english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. तुमच्या रांगेतच राहा
डेली मन्ना

तुमच्या रांगेतच राहा

Thursday, 13th of February 2025
25 16 232
Categories : एस्तेरचे रहस्य: मालिका
"कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करितात त्याच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करीत नाही; ते तर स्वतःच स्वतःशी आपले मोजमाप करितात, व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करितात; हा शहाणपणा नाही. (२ करींत. १०:१२)

आपण एका स्पर्धात्मक जगात जगत आहोत. लोक दररोज प्रयत्नशील राहतात की इतरांवर वर्चस्व मिळवावे आणि इतरांपेक्षा हुशार व्हावे. कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि सर्वात वाईट, चर्चमध्ये देखील. काही लोक स्वतःला चांगले असे पाहत नाहीत, जर इतर कोणी त्यांच्यापेक्षा उत्तम आहे. ते त्यांच्या जीवनात देवाच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष करतात आणि तक्रार करतात की देवाने काहीही केलेले नाही कारण ते इतरांना त्यांच्यापेक्षा वरचढ असे पाहतात. असे लोक आरामात असतात जेव्हा ते इतरांपेक्षा उत्तम होतात, परंतु त्याक्षणी जेव्हा त्यांच्या संघातील किंव चर्चमधील सदस्य साक्ष देतो की देवाने काय केले आहे, तेव्हा त्यांना कटू वाटते आणि त्यांच्यात द्वेष निर्माण होतो. तुम्ही यासारखे आहात काय? तुमची प्रतिक्रिया काय आहे जेव्हा देव इतरांना आशीर्वाद देतो?

ही कल्पना करण्यात अधिक श्रम लागत नाही की स्पर्धात्मक लोकांचे चित्रण करावे जे राजाच्या स्त्रियांच्या निवासस्थानात एस्तेरच्या समयी उद्भवले असेन. क्षुल्लक स्पर्धा, भांडणे, मत्सर, द्वेष याची कल्पना करा. आध्यात्मिक विवेक राखणे किती कठीण असेल याची कल्पना करा जेव्हा तुमच्या सभोवतालचे सर्वकाही आणि प्रत्येक जण हे तुमच्या शरीराची स्थिती आणि आकार आणि तुमच्या चेहऱ्याची सुंदरता यावरच केवळ भर देत असतील!

तथापि, एस्तेरबद्दल अलौकिक प्रेम आणि भपकेदारपणा असा दिसतो- ज्यामुळे लोक जे सत्तेच्या अधिकारामध्ये होते त्यांच्याकडून अत्यंत प्रामाणिकपणा आणि कृपा प्राप्त केली होती-त्यामध्ये तिचे शत्रू देखील होते! हे जसे काही अदृश्य हाताने प्रत्येक अडथळा बाजूला केला होता की प्रगती करावी आणि योजनाबद्धरित्या स्वतःला योग्य ठिकाणी आणावे. ही ती कृपा होती ज्याने एस्तेरला राजा अहश्वेरोशच्या केवळ वासनेचे लक्ष्य यावरून त्याच्या प्रेमाचे लक्ष्य अशा उच्चपदावर नेले होते. आयुष्यभराच्या परीश्रामापेक्षा एक दिवसाची कृपा अधिक योग्य ठरू शकते!

एस्तेर २:१५ मध्ये बायबल म्हणते, "मर्दखयाचा चुलता अबीहइल याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून पाळिले होते, तिची राजापाशी जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही, ज्याने ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिजवर कृपादृष्टि झाली."

काही स्त्रियांनी कदाचित हे तपासले असेन की इतर स्त्रिया काय वापरत आहेत आणि काहीतरी प्रबळ आणि अधिक मोहक वस्तूंची मागणी केली. कदाचित त्यांनी इतर स्त्रियांना त्यांच्या सौंदर्यासाठी आदर्श असे पाहिले होते, पण एस्तेर वेगळी होती. वचन १५ वाचल्यावर मला आश्चर्य होतो, की एस्तेर याविषयी अवगत होती काय की राणीचे पद हे स्पर्धात्मक असे आहे. तिची विनंती काही प्रमाणात अपुरी दिसते. अहाहा! तिने तिची निवड राजाच्या खोजावर सोडली होती.

क्षमा असावी, ही कशा प्रकारची विचारसरणी आहे? तुम्ही सुद्धा तसाच विचार कराल. परंतु एस्तेरला ठाऊक होते की इतरांबरोबर स्पर्धा करून कोणीही अधिक प्राप्त करू शकत नाही. तिला ठाऊक होते की जीवन ही एक शर्यत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला धावण्यासाठी त्यांच्या स्वतःचा मार्ग आहे. बऱ्याच वेळा, आपण आपली रांग सोडतो आणि दुसऱ्यांच्या रांगेत धावू लागतो. ठीक, खेळाचा नियम सांगतो जरी तुम्ही शर्यत जिंकली, तरीही तुम्हाला अपात्र ठरविण्यात येईल कारण तुम्ही चुकीच्या रांगेत होता.

माझ्या मित्रा, तुमच्या रांगेत राहा आणि तुमची धाव धावा. देवाकडे त्याच्या सर्व लेकरांसाठी योजना आहेत, त्यात तुम्ही देखील आहात. त्यास "बहु-छाती असलेला परमेश्वर" म्हणतात कारण त्यास त्याच्या सर्व लेकरांसाठी जागा आहे. स्पर्धात्मक आत्मा आपल्याला इतरांच्या प्रगतीमुळे द्वेष आणि मत्सर करणारा करू शकतो. रोम. १२:१५ मध्ये बायबल म्हणते, "आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा", त्यांचे अभिनंदन करा कारण कोणाचेही यश हे तुमच्या अपयशाचे कारण होत नाही. आकाश हे इतके विशाल आहे की सर्व पक्ष्यांना एकमेकांना धडक मारल्याशिवाय उडता येते. हवेमध्ये दोन विमानातील धडकमुळे किती विमानांचा नाश झाला आहे असे तुम्ही ऐकले आहे काय? आकाश हे विशाल आहे.

म्हणून आनंदी राहा, आणि तुमची धाव धावत राहा. एका ज्ञानी माणसाने एकदा म्हटले होते, "जेव्हा देव माझ्या शेजाऱ्याला आशीर्वाद देतो, मी उत्सव करतो कारण हे दाखविते की देव शेजारी आहे. तो माझ्या घराकडे लवकरच येईल." ही तुमची वृत्ति असली पाहिजे. देवाला तुमच्यासाठी निवड करू दया जसे खोजाने एस्तेरसाठी निवड केली, आणि मग तुम्ही खात्रीशीर राहाल की ते तुमच्यासाठी उत्तम असे आहे.

Bible Reading: Numbers 1-2
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की तूं मला शांतचित्त असण्यासाठी साहाय्य कर. मी प्रार्थना करतो की तूं मला साहाय्य कर की प्रत्येक स्पर्धात्मक आत्म्यावर विजय मिळवावा म्हणजे मी शांतपणे जीवन जगू शकावे. येशूच्या नावाने मी माझे हृदय माझ्या शेजाऱ्यासाठी खुले करीत आहे. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका
● अभिषेकाचा एक नंबरचा शत्रू
● तुमच्या नवीन वाटचालीस प्राप्त करा
● दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
● ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात का?
● उपास कसा करावा?
● राज्यात नम्रता आणि सन्मान
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन