english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस ११ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
डेली मन्ना

दिवस ११ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे

Thursday, 22nd of December 2022
30 19 944
Categories : उपास व प्रार्थना

कृपेने पदोन्नत

"तो कंगालांस धुळीतून उठवितो, दारिद्र्यांस उकीरड्यावरून उचलून उभे करितो." (१ शमुवेल २:८)

"कृपेने उंचावणे" यासाठी आणखी एक शब्द हा "दैवी उन्नती" आहे. तुमच्या सध्याच्या यशाच्या पातळीची पर्वा नाही, आणखी एक उच्च आणि उत्तम पातळी आहे. आपल्याला प्रकाशासारखे चमकायचे आहे, आणि सिद्ध दिवसापर्यंत आपला मार्ग हा उजळ आणि उजळ असा चमकायचा आहे. (मत्तय ५:१४; नीतिसूत्रे ४:१८)

कृपा ही देवाची अतुलनीय कृपा आहे. आपण त्यासाठी पात्र होत नाही; आपण त्यासाठी कार्य करू शकत नाही. हे फक्त काहीतरी आहे जे तो आपल्याला देतो. पवित्रशास्त्र वर्णन करते की मनुष्य म्हणून येशू हा "कृपा व सत्याने परिपूर्ण" होता (योहान १:१४; योहान १:१७). येशू ख्रिस्ताने आजारी लोकांना बरे करणे, मेलेल्यांना उठविणे, भुकेल्यांना अन्न देणे, आणि काना गावी जोडप्यांची लाज राखण्याने देवाच्या कृपेला स्पष्टपणे प्रदर्शित केले. जे सर्व काही येशूने केले ते आपल्याला दाखविते की देवाची कृपा लोकांच्या जीवनात काय करू शकते. म्हणून, मित्रांनो, तुम्हांला देवाच्या कृपेची गरज आहे.

देवाच्या कृपेची आपल्याला गरज आहे काय? देवाची कृपा मनुष्याच्या जीवनात काय करू शकते? जर कृपेचा अभाव राहिला, तर काय घडेल?

देवाच्या कृपेचे महत्त्व
१. जेव्हा तुमची मानवी शक्ती तुम्हाला अपयशी ठरविते तेव्हा देवाच्या कृपेची गरज असते
तुमच्या जीवनात असा प्रसंग येतो, जेथे तुमची शक्ती तुम्हांस अपयशी करते. याप्रसंगी, तुम्ही तुमच्या स्वतःला साहाय्य करू शकत नाही, आणि तुम्ही केवळ देवावर विसंबून राहू शकता कारण तुम्हांला नतमस्तक व्हायचे नाही. जर तुम्ही या टप्प्यावर पोहचला असाल, तर लक्षात ठेवा २ करिंथ १२:९ म्हणते, "परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन."

२. अशक्य दिसणारी कामे करण्यासाठी देवाच्या कृपेची गरज असते 
 "तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे: बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. ७ हे महान पर्वता, तूं काय आहेस? जरुब्बाबेलापुढे तूं सपाट मैदान होशील; व तो त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह, असा गजर करीत कोनशिला पुढे आणील." (जखऱ्या ४:६-७)

३. जेव्हा सर्व आशा नष्ट होतात तेव्हा देवाच्या कृपेची गरज असते
पण शिमोनाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, "गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो" (लूक ५:५). जेव्हा सर्व आशा नष्ट होतात, तेव्हा परमेश्वर अशक्य गोष्टी करू शकतो, जसे त्याने पेत्रासाठी केले.

