डेली मन्ना
याचा अर्थ काय आहे, येशूचे कार्य करणे आणि त्यापेक्षा मोठी कार्य करणे?
Thursday, 17th of November 2022
39
18
1660
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. (योहान १४: १२)
१. प्रभूचे आश्वासन हे केवळ प्रेषितांसाठी केलेले नाही, परंतु त्या सर्वांसाठी जे विश्वास ठेवतात.
२. प्रभूचे आश्वासन हे आहे की जे कार्य त्याने केले आहे ते आपण करणार आहोत.
३. निष्कर्षा मध्ये, प्रभु आपल्याला आश्वासन देतो की आपण त्याने जे केले त्यापेक्षा मोठी कार्ये करू.
येशूने हे आश्वासन दिले की आपण ती कार्ये करू जी कार्ये त्याने केली. याचा अर्थ हा आहे काय कीजे सर्व चमत्कार त्याने केले ते आपण करू?
१ करिंथ १२ मध्ये पौल म्हणतो,
प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सामान्य चांगल्या कार्याकरिता दिले गेले आहे. कारण एखाद्याला त्याच आत्म्यानुसार ज्ञानाचे वचन मिळते...........एकाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एकाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; एकाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ति;.....सर्व चमत्कार करतात काय? सगळ्यांनाच निरोगी करण्याची कृपादाने आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? (१ करिंथ १२: ७-१०, २९-३०)
जर येशूचे हे म्हणणे नव्हते की सर्व विश्वासणारे हे त्याच्यासारखे चमत्कार करणारे असावे, तर त्याचा प्रत्यक्षात काय अर्थ होता जेव्हा त्याने म्हटले, "जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो सुद्धा जे कार्य मी करतो त्याच्याप्रमाणे करेल?
योहान १७ मध्ये, येशूने प्रार्थना केली, "[पित्या] मी तुझे पृथ्वीवर गौरव केले आहे, जे कार्य तू मला करावयास सांगितले होते ते पूर्ण केले आहे." (योहान १७: ४)
त्याचे कार्य हे जे त्याने केले होते की त्याच्या पित्याच्या गौरवाकडे लक्ष केंद्रित करावे. म्हणजे याचा अर्थ हा की आपण सुद्धा आपल्या शब्दाने व कृतीने जगाचे लक्ष येशू ख्रिस्त आणि पित्या कडे आणावे.
जर तुम्ही विचार करता, "मोठया गोष्टी" म्हणजे"अधिक चमत्कार" तर मग मला अजूनही पाहावयाचे आहे की कोणीतरी 5000 लोकांना पाच भाकरी आणि दोन मासा द्वारे तृप्त भोजन करविले आहे, हे तर सोडूनच दया की पाण्यावर चालावे आणि लाजराला मरून गेल्यावर 4 दिवसांनी कबरेतून पुन्हा जिवंत करावे.
येशूच्या'मोठया गोष्टी' साठी एक क्लुप्ती ही 'कारण मी माझ्या पित्याकडे जातो' ह्या वाक्यात आहे
येशूने आश्वासन दिले की तो पित्याकडे गेल्यानंतर, तो त्यांना पवित्र आत्मा पाठवून देईल की त्याने त्यांच्यामध्ये निवास करावा.
मोठी कार्ये ही शुभवर्तमानाच्या सामर्थ्याकडे केंद्रित करतात की जीवने ही पवित्र आत्म्याच्या द्वारे परिवर्तीत करावी जसे ते प्रेषितांच्या साक्षीने पसरले. पेंटेकॉस्ट च्या दिवशी पेत्राच्या प्रचाराने, 3000 लोकांचा नवीन जन्म झाला, कदाचित येशूने त्याच्या संपूर्ण सेवाकार्या दरम्यान इतके परिवर्तीत झालेले पाहिले नसेल!
अशा प्रकारे प्रभु आपल्या प्रत्येकाचा उपयोग करतो की त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थानाची सुवार्ता ही पसरावी, आपण ती कार्ये करीत आहोत जी त्याने केली आणि मोठी कार्ये त्या अर्थाने की नवीन करार हा जुन्या करारापेक्षा उत्तम आहे. (इब्री ८: ६)
प्रार्थना
पित्या, मी तुझ्या आत्म्यासाठी तुझा आभारी आहे. जी कार्ये येशूने केली आणि त्यापेक्षा मोठी कार्ये सुद्धाकरण्यासाठीमाझ्याकडे सर्व काही आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● महान पुरस्कार देणारा● बेखमीर अंत:करण
● येशू खरेच तरवार आणण्यासाठी आला होता काय?
● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात
● २१ दिवस उपवासः दिवस १७
● दिवस ३३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
टिप्पण्या