तो जो ज्ञानी बरोबर चालतो तो ज्ञानी होतो;
परंतु मूर्खाचा सोबती नष्ट केला जाईल. (नीतिसूत्रे १३:२० एनकेजेवी)
ज्ञानी बरोबर चाला व ज्ञानी व्हा,
मूर्खाचे सोबती व्हा, आणि संकटात पडा. (नीतिसूत्रे १३:२० एनएलटी)
पवित्र शास्त्र स्पष्ट करते की ज्यांच्या संगतीमध्ये आपण राहतो ते आपले चरित्र व कृत्यांवर महत्वपूर्ण छाप पाडतात. आपण चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी, त्यांच्यासारखे होतो ज्यांच्याबरोबर आपण वेळ घालवितो. ख्रिस्तासमान चारित्र्य जोपासण्यासाठी, आपण जाणीवपूर्वक ज्ञानी लोकांसोबत चालणे निवडले पाहिजे आणि मूर्ख प्रभावांपासून स्वतःला दूर केले पाहिजे.
मुद्दा जो मी येथे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तो, आपण त्यांच्यासमान होतो ज्यांच्याबरोबर आपण राहतो.
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. (प्रेषित ४:१३)
योहान व पेत्राला यहूदी परिषदेने विचारले की त्यांनी कोणत्या सामर्थ्याने त्या लंगड्या भिकारीला बरे केले. पेत्र, जरी एक मासे धरणारा होता, त्याने वधस्तंभ, शुभवर्तमान विषयी संदेश दिला, आणि धैर्याने व आत्मविश्वासाने उत्तर दिले.
संदर्भाचा विचार करा. पेत्र व योहानाने नुकतेच मंदिराच्या ठिकाणी एका लंगड्या भिकारीला बरे केले होते (प्रेषित ३:१-१०). जेव्हा लोक जमा झाले, पेत्र जरी एक मासे धरणारा होता त्याने शुभवर्तमान प्रचार केले (प्रेषित ३:११-२६). त्यांना अटक करून तुरुंगात टाकल्यावर, पेत्र धार्मिक पुढाऱ्यांना संभाषण करीत आहे (प्रेषित ४:१-१२). त्याने काय म्हटले याबाबत विचार करताना, ते एक मुख्य गोष्ट लक्षात घेण्यास साहाय्य करते:
शिष्यांचे धैर्य व आत्मविश्वासाचे स्त्रोत हे काही त्यांच्या स्वतः मध्ये नव्हते परंतु ती वेळ जी त्यांनी येशू बरोबर घालविली होती त्याचा सरळ परिणाम होता. त्याच्याबरोबर राहून आणि त्याच्याबरोबर संगती करून, ते त्याच्यासारखे झाले होते.
तीन वर्षे, ते येशूच्या चरणाजवळ बसले होते, आणि नगरानगरातून त्याच्या मागे चालले होते आणि त्याची शिकवण आत्मसात केली होती. या वेळेदरम्यान, त्याने त्यांना प्रशिक्षण दिले आणि ते हळूहळू त्यांचे विचार, वागणूक आणि कृत्यांमध्ये त्याच्यासारखे होत गेले. ते ज्ञानी लोकांसोबत चालले आणि ते स्वतः ज्ञानी झाले.
जर आपल्याला येशूसारखे होण्याची इच्छा असेल, तर आपल्याला प्रथम येशूसोबत असण्याची गरज आहे. याचा अर्थ प्रार्थनेमध्ये वेळ घालविणे, वचन वाचणे आणि इतर विश्वासणाऱ्यांबरोबर संगतीमध्ये राहणे आहे. त्याचे मार्गदर्शन, शहाणपण आणि सामर्थ्य मिळविण्यासाठी आपण जाणूनबुजून ख्रिस्तासोबतचे आपले नातेसंबंध जोपासले पाहिजे. आपण आपोआप ख्रिस्तासमान होत नाही. आपले परिवर्तन हे आयुष्यभराचा प्रवास आहे, पावित्रीकरणाची प्रक्रिया ज्याद्वारे पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो की आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेशी एकरूप करावे.
त्यांचे शत्रू सुद्धा हे पाहू शकत होते की येशू ख्रिस्ताने ह्या मनुष्यांवर मोठा प्रभाव केला होता. अशा प्रकारचे वाक्य तुमच्या बाबतीत म्हटले जाऊ शकते काय? तुमच्या आणि माझ्या बाबतीत असे म्हटले जाऊ शकते काय हे येशू सोबत होते?
प्रार्थना
१. २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळवार/गुरुवार/शनिवार) आम्ही उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
प्रत्येक ओझे हे माझ्या खांद्यावरून काढून टाकले जाईल, आणि माझ्या मानेवरील प्रत्येक जूं, आणि अभिषेकमुळे जूं हे नष्ट केले जाईल. मी वचनाच्या समज मध्ये वाढेन. (यशया १०:२७)
कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.
देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.

Join our WhatsApp Channel
Most Read
● गौरव आणि सामर्थ्याची भाषा-जीभ● ते व्यवस्थित करा
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● रागाची समस्या
● दार बंद करा
● २१ दिवस उपवासः दिवस १५
● पित्याची मुलगी-अखसा
टिप्पण्या