परमेश्वराने आपल्यावर आपल्या अतुलनीय कृपेचा वारंवार वर्षाव केला आहे. या दैवी उदारतेच्या प्रतिसादात, आपल्याला आपल्या सभोवतालच्या लोकांवर कृपा दाखवण्यासाठी बोलावले आहे. कृपा करणे म्हणजे दयाळूपणा दाखवणे, जरी जेव्हा त्यास पात्र नसतील. कृपा जी आपल्याला विनामुल्य मिळाली आहे ती आपण इतरांवर कशी करू शकतो ते येथे आहे:
१. कृपेचे शब्द
उन्नती करण्याचे किंवा फाडून टाकण्याचे आपल्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. प्रेषित पौल आपल्याला प्रोत्साहन देतो: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे” (कलस्सै. ४:६). सकारात्मक बदल आणण्याविषयी तो जिभेचे सामर्थ्य ओळखतो आणि विश्वासणाऱ्यांना आग्रह करतो की येशूची कृपा प्रतिबिंबित करण्यासाठी त्यांनी त्यांचे शब्द वापरावे.
माझा ठाम विश्वास आहे की आपल्या प्रार्थना अधिक सामर्थ्याने आणि त्याच्या उपस्थितीने तेव्हाच प्रतिध्वनित होतील, जेव्हा आपली दैनंदिन भाषा इतरांना प्रोत्साहन आणि कृपा देणाऱ्या शब्दांनी दर्शविली जाते. (इफिस. ४:२९ चा संदर्भ घ्या)
२. निराशेमध्ये क्षमा करणे
जेव्हा कोणी आपल्या गेलेल्या वाईट दिवसाचा राग तुमच्यावर काढतो, तेव्हा त्याचा बदला घेण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. तथापि, दयाळूपणात प्रतिसाद देण्याऐवजी, आत्म्यात शांत व्हा आणि सोडून द्या. असे केल्याने, तुम्ही जी कृपा विनामुल्य प्राप्त केली आहे ती त्यांच्यावर करत आहात. ते आव्हानात्मक होऊ शकते, परंतु दयेची ही कृती तुम्हांला उच्च स्तरावर नेऊ शकते.
“विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” (नीतिसूत्रे १९:११)
३. उपस्थिती आणि साहाय्य
आव्हानात्मक वेळेदरम्यान, असे जे आपण सध्या अनुभवत आहोत, एक साधा फोनकॉल किंवा संदेशाचा अर्थ कोणालातरी सर्वकाही ठरू शकते. हे दाखवते की त्यांची आठवण केली आहे आणि त्यांजवर प्रीती करत आहे. एखाद्याचा वाढदिवस किंवा वर्धापन दिवस त्यांच्याबरोबर साजरा करा. त्यांच्या गरजांबद्दल चौकशी करा आणि जर शक्य असेल, तर तुम्हांला होईल तितक्या छोट्या मार्गाने मदत करा. एकमेकांचा आनंद आणि शोकामध्ये सहभागी व्हा हे बायबल आपल्याला शिकवते.
“आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.” (रोम. १२:१५)
असे कृत्य हे केवळ देवाला प्रसन्न करणारेच नाही तर जगाला दयाळूपणाच्या जागेमध्ये परिवर्तीत करण्याचे सामर्थ्य देखील त्यात आहे. बऱ्याचदा, हे सर्वात लहान हावभाव असतात ज्यांना सर्वात जास्त महत्व असते.

प्रार्थना
पित्या, मी तुझ्या अद्भुत कृपे बद्दल धन्यवाद देतो. मी त्यास पात्र नाही, तरीसुद्धा तूं इतक्या त्वरेने माझ्यावर ओतले आहे. परमेश्वरा, मला समर्थ कर की ही कृपा इतरांवर करावी. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे हृद्य तपासा● मार्गहीन प्रवास
● तुमच्या प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारिक पायऱ्या
● याची प्रत्यक्ष पर्वा आहे काय?
● दिवस ०९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● अगापेप्रीति मध्ये कसे वाढावे
● आई-वडिलांचा मान राखणे (दिवस ८)
टिप्पण्या