डेली मन्ना
42
11
3005
देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
Tuesday, 30th of November 2021
Categories :
देवाचे वचन
अनेक वर्षे मी पाहिले आहे की लोक देवाच्या वचनाकडेलक्ष देत नाही.दिवस आणि आठवडे देवाचे वचन न वाचता काही हे जीवन जगत असतात.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ति जो चर्च मध्ये वर्षांपासून आहे फार क्वचित देवाच्या वचनाचा पद्धतशीर अभ्यास केला आहे. देवाचे वचन वाचण्याचे येथे अनेक लाभ आहेत. असे होवो की पवित्र आत्मा याचा उपयोग करो की तुमच्यामध्ये त्याच्या वचनासाठी भूक आणि तहान निर्माण करो.
खालील गोष्ट काळजीपूर्वक वाचा.देवाकडून राजा साठी हा सल्ला होता
तो आपल्याराजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांपाशी असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी; ती त्याच्यापाशी असावी,
आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्राच्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावयाला शिकेल.
असेकेल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवीडावीकडे वळणार नाही; तसेच तो व त्याचे वंशज इस्राएल लोकांमध्ये चिरकाल राज्य करतील. (अनुवाद १७:१८-२०)
एक राजाला देवाचे वचन दररोज वाचवायचे होते-जोपर्यंत तो ह्या पृथ्वीवर जगत होता. ह्याने राजाला अनेक बाबतीत परिपूर्ण केले होते
1.देवाच्या भयात चालण्याचे तो शिकेन
2. ते त्यास गर्व करण्यापासून राखेन
3. ते त्यास देवाच्या मार्गापासून दूर जाण्यापासून राखेन
4. ते त्याच्या स्वतःसाठी आणि त्याच्या लेकरांसाठी उदंड आयुष्याची खात्री देईन.
5. त्याचे पुढारीपण स्थिर होईन.
बायबल सांगते की त्याच्या सिद्ध बलिदानाने, येशू ख्रिस्ताने त्याचा परमेश्वर आणि पिता ला आपणांस राजा आणि याजक असे केले आहे (प्रकटीकरण १:६). तुम्ही आणि मी राजे आणि याजक आहोत.
याजक म्हणून, पित्या समोर आपल्याला स्तुती आणि मध्यस्ती चे बलिदान अर्पण करण्यास बोलाविण्यात आले आहे. राजे म्हणून, आपल्याला आजारी लोकांना स्वस्थ करण्याद्वारे आपला अधिकार गाजवायचा आहे आणि शुभवर्तमानाच्या खातर भुते काढायची आहेत. देवाचे हे पाचारण प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी, आपल्याला देवाच्या वचनाने तयारी करण्याची गरज आहे जसे परमेश्वराने अनुवाद १७:१८-२० मध्ये राजाला सांगितले.
परमेश्वर त्यांचा आदर आणि त्यास आशीर्वाद देण्यास वचनबद्द आहे जे त्याच्या मौल्यवान वचनावर प्रीति करतात आणि त्याचा आदर करतात. उत्पत्ति पासून प्रारंभ करून प्रकटीकरणा पर्यंत, परमेश्वर त्याचे मन आणि हृद्य आपल्याला प्रकट करतो. सर्व काही सुकून जाईन, परंतु देवाचे वचन सर्वकाळ स्थिर राहते.
(यशया ४०:८). जेव्हा आपण त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो आणि ते पाळतो, आपले जीवन हे त्याच्या गौरवाने प्रकाशेल.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी तुझे आभार मानतो की तूं तुझे वचन नेहमीच कार्य करण्यात समर्थ आहे. मला कृपा पुरीव की दररोज तुझे वचन वाचावे आणि त्यावर मनन चिंतन करावे. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● याचा अर्थ काय आहे, येशूचे कार्य करणे आणि त्यापेक्षा मोठी कार्य करणे?● अत्यंत थकून गेल्याची व्याख्या करणे
● बी बद्दल आश्चर्यकारक सत्य
● देवाला प्रथम स्थान देणे # 1
● २१ दिवस उपवासः दिवस १६
● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -१
टिप्पण्या