मार्क ९:२३ मध्ये प्रभु येशूने म्हटले, "जो विश्वास ठेवतो त्यास सर्व काही शक्य आहे...". अनेक वेळेला मी त्या लोकांच्या संपर्कात येतो जे स्वतःला 'विश्वासणारे' म्हणून ओळख दाखवितात (यात काहीही चूक नाही). तथापि, मी पाहिले आहे की कधीकधी असे लोक फारच उद्धटपणे बायबल मधील सत्य व आश्वासनावर विश्वास ठेवण्यास नकार देतात जरी ते स्पष्टपणे त्यांच्यासमोर आहे.
आता त्याबाबतीत समस्याही आहे की, जर आपण विश्वास ठेवण्यास नकार देतो की परमेश्वर आपल्यासाठी काहीतरी करू शकतो किंवा करेल (जरी त्यास समर्थन करण्यास पवित्र शास्त्रातून सत्य हे उघड असते.), त्या क्षेत्रामध्ये आपण देवापासून काहीतरी मिळण्याच्या शक्यते पासून आपल्या स्वतःला दूर नेत आहोत. आपल्या विश्वासाची कमतरता देवाला आपल्या वतीने कार्य करू देत नाही.
आपण जीवनात मार्गक्रमण करीत असताना, हे आपल्यासाठी सामान्य आहे की त्या विश्वासाला धरून राहावे जे देवाच्या वचनाशी सुसंगत नाही. त्यामुळे, या चुकीच्या समजुतींना देवाच्या वचनातील सत्याने बदलण्यासाठी सातत्याने कार्य करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. हे पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणजे नियमितपणे त्याच्या वचनांची मोठ्याने कबुली देणे आणि ती आपल्या स्वतःचा असल्याचा दावा करणे.
तथापि, जेव्हा या आश्वासनांवर हक्क दाखवितो, तेव्हा हे महत्वाचे आहे की त्यास आत्मसात करावे जसे काही ते अगोदरच आपले झाले आहे. कदाचित किंवा इतर कोणत्यातरी दिवशी असे शब्द बोलण्याद्वारे जर आपण देवाच्या आश्वासनांबद्दल बोलले, तर एक मोठी समस्या आहे कारण विश्वास हा केवळ वर्तमानकाळातच कार्य करतो.
"कारण त्याच्या दैवी शक्तीने आपल्याला सर्व काही दिले आहे" या वाक्याकडे बारकाईने लक्ष द्या. उतारा हे सुचवीत नाही की तो कदाचित आपल्याला देईल; तर ते आत्मविश्वासाने घोषित करते की त्याने अगोदरच दिले आहे. आपल्याला ज्या सर्वांची गरज आहे ते देवाने अगोदरच दिले आहे की आपण विपुल आशीर्वादाचे आणि आध्यात्मिक वाढीचे जीवन जगावे.
परंतु...आपल्याला याची खात्री केली पाहिजे की आपण त्या आश्वासनावर हक्क दाखवितो जसे काही ते आपलेच आहे.
जर आपण देवाच्या आश्वासना विषयी कदाचित, किंवा कधी तरी असे शब्द वापरून बोलतो, तरती एक मोठी समस्या आहे कारण विश्वास हा केवळ वर्तमान काळात कार्य करतो.
उदाहरणार्थ, असे म्हणण्याऐवजी, "मी बरा होईन," तुझा धन्यवाद हो, पित्या,तूं आत्तामाझ्या शरीरात कार्य करीत आहे, बरे करीत आहे, पुनर्स्थापित करीत आहे व त्यास शक्तिशाली करीत आहे. येशूच्या नांवात, मी घोषणा करतो, की मी स्वस्थ आहे, स्वास्थ्यपूर्ण आहे!"
असे म्हणण्याऐवजी, "मी माझ्या व्यवसायात, माझ्या कामात चांगले करीन अशी आशा करीत आहे, असे म्हणा, पित्या, मी तुझा धन्यवाद करतो की माझ्या जीवनावर तुझा आशीर्वाद मला श्रीमंत करतो आणि त्याबरोबर दु:ख देत नाही. मी आशीर्वाद आहे. येशूच्या नांवात."
तुमच्या जीवनावर देवाच्या आश्वासनास घोषणा करण्यास सुरु करा. तुमचे अंत:करण त्या आश्वासनाशी जुळेल आणि त्यास अस्तित्वात आणेल.
येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी अविश्वसनीय वारसा जतन करून ठेवला आहे. आपल्याला प्रत्येक आश्वासनाकडे वाव आहे.
"कारण त्याच्या दैवी शक्तीने आपल्याला सर्व काही दिले आहे" या वाक्याकडे बारकाईने लक्ष द्या. उतारा हे सुचवीत नाही की तो कदाचित आपल्याला देईल; तर ते आत्मविश्वासाने घोषित करते की त्याने अगोदरच दिले आहे. आपल्याला ज्या सर्वांची गरज आहे ते देवाने अगोदरच दिले आहे की आपण विपुल आशीर्वादाचे आणि आध्यात्मिक वाढीचे जीवन जगावे.
प्रार्थना
१. २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळवार/गुरुवार/शनिवार) आम्ही उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
परमेश्वर पित्या,येशूच्या नांवात,असे होवो कीख्रिस्ताच्याप्रीति मध्ये मी सदैव मुळावलेला व स्थिर राहो.असे होवो की मी देवाच्या सर्व परिपूर्णतेमध्ये भरलेला राहो.आमेन.
कुटुंबाचे तारण
धन्यवादित पवित्र आत्म्या, मलाविशेषकरून दाखव की माझ्या कुटुंबाच्या प्रत्येकसदस्यांना वचन कसे प्रचार करू. मला समर्थ कर प्रभो. योग्य वेळी, तुझ्याविषयी सांगण्यासाठी संधी प्रगट कर.येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे तेप्रभु द्वारे स्मरण करण्यात येईल. म्हणून, माझ्या जीवनातील कोणतीही अशक्य परिस्थिती प्रभु द्वारे बदलली जाईल. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रार्थना करतो की, हजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम च्या प्रत्यक्ष प्रसारणकडे यावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. असे होवो की त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे.त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नाव उंचाविले जावो व त्यास गौरव मिळो.
देश
पित्या,येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची हृदये तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व येशूला त्यांचा प्रभु व तारणारा असे स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पित्याची मुलगी-अखसा● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
● भटकण्याचे सोडा
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे
● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 2
● दिवस ३९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या