४. जेव्हा लोकांना वाटते की तुमच्यातून काहीही चांगले येणार नाही तेव्हा देवाच्या कृपेची गरज लागते 
"नथनेल त्याला म्हणाला, नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप्प त्याला म्हणाला, येऊन पाहा." (योहान १:४६)

"सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. सातव्या वेळी याजक रणशिंगे फुंकीत असतांना यहोशवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे." (यहोशवा ६:१५-१६)

५. तुम्ही ज्या आशीर्वादांसाठी पात्र नाही आहात त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे
ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापावयाला मी तुम्हाला पाठविले; दुसऱ्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमाचे वाटेकरी झाला आहा. (योहान ४:३८)

६. जेव्हा तुम्हाला मोठे काम करायचे असते तेव्हा तुम्हाला देवाच्या कृपेची गरज असते 
मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. (योहान १४:१२)

त्याने आपल्याला त्याचा आत्मा दिला आहे; त्यामुळे कोणालाही काहीही सबब नाही. परमेश्वरासाठी महान व पराक्रमी कार्य करण्यासाठी आज देवाच्या कृपेचा पूर्ण लाभ घ्या.

७. देवाकडून कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते
कृपेशिवाय, तुम्ही देवाशी बोलण्यास किंवा त्याच्याकडून काहीही प्राप्त करण्यास पात्र नाही.

"तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ." (इब्री लोकांस पत्र ४:१६)

८. जे तुमचे श्रम तुम्हाला ३० वर्षात देऊ शकत नाहीत ते देवाची कृपा तुम्हाला ३ महिन्यात देऊ शकते
अलौकिक गतीची कृपा म्हणजे जीवनाच्या कोणत्याही पैलूत तुमच्यापुढे असलेल्या लोकांच्या पुढे जाण्याची क्षमता. हे सर्व प्रक्रिया आणि शिष्टाचार दैवी पद्धतीने काढून टाकणे आहे, जे तुम्हाला आश्चर्यकारकपणे कमी वेळेत आघाडीवर आणते.

परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. (१ राजे १८:४६)

मी प्रार्थना करतो की परमेश्वराचा वरदहस्त जो एलीया संदेष्ट्यावर होता, तो तुमच्यावर व माझ्यावर येईल की येशूच्या नावात इतरांवर वर्चस्व मिळवावे.
प्रतिभासंपन्न असणे शक्य आहे पण पदोन्नत केले जाणे नाही. अनेक बुद्धिमान लोक आपल्या समाजात अजूनही बेरोजगार आहेत. अनेक सुंदर स्त्रिया ह्या अजूनही अविवाहित आहेत. विवाह होणे, एक चांगली नोकरी मिळविणे, आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी देवाच्या कृपेची गरज असते. काही सदगुण जीवनास मधुर करतात आणि देवाची कृपा ही त्यापैकी एक आहे. कृपेचा अभाव असलेले जीवन संघर्ष करेल. तुमची शक्ती जे तुम्हाला देऊ शकत नाही ते कृपा तुम्हाला देऊ शकते.

आज तुम्ही  कृपेसाठी ओरडावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही देवाच्या कृपेची जितकी जाणीव ठेवाल, तितकीच तुम्हाला ती तुमच्या आयष्यात कार्यरत दिसेल.

कृपे द्वारे ज्यांस पदोन्नत केले आहे त्यांची बायबलमधील उदाहरणे
  • मफीबोशेथ
लंगड्यांना राजवाडयात परवानगी नव्हती परंतु देवाच्या कृपेने मफीबोशेवर कृपा करण्यात आली होती. असा एक दिवस आला जेव्हा दावीद राजाने सीबा नावाच्या एका माणसाला बोलाविले, जो पूर्वी शौलाचा सेवक होता. त्यास प्रश्न विचारण्यात आला, "ज्यावर देवाप्रीत्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय? सीबा राजास महाला, योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे" (२ शमुवेल ९:३). दाविदाने ताबडतोब लो-दबाराहून मफीबोशेथला बोलावून आणले, जेथे तो राहत होता. (२ शमुवेल ९:१-१३ वाचा)

  • योसेफ
योसेफ मिसर देशावर राज्य करण्यासाठी अनोळखी व्यक्ति म्हणून पात्र नव्हता, परंतु कृपेने त्यास पात्र केले. कृपा तुम्हाला व माझ्यासारख्या माणसांना आपल्या शत्रूंवरही राज्य करू देते.

४२ मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली;

४३ मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले, आणि ‘मुजरा करा!’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले.

