आणि तो फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ व वारंवार छाटतो. (योहान १५: २ ऐम्पलीफाईड बायबल)
वाक्य लक्षात घ्या, "तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतोव वारंवार छाटतो."
देवाचे आपल्याबरोबर कार्य करणे हे केवळ एकच वेळेची घटना नाही परंतु निरंतरची प्रक्रिया आहे. हे आपल्याला सांगते की येथे वाढण्याचा समय आणि छाटण्याचा समय हा आपल्या जीवनात असेल. येथे अत्यंत उंच भरारी मारण्याचा समय असेन आणि येथे गाळात पडण्याचा समय सुद्धा असेन.
माझ्या आंटी (वडिलांची बहिण) कडेतिच्या घराच्या मागच्या आवारात एक सुंदर गुलाबाचे रोपटे होते. माझा भाऊ आणि मी आमची उन्हाळ्याची सुट्टी तिच्या घरी घालवित असे. तेथे फार मजा येत असे. एका दुपारी, मी तिला त्या गुलाबाच्या रोपट्याचे काही फाटे कापताना पाहिले. मी वैयक्तिक विचार केला की हा मर्डर आहे. मी बालिशपणे तिला विचारले, "गुलाबाच्या रोपट्याला जे तिला इतके आवडते त्यास ती असे का करीत आहे?
तिने मला हे म्हणत उत्तर दिले की तिने असे केले म्हणजे गुलाबाचे रोपटे अजून अधिक क्षमतेने वाढावे. अर्थातच, त्याक्षणी, मी ते समजू शकण्यात अपयशी ठरलो परंतु काही आठवड्यानंतर, तिने जे म्हटले होते त्यामधील सत्य मी पाहिले.
गुलाब अजूनही अधिक चमकदार आणि सुंदर दिसत होते.
छाटणेहा सुखावह अनुभव नाही. तोअतिशय वेदनामय आहे. हे म्हटल्यानंतर, आपण हे जाणले पाहिजे की परमेश्वर आपल्याला वेदनेतून जाऊ देत नाही कारण तो आपल्यावर रागात आहे. तो आपल्याला वेदनेतून जाऊ देतो म्हणजे आपण अधिक आणि अधिक, भरदार आणि उत्तम फळ निर्माण करावे. (योहान १५: २ ऐम्पलीफाईड बायबल)
फळ-आणण्या मधील पायऱ्यांकडे लक्ष दया(योहान १५: २ ऐम्पलीफाईड बायबल वाचा)
फळ
अधिक फळ (संख्या)
भरपूर आणि अधिक उत्तम फळ (संख्या आणि गुणवत्ता)
अगदी नुकतेच, मी उपास आणि प्रार्थने मध्ये वेळ घालवित होतो आणि पवित्र आत्म्याने मला प्रगट केले की चर्च ह्या समयात छाटण्याच्या प्रक्रियेमधून जात आहे.
अनेकांनी उपास आणि प्रार्थना केली आहे आणि असे दिसते की परमेश्वराकडून काहीहीउत्तर नाही. हे ते आहेत ज्यांनीखरेच परमेश्वरामध्ये आशा ठेवली होती की परमेश्वराने काय करावे.
आणि पुन्हा माघारी येण्याऐवजी, अनेकांना दृश्य नुकसान आणि फार त्रास झाला आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वर तुम्हाला छाटण्याच्या प्रक्रीयेमधून नेत आहे जे नैसर्गिकरीत्या नेहमी अपयश असे दिसते.
तुम्ही तुमच्या भोवतालच्या लोकांना पाहा, जे कधीही प्रार्थना करीत नाहीत, उपास करीत नाहीत, चर्च ला कधीही जात नाहीत किंवा देवाच्या कार्यासाठी दान देत नाहीत; ते सर्व सुखासुखी राहतात. ते तुमची चेष्टा सुद्धा करतात. तुम्हाला हे ठाऊक आहे की परमेश्वर कधीही मृत लाकडाचा विचार करीत नाही. तो केवळ उत्पादन करणाऱ्या फाट्याचा विचार करतो.
जरतोतुम्हाला हाताळीत आहे, तुम्हाला छाटत आहे, तुम्हाला आकारात आणत आहे, हे ओळखा की तुम्ही तो फाटा आहात जे फळ देत आहे.
लवकरच परमेश्वर चर्च साठी एक नवीन काळ सुरु करेल. आणि त्यामध्ये तुम्ही आणि मी आहोत.येशूच्या नांवात ते प्राप्त करा. मी पवित्र आत्म्याला ऐकले. हे घडणार आहे. येथे काही महिने राहिले आहेत. परमेश्वराला धरून राहा. धैर्य सोडू नका. तुम्ही ऐकत आहात काय?
अंगीकार
येशूच्या नांवात, मी कबूल करतो, माझ्या मार्गामध्ये, येथे जीवन आहे, विपुल जीवन आहे. मी त्याच्या हंगामा मध्ये फळ आणतो.
येशूच्या नांवात,उशीर, असफलता आणि निश्चलतेच्या प्रत्येक मुळाला मी शाप देतो. माझे जीवन हे प्रगतीशील आहे आणि मी विश्वासाकडून विश्वासाकडे आणि गौरवाकडून गौरवाकडे जात आहे.
येशूच्या नांवात, मी आणि माझे प्रियजन नवीन भरारी मारतील, आणि देवाच्या गौरवाकरिता नवीन क्षेत्रे काबीज करू. आमेन.
येशूच्या नांवात,उशीर, असफलता आणि निश्चलतेच्या प्रत्येक मुळाला मी शाप देतो. माझे जीवन हे प्रगतीशील आहे आणि मी विश्वासाकडून विश्वासाकडे आणि गौरवाकडून गौरवाकडे जात आहे.
येशूच्या नांवात, मी आणि माझे प्रियजन नवीन भरारी मारतील, आणि देवाच्या गौरवाकरिता नवीन क्षेत्रे काबीज करू. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पित्याची मुलगी-अखसा● परमेश्वराला महिमा कसा दयावा
● एका उद्देशाने जन्म घेणे
● ख्रिस्ता समान होणे
● पवित्र आत्म्या विरुद्ध निंदा म्हणजे काय आहे?
● स्वर्गाचे द्वार उघडा व नरकाचे द्वार जोरानेबंद करा
● आमचे नको
टिप्पण्या