डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस ११
Wednesday, 22nd of December 2021
50
9
3337
Categories :
उपास व प्रार्थना
कुटुंब
कुटुंबे ही देवाच्या अंत:करणाजवळ आहेत. वास्तवात, सर्वात प्रथम हीच त्याची कल्पना होती. प्रारंभापासून जेव्हा परमेश्वराने मनुष्य बनविला, त्याने म्हटले, "मनुष्याने एकटे असणे हे बरे नाही, म्हणून त्याने स्त्रीला त्याच्यासाठी एक अनुरूप साहाय्यक असे निर्माण केले" (उत्पत्ति २:१८). मग त्याने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले, "फलद्रूप व्हा, बहुगुणीत व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा" (उत्पत्ति १:२८).
ते पापात पडल्यानंतर सुद्धा, परमेश्वराने कुटुंबाच्या त्याच्या योजनेस चालू ठेवले आणि तारणा विषयी भविष्यात्मक सुद्धा म्हटले जो स्त्रीच्या बीज मधून येईल. (उत्पत्ति ३:१५)
प्रभु हा इस्राएलच्या कुटुंबाचा परमेश्वर आहे (यिर्मया ३१:१). परमेश्वर कुटुंबावर प्रेम करतो व तुमच्या कुटुंबाविषयी त्यास विचार आहे.
प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाने त्याच्या निर्माण होण्यानंतर लगेचच हे जाणले पाहिजे-किंवा त्याच्याही अगोदर,-की त्यास परमेश्वरापासून विशेष पाचारण आहे की ख्रिस्ता द्वारे अब्राहामाची लेकरे म्हणून भविष्यवाणी पूर्ण करावी की "पृथ्वीवरील इतर सर्व कुटुंबाना आशीर्वादित करावे."
परमेश्वराने अब्राहामाला आश्वासन दिले "....तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील" (उत्पत्ति १२:३), एक सरळ भविष्यवाणी की अब्राहामाचे जगासाठी मुख्य योगदान हे व्यक्ति येशू ख्रिस्ता द्वारे येईल.
बायबल स्पष्टपणे शिकविते की ख्रिस्ती व्यक्ति आज येशू ख्रिस्ता मधील विश्वासा द्वारे अब्राहामाची लेकरे आहेत (रोम २:२९, ४:१३; गलती ३:२९), म्हणून ही भविष्यवाणी व जबाबदारी की जगाला "आशीर्वादित" करावे हे आज आपल्याला लागू आहे.
तुमच्या स्वतःला, तुमच्या घराला, तुमच्या संपत्तीला व तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तेलाने अभिषेक करा. जरा तुमच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांना सुद्धा तेलाने अभिषेक करा.
आज तुम्ही पाहाल देवाचा हात तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करणार आहे.
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्राची वचने
इब्री ११:७
यहोशवा २:१२-१४
स्त्रोत १०३:१७-१८
प्रेषित १६:३१
१ तीमथ्यी ५:८
४० दिवसांची बायबल वाचन योजना
1 तीमथ्याला ६ ; 2 तीमथ्याला १-४; तीताला १-२
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी एक मिनीट असे करा.)
परमेश्वराची कृपा मला व माझ्या कुटुंबाला येशूच्या नांवात अधिक आणि अधिक वाढण्यास कारण होते. (स्तोत्र ११५:१४)
मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. (यहोशवा २४:१५)
२१ दिवसांचा उपास कार्यक्रम मध्ये सहभागी होणारे व माझ्या विरोधातील प्रत्येक सैतानी योजना ह्या येशूच्या नांवात नष्ट केल्या जावोत.
हे परमेश्वरा ऊठ, व माझे व माझे कुटुंब व करुणा सदन सेवाकार्याच्या विरोधातील प्रत्येक वाईट एकता येशूच्या नांवात विखरून जावो.
मी, माझे कुटुंब किंवा करुणा सदन सेवाकार्याच्या कोणत्याही सदस्यांकरिता प्रत्येक जाळे जे लावले जात आहे ते येशूच्या नांवात नष्ट केले जावो.
पित्या, येशूच्या नांवात, असे होवो की पवित्र आत्म्याचे फळ हे माझ्या कुटुंबा मध्ये व त्यांच्याद्वारे प्रगट होवो,
पिढ्यांपासून माझ्या कुटुंबात चालू राहिलेली गरिबी, अभाव व अपुरेपणाचा प्रत्येक प्रकार हा येशूच्या नांवात काढून टाकला जावो.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईकांचे डोळे उघड की येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभु व तारणारा असे पाहावे व जाणावे. त्यांना अंधारापासून प्रकाशाकडे, व सैतानाच्या शक्तीकडून देवाकडे वळीव, की त्यांनी पापांची क्षमा प्राप्त करावी व त्यांच्यामध्ये वारसा प्राप्त करावा ते जे येशू मध्ये विश्वासाद्वारे शुद्ध झाले आहेत.
(तुमचे बोट बेंबीवर ठेवा व अशा प्रकारे प्रार्थना करा.) माझ्या जीवनातून प्रत्येक वांशिक दुष्ट प्रवाह येशूच्या नांवात मी वेगळा करीत आहे.
पापकबुली (हे अनेक वेळा मोठयाने म्हणा)
आम्ही आमच्या घरात निर्भयपणे व सुखाश्रमात निरंतर राहणार व आरामात जगणार. (यशया ३२:१८)
टिपा: जर तुम्ही अगोदरच चमत्कार व नवीन वाटचाल ही पहिली असेल, तर मग नोहा ऐप वर साक्षीचे बटन वापरून कृपा करून सांगण्यास सुरुवात करा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रीतीची भाषा● पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची मी इच्छा करू शकतो काय?
● दिवस १२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● गमाविलेले रहस्य
● सुंदर दरवाजा
● शुद्धीकरणाचे तेल
● परमेश्वरा जवळ या
टिप्पण्या