डेली मन्ना
लहान गोष्टी मोठ्या उद्देशांना जन्म देतात
Saturday, 3rd of February 2024
26
20
1202
Categories :
उद्देश
DM : 03.02.24
Title: Little Things to Birth Great Purposes
शीर्षक: लहान गोष्टी मोठ्या उद्देशांना जन्म देतात
वर्गवारी: उद्देश
म्हणून (संदेष्टा) अलीशाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू?” मला सांग, ‘तुझ्या घरात काय आहे?” तीन उत्तर दिले, “तेलाच्या एका घड्यावाचून आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही.”
एक माणूस जो अलीशाच्या संघाचा भाग होता त्याची विधवा पत्नी तिला संकटातून वाचवण्याची त्याला विनंती करते. ती अत्यंत कर्जात बुडालेली आहे, तिच्या पतीला गमावले आहे, आणि आता कर्जदारास तिच्या मुलाला गुलाम म्हणून विकण्याच्या उंबरठ्यावर आहे.
संदेष्टा अलीशा विचारपूस करतो, “तुझ्या घरात काय आहे?”
तिने प्रतिसाद दिला, “एक घडा तेलावाचून आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही.”ते असे म्हणण्यासारखे आहे, “माझ्याकडे काहीएक नाही, तरीही माझ्याकडे काहीतरी आहे.” मला आशा आहे हे तुमच्या लक्षात आले असेन. विधवेच्या प्रतिसादाने मला आतापर्यंत नेहमीच आश्चर्यात टाकलेले आहे. फक्त नुकतेच त्या मागील महत्व मी समजू लागलो आहे.
तुम्ही पाहा, “जेव्हा गरज ही पूर्ततेपेक्षा मोठी आहे, तेव्हा तुम्ही त्याला काहीही नाही असे संबोधता. जेव्हा तुमच्या गरजा तुमच्या हातात असलेल्या पैसा किंवा संसाधनांपेक्षा जास्त असतात, तेव्हा तुम्ही नेहमीच असे म्हणाल, ‘माझ्याजवळ काहीही नाही.’ वास्तविकता ही आहे, की तुमच्याजवळ नेहमीच काहीतरी असते.”
पुष्कळ लोक मला हे लिहित म्हणतात, “पास्टर मायकल, मला विश्वास नाही.” सत्य हे आहे की देवाने या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला विश्वासाचे प्रमाण दिले आहे. तुमच्या विश्वासाचे प्रमाण हे लहान किंवा मोठे असू शकते, परंतु, तरीही, तुमच्याजवळ काहीतरी असते. (रोम. १२:३ चा संदर्भ पाहा)
देव नेहमीच तुमच्या चमत्काराला निर्माण करण्यासाठी ज्याला तुम्ही काहीही नाही असे समजता त्याचा वापर करील. ते कदाचित उपासनेमध्ये लहानसे दान जे तुम्ही दिले असेल. करुणा सदन सेवाकार्यात तुमची भागीदारी ते असू शकते. ते कदाचित तुमची कुशलता, तुमच्या प्रार्थनेची वेळ, तुमचा उपास इत्यादी असू शकते.
महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी परमेश्वर नेहमीच त्या गोष्टींचा वापर करील ज्याला लोक कमी महत्वाचे समजतात. संपूर्ण पवित्र शास्त्रात हे तत्व उघड आहे.
प्रभूचा एक शिष्य, अंद्रीया, शिमोन पेत्राचा भाऊ, त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?” (योहान. ६:८-९). प्रभू येशूने मग त्याच पाच भाकरी आणि दोन मासळ्यांचा वापरू करून पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना भोजन पुरविले.
देवाने जखऱ्याला म्हटले, “लहान गोष्टींना तुच्छ मानू नको” (जखऱ्या ४:१०). इमारतीसाठी बजेट खूपच कमी होते, त्याहीपेक्षा मनोबल कमी होते, आणि असे वाटत होते की काम हे पूर्ण केले जाणार नाही. परंतु भविष्यसूचक शब्द जो त्यांच्याकडे आला, त्याने त्यांना प्रोत्साहन दिले, हे म्हणत, “देवासोबत काहीही लहान नाही.”
तुम्हांला कदाचित तुमच्या दृष्टीत खूपच लहान वाटत असेल आणि हे चांगले आहे कारण देव गर्विष्ठाना प्रतिकार करतो, पण नम्र जणांवर कृपा करतो. तथापि, देवासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही असा विश्वास ठेवण्याद्वारे तुमच्या नम्रतेस पापामध्ये बदलू देऊ नका. देव तुमच्या स्वतःला देवाला अर्पण करण्यासाठी तुमचा वापर करील, मग याची पर्वा नाही की तुम्ही किती गरीब आणि दुर्बळ झालेले आहात.
प्रार्थना
मला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही कारण मी सतत देवाचा धावा करतो. (स्तोत्र. ३४:१०)
माझ्या सर्व गरजांची पूर्तता झाली आहे; येथे विपुल आणि मोठ्या प्रमाणात आहे कारण मी प्रभूचे भय धरतो आणि त्याचा आदर करतो. जे सर्वकाही माझ्याजवळ आहे ते देवाचे आहे. मी सर्वकाही समर्पित करतो. (स्तोत्र. ३४:९)
त्याच्या नावाखातर मला धार्मिकतेच्या मार्गात चालवले जात आहे, आणि प्रत्येक निर्णयामध्ये मार्गदर्शन आणि ज्ञान मिळाले आहे. माझी पाऊले प्रभूद्वारे आदेशित आहेत आणि मी आत्मविश्वासाने चालतो, हे जाणून की तो माझ्या मार्गास दिशा देतो. (स्तोत्र. २३:३, स्तोत्र. ३७:२३)
Join our WhatsApp Channel
Most Read
● कृपेवर कृपा● परमेश्वराचा धावा करा
● विसरलेली आज्ञा
● बदलण्यासाठी अडथळा
● एक आदर्श व्हा
● तुलना करण्याचा सापळा
● याबेस ची प्रार्थना
टिप्पण्या