प्रार्थनाहीन असण्याची सर्वात मोठी शोकांतिका ही देवदूतांना उपयोगात आणीत नाहीत. माझे असे म्हणण्याचा काय अर्थ आहे? मला ते स्पष्ट करू दया.
जेव्हा बलाढ्य अरामी सेनेने अलीशा आणि त्याच्या सेवकाला घेरले की त्यांना धरावे, संदेष्ट्याने दैवी प्रकटीकरण म्हटले, "भिऊ नको; त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत." (२ राजे ६: १६)
जेव्हा संदेष्टा ने त्याचा सेवक याचे आध्यात्मिक नेत्र उघडावे अशी प्रार्थना केली, सेवकाने पाहिले की संपूर्ण पर्वत हा अग्नीचे घोडे व रथांनी यांनी व्यापून गेला आहे (२ राजे ६: १७)
देवदूत हे प्रार्थनेच्या ठिकाणी किंवा प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षिले जातात. देवदूतांना कार्यरत केले गेले होते कारण अलीशा जो देवाच्या मनुष्याने प्रार्थना केली होती.
यासाठी अधिक कल्पना करण्याची गरज लागत नाही की काय घडले असते जर अलीशा जो देवाचा मनुष्य ह्याने प्रार्थना केली नसती. फारच उघड आहे, अरामी सेने ने त्यांना पकडले असते आणि कदाचित शमशोन प्रमाणे त्यांचा छळ केला असता.
प्रेषित २७ मध्ये, आपण प्रेषित पौलाला पाहतो, जो समुद्राच्या मध्य आहे, जोभयंकर वादळात सापडला आहे ज्याने संपूर्ण जहाज ला फोडण्याची भीती निर्माण केली आहे. त्याने प्रार्थना केली आणि त्याच्या प्रार्थनेच्या प्रत्युत्तरात परमेश्वराने दुताला पाठविले की त्यास साहाय्य करावे.
प्रेषित २७: २३ मध्ये त्याने ते तांडेल ला सांगितले
कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करितो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला
परमेश्वराच्या दूताने पौलाला आणि तांडेल ला त्या वादळातून सुखरूप बाहेर आणिले. त्यांची जीवने चमत्कारिकपणे वाचविली गेली. त्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता, परमेश्वर त्याच्या दुताला पाठवेल आणि तुम्हाला प्रत्येक वादळातून बाहेर काढील.
प्रेषित १२ मध्ये आपण पाहतो की राजा हेरोद ने चर्च चा छळ सुरु केला. त्याने याकोब, जो योहानाचा भाऊ त्याचा खून केला.
आता जेव्हा हेरोद ने पाहिले की ह्यामुळे यहूदी लोकांमध्ये त्याची प्रसिद्धी अधिक वाढली, त्याने पेत्रालाही धरले आणि त्यास सुद्धा जिवंत मारण्याची योजना केली. सोळा सैनिकांना नियुक्त केले कि पेत्राला कडक पहाऱ्यात ठेवावे जोपर्यंत त्यास सार्वजनिक न्यायासमोर आणीत नाही, चर्च त्यावेळी आग्रहाने मध्यस्थी करीत होते, देवाला विनंती करीत होते की पेत्राची सुटका करावी.
ह्या प्रार्थनेचा परिणाम हा की त्यास स्वर्गाला कार्यरत केले. "अचानक तेथे पेत्राच्या तुरुंगात प्रखर प्रकाश पडला आणि देवाचा दूत पेत्राच्या समोर उभा होता. दूताने त्यास कुशीवर थाप मारली की त्यास उठवावे आणि म्हटले, "लवकर उठ!" आणि त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. (प्रेषित १२:७).
चर्चच्या आग्रहाच्या मध्यस्थीच्या प्रार्थने ने पेत्राच्या वतीने देवाच्या दुताला कार्य करण्यात पुढे केले. तो चमत्कारिकपणे मुक्त करण्यात आला.
केवळ याची कल्पना करा जर चर्च ने प्रार्थना केली नसती? पेत्राला खात्रीने जिवंत मारून टाकले गेले असते. दुतांचे कार्य हे आग्रहाच्या प्रार्थनेचे परिणाम आहे. प्रार्थनाहीन असणे दूतांना केवळ मूक प्रेक्षक असे करते.
प्रिय देवाच्या लोकांनो, सामाजिक माध्यमावर वादविवाद आणि चर्चा करण्याची ही वेळ नाही. प्रार्थना ही वेळेची गरज आहे. एक प्रार्थनाहीन व्यक्ति हा सैतानाच्या दयेच्या अधीन असेन. प्रार्थनाहीन कुटुंब हे परिस्थितीच्या अधीन असेन. एक प्रार्थनाहीन चर्च हे पराभूत चर्च असेन.
प्रार्थनेत तयार राहा
कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरितील. (स्तोत्रसंहिता ९१: ११-१२)
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रत्येक सैतानीदरवाजास बंद करतो जे उघडे केले गेले होते की माझ्या प्रार्थनामय जीवनास अडथळा करावे. प्रत्येक अडथळा जो मला प्रार्थना करण्यापासून अडथळा करीत आहे, मी तुला येशूच्या नांवात बांधीत आहे. प्रत्येकप्रतिबंध आणि आडकाठी जे माझ्या प्रार्थनेला अडथळा करीत आहे ते कदाचित उपटून टाकले जावो येशूच्या नांवात. ह्याक्षणापासून पुढे, मी माझे प्रार्थनेचे जीवन पवित्र आत्म्याच्या अधीन आणि समर्पित करतो येशूच्या नांवात. पित्या, येशूच्या नांवात, माझ्या जीवनावर "प्रार्थना अभिषेक" मोकळा कर. काही वेळ अन्य भाषे मध्ये प्रार्थना करण्यात घालवा.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, तुझे वचन म्हणते की, "कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते" (२ करिंथ ७:१०). फक्त तूच आमचे डोळे या सत्यासाठी उघडू शकतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना ईश्वरप्रेरित दु:खाच्या भावनेसह तुझ्या आत्म्याचा स्पर्श कर की त्यांनी पश्चाताप करावा, तुला शरण यावे आणि त्यांचे तारण व्हावे. येशूच्या नावाने.
आर्थिक प्रगती
पित्या, येशूच्या नावाने मला लाभहीन श्रम आणि भ्रमित कार्यांपासून मुक्त कर.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो कुटुंबांपर्यंत पोहचावे. तुला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखण्यासाठी त्यांना आकर्षित कर. जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन, उपासना आणि प्रार्थनेमध्ये वाढीव.
राष्ट्र
पित्या, येशूच्या नावाने, आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने कार्यरत होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ज्यामुळे चर्चची सतत वाढ व विस्तार होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अग्नि हा पडला पाहिजे● जीवन हे रक्तात आहे
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो
● कृपेचे दान
● वाईट प्रवृत्ति पासून सुटका
● हन्ना च्या जीवनाकडून शिकवण
● नरक हे खरे स्थान आहे
टिप्पण्या