विश्वासाच्या बागेत, हा प्रश्न उत्पन्न होतो ज्याने अनेकांना आश्चर्यात टाकले आहे-विश्वासणाऱ्याच्या जीवनात डॉक्टर आणि औषधाच्या भूमिकेविषयी प्रश्न. ख्रिस्ती व्यक्ती डॉक्टरकडे जाऊ शकतात का? हा प्रश्न, जरी साधा असला, तरी विश्वास, प्रार्थना आणि स्पष्ट साधने ज्याद्वारे देव बरे करतो या सखोल संवादाला स्पर्श करतो.
पवित्र शास्त्र आपल्या शंकेसाठी मलम आणि आपल्या समजुतीसाठी उपाय देते. चांगल्या शोमरोनीने पुरविलेल्या काळजीमध्ये आपण हे पाहतो, जो तेल आणि द्राक्षारसचा वापर करतो,-त्या काळातील सामान्य उपचार,-जखमांवर उपचार करण्यासाठी (लूक. १०:३४). गिलादातील मलमच्या बरे करण्याच्या गुणधर्माबद्दल आपण ऐकले आहे (यिर्मया ८:२२), देवाच्या तरतुदीसाठी सुखदायक, पुनर्स्थापित शक्तीसाठी एक रूपक.
लूक जो नवीन कराराचा इतिहासकार, तो स्वतः एक वैद्य होता. त्याच्या लेखनात जागरूक मन आणि दयाळू अंत:करण दिसून यते. प्रेषित पौलाचे त्याच्याबद्दल “प्रिय वैद्य लूक” (कलस्सै. ४:१४) म्हणून प्रेमळ उल्लेख करणे ही एकाकी केलेली प्रशंसा म्हणून राहत नाही परंतु वैद्यकीय व्यवसायाची दैवी मान्यता म्हणून राहते.
आसा राजासमोर आलेला पेचप्रसंग (२ इतिहास १६:१२) हा सांगत आहे. वैद्याचा शोध घेणे यामुळे त्याचे पतन नव्हते तर त्याऐवजी परमेश्वराचा सल्ला नाकारून, त्यावरच पूर्णपणे अवलंबून राहण्यामुळे होते. हे आपल्याला महत्वाची शिकवण देते: विश्वासणारे म्हणून, आपण डॉक्टर आणि औषधे घ्यावीत पण आपला विश्वास आणि देवावर विसंबून राहण्यास सोडून देण्याइतपत नाही.
देवाने, त्याच्या अनंत ज्ञानामध्ये, पृथ्वीला ज्ञान आणि स्त्रोतांनी भरलेले आहे की आपल्याला बरे होण्यासाठी मदत करावी. डॉक्टर्स आणि औषधे ही महान वैद्यापासून बक्षीसे आहेत, देवाच्या कार्यशाळेतील साधने, त्याने गुंतागुंतीने एकत्र विणलेली शरीरे दुरुस्त करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वापरली जातात.
आपला विश्वास बरे करणाऱ्याच्या हातात नाही तर बरे करणाऱ्या देवाच्या हातात आहे. “त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन नीतिमत्वासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात” (१ पेत्र. २:२४). प्रत्येक उपचार आणि प्रत्येक पुनर्प्राप्ती त्याच्या दयेचा पुरावा आहे, आपल्यासाठी वाट पाहत असलेल्या शाश्वत पुनर्स्थापनेची फुंकर आहे.
जसे आपण स्वास्थ्य आणि बरे होण्याच्या मार्गावर दिशा शोधत पुढे जातो, तेव्हा शहाणपण आणि पारखसह असे करण्यास आपल्याला बोलावले आहे, वैद्यकीय व्यवसायिकांच्या कौशल्याचे मुल्यांकन करत असताना, परमेश्वराकडून मार्गदर्शन आणि सांत्वनाचा धावा करणे. आपल्याला याकोबाचे शब्द आठवतात, जे आपल्याला आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्यास, व प्रभूच्या नावाने तेलासह अभिषेक करण्यास आग्रह करते (याकोब ५:१४). हे कृत्य वैद्यकीय मदत रद्द करण्याचे नसून त्याला एक पवित्र पूरक आहे.
विश्वासाचे अभिषेक करणारे तेल आणि औषधाचे मलम देवाच्या पुरवठ्यामध्ये एकत्रितपणे कार्य करतात. बरे करण्याच्या सेवेमध्ये ते स्पर्धक नाहीत, तर सहकारी आहेत. प्रत्येक निदानामध्ये आणि प्रत्येक उपचाराद्वारे, आपली अंत:करणे आपल्या मेंढपाळाच्या वाणीकडे लयबद्ध असतात, हा भरवसा ठेऊन की त्याची आकडी व त्याची काठी आपल्याला शांत पाण्याजवळ नेईल आणि आपल्या जिवाला पुनर्स्थापित करेल. (स्तोत्र. २३)
जेव्हा तुम्ही स्वास्थ्य आणि बरे होण्यासाठी वाटचाल करता, असे होवो की तुम्ही प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक उपचाराला देवाच्या कृपेचे पात्र म्हणून पाहणारे व्हावे. असे होवो की तुम्ही सत्याला बिलगून राहा की वैद्य उपचार करत असताना, देव बरे करतो.
प्रार्थना
पित्या, तुझ्या औषधाच्या वरदानाने बरे होण्याचा धावा करण्यास आणि तुझ्या सर्वाभौमिक काळजीमध्ये विश्वास ठेवण्यासाठी आम्हांला शहाणपण प्रदान कर. प्रत्येक संकटात, आमचे सांत्वन आणि मार्गदर्शक हो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आदर व ओळख प्राप्त करा● युद्धासाठी प्रशिक्षण
● सर्वांसाठी कृपा
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● उपासनेचा सुगंध
● चुकीचे विचार
● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या