४४ फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही.” (उत्पत्ति ४१:३८-४४)

  • एस्तेर
कृपेने, एक गुलाम मुलगी एका अनोळखी देशात राणी बनली. कृपा ही शिष्टाचार बदलणारी आहे.

राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीति केली आणि वरकड सर्व कुमारीपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टि विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले. (एस्तेर २:१७)

  • दावीद
कृपेने दाविदास जीवनाच्या क्षुल्लक ठिकाणाहून प्रतिष्ठित ठिकाणी आणले. त्यास जंगलात मेंढरे राखण्यापासून संपूर्ण राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी दैवीरीत्या पदोन्नत करण्यात आले.

तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तूं माझ्या प्रजेचा, इस्राएलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणिले." (२ शमुवेल ७:८)

तुमच्या बाबतीतही असेच होऊ शकते.

कृपेचा आनंद घेण्यासाठी आणि कृपेमध्ये वाढण्यासाठी काय करावे?
  • कृपेसाठी प्रार्थना करा
आतां माझ्यावर तुझी कृपादृष्टि असल्यास, तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.' (निर्गम ३३:१३)

  • नम्र व्हा
"तो अधिक कृपा करितो, म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो. (याकोब ४:७)

  • इतरांप्रती दयाळू व्हा
जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल." (मत्तय ५:७)

  • देवाच्या कृपेची जाणीव ठेवा आणि त्यावर अधिक अभ्यास करा 
तूं सत्याचे वचन नीट सांगणारा लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. (२ तीमथ्य. २:१५)

  • लहान व मोठया प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभारी राहा
सर्व स्थितीत उपकारस्तुति करा; कारण तुम्हांविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. (१ थेस्सलनीका. ५;१८)

  • कृपा वाहून नेणाऱ्या स्त्री-पुरुषांकडून कृपा प्राप्त करून घ्या
अभिषिक्त पात्रांद्वारे कृपा दिली जाऊ शकते.
मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यांतून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही. (गणना ११:१७)
प्रार्थना
आपल्या अंत:करणातून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा, त्यानंतरच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार म्हणा, त्यास व्यक्तिगत करा, आणि प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासह हे किमान १ मिनिटे करा.)

१. मागासलेपणा आणि स्थिरतेची भावना येशूच्या नावाने मी नाकारतो.

२. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावात मी गौरवाकडून गौरवाकडे जातो.

३. पित्या, मला येशूच्या नावात जीवनात यश मिळविण्याची कृपा दे.

४. पित्या, येशूच्या नावात मला उत्कृष्ट आत्मा दे.

५. परमेश्वरा, येशूच्या नावात प्रत्येक दृष्टीकोनाने माझी महानता वाढीव.

६. परमेश्वरा, तुझ्या कृपेने, येशूच्या नावात मला हेवा करण्यायोग्य पदावर उन्नत कर.

७. पित्या, येशूच्या नावात मला आशीर्वादाच्या स्थानावर ठेव.

८. पित्या, येशूच्या नावात मला उत्तम असे निवडिले जावे आणि प्राधान्य दिले जावे यासाठी मजवर कृपा कर आणि माझ्या जीवनात तसे घडू दे.

९. परमेश्वरा, येशूच्या नावात तुझी कृपा माझ्यासाठी उच्च स्तरावर कार्य करू दे.

१०. देवाच्या कृपेने मला स्वीकारले जाईल आणि नाकारले जाणार नाही; मी श्रेष्ठ असेन आणि निकृष्ठ नाही; येशूच्या नावाने मी सावकार होईन आणि कर्ज घेणार नाही.

११. पित्या, प्रत्येक जण जे या २१ दिवसांच्या उपास कार्यक्रमाचा हिस्सा आहेत, असे होवो की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांना येशूच्या नावात उच्च पदावर उन्नत कर.

Join our WhatsApp Channel


Most Read
● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा
● हुशारीने कार्य करा
● प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराचीस्तुति करा
● तुमचे तारण झालेच्या दिवसाचा उत्सव करा
● कृपे द्वारे तारण पावलो
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन