english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. पेंटेकॉस्ट साठी वाट पाहणे
डेली मन्ना

पेंटेकॉस्ट साठी वाट पाहणे

Friday, 22nd of May 2026
18 13 158
Categories : पेंटेकॉस्ट
कधी नाही एवढया महान गुरु द्वारे शिष्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. त्यांनी त्यास वधस्तंभावर दिलेले पाहिले होते आणि आता तो त्यांच्या मध्य जिवंत होता. ते किती उल्लासित झाले असतील?
त्यांना असे वाटले असेन की जावे व प्रत्येकाला सांगावे की त्यांना ठाऊक आहे की येशू हा वास्तवात प्रभु व मशीहा होता. आणि तरीही प्रभूने त्यांना म्हटले, "पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हांकडे पाठवितो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरांत राहा (वाट पाहा)." (लूक २४:४९)

ते इतके उत्साही व आवेशी होते की जावे व जगाला पुनरुत्थित प्रभु विषयी सांगावे, येशूने त्यांना सावधान केले व त्यांना प्रोत्साहन दिले की कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचे ज्ञान व सामर्थ्यावर विसंबून राहू नका परंतु त्याऐवजी यरुशलेम मध्ये थांबून राहा जोपर्यंत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जात नाही.

आजच्या समाजात कोणालाही थांबून राहण्यास आवडत नाही, वाट पाहण्यास वेळ फुकट घालविणे असे समजले जाते, निष्फळ असे-तुम्ही कशाचेही नांव घ्या. मानवी मनाचे स्वाभाविक शब्दावडंबर हे की आपण का वाट पाहावी कारण त्याचवेळी आपण अधिक कार्य करू शकतो. आणि तरीही, देवाच्या दैवी ज्ञाना मध्ये वाट पाहणे हे सामर्थ्यशाली होऊ शकते.

प्रार्थना व उपासने मध्ये परमेश्वराची वाट पाहणे हे समर्पणाचे कृत्य आहे जे आज्ञाधारकते मधून जन्म घेते. प्रार्थना व उपासने मध्ये वचनावर मनन करीत परमेश्वराची वाट पाहणे हे शरीराच्या इच्छेला संपवून टाकू शकते. पेंटेकॉस्टचा अनुभव करीत शिष्यांचे हे टीकात्मक भाष्य होते आणि आज सुद्धा हे तसेच आहे.

यशया ४०:३०-३१ मध्ये पवित्र शास्त्र सांगते, "तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत."

वाट पाहण्यासाठी इब्री शब्द हा "कवा" आहे-त्याचा शब्दशः अर्थ हा की वेळ घेणे, किंवा त्याच्या उपस्थिती मध्ये घुटमळणे व स्वतःला त्याच्याबरोबर एकरूप करून घेणे. हे मनोरंजक आहे की नाही! स्तोत्र २५:५ म्हणते, "तूं आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करितो."

येथे निश्चितपणे वाट पाहण्याच्या प्रक्रीयेमध्ये किंमत सामावलेली आहे आणि त्यामुळेच अनेक जणांना किंमत भरण्यास कठीण वाटते. परंतु जसे देवाच्या एका महान मनुष्याने एकदा म्हटले होते, "देवाला आज्ञाधारक समर्पण ही पात्रता किंमत आहे."

बायबल वाचन:‌ १ इतिहास २६-२८
प्रार्थना
१. परमेश्वरावर विसंबून राहीन  व त्याच्या वचनावर मी माझी आशा धरून राहीन.

२. मी परमेश्वरावर विसंबून राहीन, व त्याच्या मार्गानुसार चालेन. भूमी वारशाने मिळविण्यासाठी तो मला श्रेष्ठ करेल.

Join our WhatsApp Channel


Most Read
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-२
● सात-पदरी आशीर्वाद
● दिवस १५ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● अत्यंत प्रभावी लोकांच्या ९ सवयी: सवय क्रमांक ८
● ख्रिस्ताबरोबर बसलेले
● कलंकित करणाऱ्या पापासाठी अद्भुत कृपेची आवश्यकता आहे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन