आणि तो सर्वांसाठी ह्यांकरीता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. (२ करिंथ ५:१५)
असा विश्वास ठेवला जात आहेकी ख्रिस्ताच्या वेळे दरम्यान जवळजवळ ५००० विश्वासणारे होते. त्या विश्वासणाऱ्यांमध्ये तीन प्रकार होते. मोठया संख्येने असणारे विश्वासणारे हे ते होते जे येशू कडे केवळ तारणासाठी आले होते.केवळ तारण प्राप्त करावेयासाठी त्यांनी त्याची थोडीशी सेवा केली होती.खूपच लहान संख्या, म्हणा ५००, हे प्रत्यक्षात त्याच्या मागे चालले व त्याची सेवा केली. आणि मग येथे शिष्य होते. हे ते होते ज्यांनी येशू बरोबर ओळख दाखविली. येशू जे जीवन जगला, तसे जीवन ते जगले. ह्यापैंकी प्रत्येकजण शेवटी कठीण परिस्थिती मध्ये मरण पावले. त्यांनी संकटे, चमत्कार, वदेवा बरोबर मानवी रुपात संगती अनुभविली.
जर तुम्हाला म्हणावे लागले की कोणता गट तुमच्या जीवनास उत्तमरित्या सादर करतो, तुम्ही कोणत्या गटात याल?-५००० ज्यांनी केवळ विश्वास ठेवला, ५०० जे त्याच्या मागे चालले व तारणाऱ्याकडून जे ते शिकत होते ते त्यांनी त्यांच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केला किंवा १२ ज्यांनी तारणाऱ्याचे जीवन व सेवाकार्यात पूर्णपणे स्वतःची ओळख करून घेतली होती?
प्रभु येशूने आपल्या प्रत्येकाला त्याच्याबरोबर योग्य ओळख मध्ये चालण्यास बोलाविले आहे. "अशा प्रकारे ओळखले जाते की आपण त्याच्यामध्ये आहोत, जो कोणी त्याच्या बरोबर चालण्याचा दावा करतो त्याने तो जसा चालला तसे चालले पाहिजे. (१ योहान २:५ब-६)
४० दिवसांची बायबल वाचन योजना
प्रेषितांचीं कृत्यें १०-१५
अंगीकार
मी ख्रिस्ता बरोबर खिळलेलो आहे; आता मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि ह्या देहामध्ये जे जीवन मी जगत आहे, देवाच्या पुत्रावरील विश्वासाद्वारे जगतो ज्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.
Join our WhatsApp Channel

Most Read
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?● गमाविलेले रहस्य
● हुशारीने कार्य करा
● तो शब्द पाळ
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम
● ते लहान तारणारे आहेत
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या