हे परमेश्वरा, तूं मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय? तूं माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार?
मी कोठवर आपल्या मनात बेत योजीत राहावे आणि दिवसभर हृदयांत दु:ख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? (स्तोत्र १३:१-२)
केवळ ह्या दोन वचनात चार वेळा दावीदाने परमेश्वराला प्रश्न विचारला, "कोठवर?"
काही वर्षापूर्वी, जेव्हा मी व माझी पत्नी सेवाकार्यासाठी रस्त्यावरून प्रवास करीत असे, ती नेहमी विचारत असे, "हा प्रवास किती लांबचा आहे?" जरी दहा मिनिटे होऊन गेली तरी ती पुन्हा विचारीत असे, "आपण केव्हा पोहोचणार? का इतका वेळ लागत आहे?" मी हे कबूल करतो, मी तिला खरे दृश्य सांगत नसे.
वाट पाहणे हे कधीकधी असे दिसू शकते की परमेश्वर आपल्याला विसरला आहे
वाट पाहणे हे कधीकधी असे दिसू शकते की परमेश्वर आता आपली काळजी करीत नाही व त्याने आपले मुख आपल्यापासून लपविले आहे.
वाट पाहणे हे निराशा सुद्धा आणू शकते. दावीद ह्या वाट पाहण्याच्या प्रक्रीये मधून गेला आणि शेवटी धावा केला, 'कोठवर?'. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे धावा करीत असाल, "कोठवर, परमेश्वरा?"
प्रेषित पेत्र आपल्याला सांगतो की, "कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही" (२ पेत्र ३:९). काही क्षणी, आपल्यापैकी अनेक जण हे "काही" गटात सामील झाले आहेत. आपण नेहमी परमेश्वराला म्हणतो, "का इतका उशीर होत आहे? उत्तर देण्यास तू इतका वेळ का घेत आहेस?" प्रामाणिकपणे, मी सुद्धा कधी काळी हा प्रश्न विचारला आहे.
मला तुम्हांला दोन अद्भुत आश्वासने सांगू दया जे आपल्याला आपल्या जीवन-प्रवासात साहाय्य करतील.
हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नांव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. (यशया ६४:४)
मुद्दा-१
लक्षात घ्या, वचन काय म्हणते, "परमेश्वर त्यांच्यासाठी कार्य करतो जे त्याची वाट पाहतात."
आज, परमेश्वराला सांगा हे म्हणत, "परमेश्वरा, मी हा विषय तुझ्या हातात समर्पित करीत आहे आणि मी वाट पाहत आहे व भरवंसा करीत आहे तू हे सोडीव." प्रतिदिवशी त्यांस हे आश्वासन स्मरण देत राहा. परमेश्वर विश्वसनीय आहे, आणि तो निश्चितच तुमच्या वतीने कार्य करील.
मुद्दा-२
तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलांस विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. (यशया ४०:२९-३१)
दुसरे, परमेश्वरावर प्रार्थने मध्ये वाट पाहणे हे तुमच्या जीवनावर वेग व गती चा अभिषेक आणेल. तुम्ही कदाचित आश्चर्य करीत असाल की वेग व गतीचा हा अभिषेक काय आहे. जेव्हा देवाचा हात संदेष्टा एलीयावर आला, तो अहाबाच्या रथाच्या पुढे पळत गेला (१ राजे १८:४६). जे पूर्ण करण्यास तुम्हाला वर्षे लागली असतील त्यास केवळ काही दिवस लागतील. ते प्राप्त करा.
मुद्दा-३
जेव्हा इस्राएली लोकांनी मिसर सोडला व त्यास आश्वासित देशाकडे प्रवास करावयाचा होता, सामान्यपणे तो ११ दिवसांचा प्रवास होता, परंतु इस्राएली लोकांना त्यासाठी ४० वर्षे लागली. विषय हा होता की इस्राएली लोक आश्वासित देशामध्ये प्रवेश करण्यापूर्वी वाट पाहण्याच्या वेळा दरम्यान परमेश्वर जे काही त्यांस शिकवू इच्छित होता त्या गोष्टी ते शिकत नव्हते.
अनेक लोकांबरोबर नेहमी असेच घडते. ते त्यांच्या वाट पाहण्याच्या वेळे दरम्यान परमेश्वर जे काही त्यांना शिकवीत आहे त्या गोष्टी ते खरेच शिकत नाहीत. आणि ह्याकारणामुळे, ते त्याच पर्वताभोवती पुन्हा पुन्हा जात राहतात. पाहा, परमेश्वराने, इस्राएली लोकांना काय म्हटले, "तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिला आहा" (अनुवाद २:३).
जेव्हा तुम्ही केवळ एक ऐकणारे नाहीत परंतु त्या गोष्टी आचरणात आणाल जे परमेश्वर तुम्हाला शिकवीत आहे, तुमच्या पुढच्या स्तरा चे आश्वासन दिले आहे.
प्रार्थना
पित्या, तूं खात्रीने त्यांच्यासाठी कार्य करतो जे तुझी वाट पाहतात. मी तुला धन्यवाद देतो.
जेव्हा मी प्रतिदिवशी तुझ्या सानिद्ध्यात वाट पाहतो, माझी शक्ती ही नवीन केली जाते. गरुडाप्रमाणे मी वर भरारी मारेन. मी पळेन पण दमणार नाही; मी चालेन पण थकणार नाही.
मी कबूल करतो, मी केवळ ऐकणारा नाही, परंतु तुझे वचन पाळणारा आहे. मी पुढच्या स्तरावर जात आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● पित्याची मुलगी-अखसा● महान पुरुष व स्त्रिया पतन का पावतात - ५
● तुमची प्रतिक्रिया काय आहे?
● कालेबचा आत्मा
● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
● धार्मिक सवयी
टिप्पण्या