म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहा, तर ख्रिस्त 'देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहे आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. (कलस्सै ३: १-३)
ह्या पृथ्वीवरील प्रत्येक नवीन जीवालागुणवैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, एक डुक्कर, हे नेहमीच डुक्कर असे राहणार आहे. कोणत्याही प्रकारचे चांगले वर्तन किंवा प्रशिक्षण डुक्कराला एका नवीन जीवा मध्ये बदलू शकत नाही. पवित्र शास्त्र आपल्याला इशारा देते,
"....तुमचे मोती डुकरापुढे टाकू नका, नाहीतर ते त्यास त्यांच्या पायाखाली तुडवितील. (मत्तय ७: ६).
तुम्ही डुकराला धुवा आणि त्याच्या डोक्यावर लहान सारंग लावा, परंतु जेव्हा तुम्ही त्यास जाऊ देता तेव्हा ते सरळ चीखलाकडे जाईल. पुन्हा पवित्र शास्त्र हे लक्षात आणून देते,
खऱ्या म्हणी प्रमाणे, "अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीण" (२ पेत्र २: २२).
आपण मानवाने सुद्धा सामान्य स्वभाव प्राप्त केला आहे जेव्हा आपला जन्म झाला. कारण आपण पतितआणि पापमय जगात जगतो, आपण सर्व जण पतित स्वभावाने सुरुवात करतो.
स्तोत्रसंहिता ५१: ५ स्पष्ट करते की, आपण सर्व जण ह्या जगात पापी असे येतो: "पाहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पटकी आहे."
इफिस २: २ म्हणतेकी, सर्व लोक जे ख्रिस्ता मध्ये नाहीत, ते"अवज्ञेचे पुत्र" आहेत.
परमेश्वराने मानवी वंश पापमय असा निर्माण केला नाही, परंतु नीतिमान. परंतु आपण पापात पडलो आणि आदामाच्या पापामुळे पापी झालो.
जेव्हा तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा निर्णय करता, तुम्ही चमत्कारिकरित्या एक नवीन स्वभाव प्राप्त करता. अशक्य हे शक्य होते.
त्यामुळे जर कोणी व्यक्ति[येशू मध्ये आलेला] ख्रिस्ता[मशीहा]मध्ये आहे तर तो नवी उत्पत्ति [संपूर्णपणे एक नवीन सृष्टी]आहे. पाहा, जुने[अगोदरची नैतिक आणि आध्यात्मिक स्थिती]ते होऊन गेले, पाहा, आता सर्व काही नवीनझाले आहे. (२ करिंथ ५: १७ ऐम्पलीफाईड बायबल)
तुम्ही आता पतित-मानवी कुटुंबाचे नाही; आता तुम्ही देवाच्या कुटुंबाचे आहात. ही ती घटना आहे जी जीव बदलण्याशी तुलनात्मक आहे.
कारणकी आपल्याला आता एक नवीन स्वभाव आहे, आपल्याकडून अपेक्षा केली जाते आपण वेगळे असे वागावे. आपला आत्मिक मनुष्य हा नवीन केला गेला आहे परंतु आपले मन अजूनही नवीन केले जावयाचे आहे. येथे प्रक्रियेचा समावेश आहे आणि हे आपोआप नाही.
कलस्सै ३: १-३ मध्ये, पौल आपल्याला उपदेश देतो की ही प्रक्रिया कशी सुरु करावी: स्वर्गातील गोष्टींविषयी विचार करा.
हे जाणून की तुम्ही सार्वकालिकता स्वर्गात घालविणार आहात ते मग पृथ्वीवरील तुमचे लक्ष बदलते. हा विचार आतापासून तुमच्याबरोबर घ्या. तुम्ही जशी योजना करता कदाचित ते बदलेल.
अंगीकार
मी ख्रिस्ता मध्ये नवीन जीवनासाठी उठविले गेलो आहे. मी माझे लक्ष [दोन्हीही शारीरिक आणि आध्यात्मिक]स्वर्गातील प्रत्यक्षतेवर लावेन, जेथे ख्रिस्त देवाच्या उजवीकडे सन्मानात बसला आहे.
मी दररोज निवड करेन की स्वर्गातील गोष्टींबद्दल विचार करावा, पृथ्वीवरील गोष्टी नाही. कारण मी ह्या जीवनास मेलो आहे, आणि माझे खरे जीवन हे देवा मध्ये ख्रिस्ता सह लपलेले आहे.
मी दररोज निवड करेन की स्वर्गातील गोष्टींबद्दल विचार करावा, पृथ्वीवरील गोष्टी नाही. कारण मी ह्या जीवनास मेलो आहे, आणि माझे खरे जीवन हे देवा मध्ये ख्रिस्ता सह लपलेले आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● जीवन हे रक्तात आहे● देवाचे 7 आत्मे
● तुमचे तारण झालेच्या दिवसाचा उत्सव करा
● तुमच्या मनाला शिस्त लावा
● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● विश्वासात स्थिर उभे राहावे
● दैवीव्यवस्था-२
टिप्पण्या