english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. काठी ज्यास अंकुर आले
डेली मन्ना

काठी ज्यास अंकुर आले

Sunday, 26th of July 2026
15 12 116
Categories : परमेश्वराची उपस्थिती
परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे त्याचे नांव लिही. (गणना १७:१-२)

लक्षात घ्या काठी ला त्याच्या स्त्रोत पासून वेगळे केले गेले होते. स्वाभाविकपणे म्हटल्यास, काठीने वाढणे व फळ देण्याची त्याची क्षमता गमाविली होती कारण त्यास झाडापासून वेगळे केले गेले होते.

हे असे असू शकते जेव्हा तुम्ही हे वाचता,तुमच्या जीवनाचा काही भाग हा ह्या काठी प्रमाणे सुकला आहे ज्याविषयीमी आत्ताच म्हटले आहे. कदाचित तुम्हाला एक स्वप्न, दृष्टांत झाला असेन आणि ते जशी वेळ निघून गेली तसे अंधुक होऊन गेले असेन. मी विश्वास ठेवतो, तुमची कथा ही आज बदलणार आहे.

मनोरंजकपणे, प्राचीन इस्राएली संस्कृती मध्ये, एक काठी ही:
१. अधिकार व सामर्थ्याचे प्रतीक  होते (निर्गम ४:२०; निर्गम ७:९-१२)

२. न्यायाचेप्रतीक होते (स्तोत्र २:९; नीतिसूत्रे १०:१३) राजदंड शी संबंधित (यहेज्केल १९:१४)

आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. (गणना १७:४) परमेश्वराने मग मोशेला सांगितले की त्या काठ्यांना त्याच्या समक्षतेत ठेवावे-इतरत्र नाही परंतु त्याच्या समक्षतेत. याची पर्वा नाही, की तुमची परिस्थती कशी आहे, दररोज परमेश्वराच्या समक्षतेत स्वतःला नेणे. त्याचीस्तुति करीत, संगीत ऐकत वगैरे करण्याद्वारे त्याच्या समक्षतेला जपावे. त्याची समक्षता गमावू नका. ही किल्ली आहे.

दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले. (गणना १७:८)

फळ येण्याच्या तीन पायऱ्या
१. अंकुर
२. फुलणे
३. बदाम-फळ

हे सर्व घडले जेव्हा काठी रात्रभर देवाच्या समक्षतेत ठेवलेली होती. ज्यासाठी तुम्हाला वर्षे व महिने लागले, त्यास केवळ दिवस लागेल जेव्हा तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या समक्षतेत आणाल. कठीण विषयात परिणाम दिसू लागतील. परमेश्वर जलद कार्य करेल जे तुमचे मन सुद्धा कल्पना करू शकणार नाही.

मी भारताच्या ह्या राज्यात शुभवर्तमान सांगत होतो. तेथे एक स्त्री होती जी तिच्या तोंडातील कॅन्सर ने त्रासात होती. त्या संध्याकाळी, मी त्यांना तीच गोष्ट सांगितली जी मी तुम्हाला आत्ताच सांगितली आहे. तुमच्या स्वतःला परमेश्वराच्या समक्षतेत आणा. त्या संध्याकाळी ही स्त्री स्टेज वर साक्ष देण्यासाठी आली की तिचे ते कॅन्सर चे फोड फुटले आहे आणि तेथे सर्वत्र रक्तच रक्त होते. स्वयंसेवकांनी कापड आणले की ते रक्त पुसावे. प्रामाणिकपणे म्हणतो, मी थोडे घाबरलो. पुढील दिवशी ती सकाळीच हॉस्पिटल ला गेली जेथे तपासणी केली जाते. ती कॅन्सर मुक्त झाली होती. डॉक्टर सुद्धा आश्चर्यात होते.

त्याचे वचन किती सत्य आहे!
जीवनाचा मार्ग तूं मला दाखविशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. (स्तोत्र १६:११)

तुमच्या स्वतःला त्याच्या समक्षतेत आणा. तुमची कथा ही आत्ताच बदलत आहे.

बाइबल पढ़ना: यशया ६-९
प्रार्थना
स्वर्गातील पित्या, आम्ही इच्छा करतो की आमच्या जीवनात दररोज तुझीपवित्र दैवीसमक्षता अनुभवावी. आमच्याबरोबर नेहमीच राहा, आमच्या अंत:करणाला स्पर्श कर, आम्हालाआकार दे, घडीव व आम्हाला मार्गदर्शन दे. येशूच्या नांवात. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● विश्वासात किंवा भयात
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – २
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● भविष्यात्मकदृष्टया शेवटच्या समयाचे संकेत काढणे
● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
● आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन