आज, आपण ह्या प्रश्नाकडे फारच बारकाईने पाहणार आहोत.
स्तुति देवाचीस्तुति करण्यासाठी पवित्र शास्त्रातून कारणे
करा हा आदेश आहे
असे होवो की ज्या सर्वांमध्ये श्वास आहे त्याने परमेश्वराची स्तुति करावी. (स्तोत्रसंहिता १५०: ६)
बायबल म्हणते की ज्या गोष्टीं जिवंत आहेत, त्या गोष्टी ज्या मृत नाहीत, त्यांनी देवाची स्तुति करावी. देवाचे वचन आपल्यासाठी हे एक सल्ला नाही. देवाचे वचन हा आदेश आहे. सल्ल्याकडे कानाडोळा करता येऊ शकतो. परंतु आदेशाकडे कानाडोळा करता येत नाही. जर तुम्ही आदेशाकडे कानाडोळा केला तर तेथे परिणाम हे भोगावे लागतील.
बायबल आपल्याला हे सांगत नाही की जेव्हा आपल्याला "आवडते" तेव्हा आपण देवाची स्तुति करावी. आपल्याला तसे करण्याचा आदेश दिला आहे. स्तुति ही निवड आहे, भावना नाही.
तुम्ही कधी आश्चर्य केले आहे काय की देवाच्या वचनात स्तुति करण्यास आदेश का दिला आहे?
कारण परमेश्वर समजतोकीस्तुती चा अभ्यास करणे व ते आचरणात आणण्यापेक्षा, शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक मध्ये अधिक स्वास्थ्य आणण्यास कोणतेही प्रयत्न हे परिणाम करू शकणार नाही.
परमेश्वर संपूर्ण जगभर ख्रिस्ताच्या शरीरात देवाच्या स्तुतीला पुनर्स्थापित करीत आहे.
स्तुति हे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मोकळा करते
त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. (स्तोत्रसंहिता १००: ४)
येथे प्रवेश करण्याचे दोन मार्ग आहेत: पाहिले, हे देवाच्या दरवाजा द्वारे आणि मग त्याच्या अंगणा द्वारे. स्तोत्रकर्ता आपल्याला हे सांगतो की धन्यवाद जे आपल्याला दरवाजा द्वारे आणते, परंतुस्तुति आपल्याला अंगणात आणते.
अर्थातच हे उघड आहे, की येशूचे रक्त हे आपल्याला आपल्या पापापासून क्षमा व परमेश्वराबरोबर संबंधासाठी मार्ग मोकळा करते (इब्री १०: १९). हे म्हटल्यानंतर, आपली शाश्वत स्तुति ही त्याच्या उपस्थिती मध्ये स्पष्ट आणि विना अडथळा मार्ग पुरविते.
जेव्हाकेव्हा तुम्ही प्रार्थना सुरु करता, तुमच्या विनंत्यांची यादी ताबडतोब त्याच्यासमोर आणू नका. स्वर्ग आणि पृथ्वीच्या परमेश्वराकडे येण्याचा हा चुकीचा दृष्टीकोण आहे. तुमची प्रार्थना-त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करीत सुरु करा.
प्रेषित अध्याय 3 मधीलमंदिराच्या सुंदर दरवाजा जवळील पांगळ्या मनुष्याला स्वस्थ करण्याच्या उदाहरणा द्वारे परमेश्वराच्या अंगणात येण्याचा उत्साह आणि सौभाग्य हेस्पष्ट केले गेले आहे.
पेत्रानेमंदिराच्या सुंदर दरवाजा जवळील पांगळ्या मनुष्याला स्वस्थ केल्यानंतर, पांगळा मनुष्य, त्याच्या पायावर उभा राहिला, आणि चालू लागला. मग तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला, चालत, उड्या मारीत आणि देवाची स्तुति करीत. (प्रेषित ३: ८)
त्याच्या संपूर्ण जीवनभर त्या पांगळ्या मनुष्याने हे पाहिले होते की लोक त्याच्या जवळून जात होते आणि मंदिराच्या द्वारातून अंगणात प्रवेश करीत होते. तथापि, ज्यादिवशी तो पेत्र व योहान यांना भेटला, तेव्हा सर्व काही बदलले. आता तो देवाला त्याच्या स्वस्थ होण्यासाठी धन्यवाद देऊ शकत होता आणि त्या दरवाजा द्वारे मंदिराच्या अंगणात प्रवेश करू शकत होता.
आता तो केवळ पाहत नव्हता तर त्यात भाग घेत होता. त्याचा आनंद हा आपल्यासाठी एक उदाहरण आणि प्रेरणा असले पाहिजे.
टीप: मी तुम्हाला प्रोत्साहन देतो कीनोहा ऐप वर स्तुती विभाग पाहा. ते तुम्हांला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याची स्तुति करण्यास साहाय्य करेल.
प्रार्थना
कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. (स्तोत्रसंहिता ९६: ४)
तुमचे हात वर करा आणि काही वेळ परमेश्वराची स्तुति करा.
तुमचे हात वर करा आणि काही वेळ परमेश्वराची स्तुति करा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मी प्रयत्न सोडणार नाही● देवाच्या समर्थ हाताच्या पकडीत
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?
● तुमचे तारण झालेच्या दिवसाचा उत्सव करा
● २१ दिवस उपवासः दिवस ११
● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
● २१ दिवस उपवासः दिवस ०१
टिप्पण्या