडा व नरकाचे द्वार जोरानेबंद करा
● प्रीति साठी शोध
● प्रार्थनेची निकड
● प्रीति-जिंकण्याची योजना -२
● देवा बरोबर चालायला शिकणे, त्याच्या पुढेनाही
● मानवी भ्रष्टतेमध्ये देवाचा अपरिवर्तनीय स्वभाव
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन